Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पुनर्रचित खेलो इंडिया कार्यक्रमाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने 2017-18 ते 2019-20 या कालावधीसाठी 1756 कोटी रुपये खर्चाच्या पुनर्रचित खेलो इंडिया कार्यक्रमाला मंजुरी दिली आहे. भारतीय क्रीडा क्षेत्राच्या इतिहासात हा अभूतपूर्व क्षण आहे.  व्यक्तिमत्व विकास, सामाजिक विकास, आर्थिक विकास आणि राष्ट्रीय विकासासाठी एक साधन म्हणून खेळाला मुख्य प्रवाहात आणणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.

या पुनर्रचित खेला इंडिया कार्यक्रमामुळे पायाभूत सुविधा, सामाजिक क्रीडा, गुणवत्ता शोध, प्रशिक्षण स्पर्धा, क्रीडा अर्थव्यवस्था यासह संपूर्ण क्रीडा व्यवस्थेवर परिणाम होईल.

ठळक वैशिष्टये पुढीलप्रमाणे-

  • अभूतपूर्व अखिल भारतीय क्रीडा शिष्यवृत्ती योजना यामध्ये दरवर्षी निवडक क्रीडा प्रकारातील 1000 प्रतिभावान युवा खेळाडूंना सामावून घेतले जाईल.
  • या योजनेअंतर्गत निवडण्यात आलेल्या प्रत्येक खेळाडूला सलग 8 वर्ष वार्षिक 5 लाख रुपये शिष्यवृत्ती मिळेल.
  • स्पर्धात्मक खेळ सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी प्रतिभावान खेळाडूला यामुळे दीर्घकालीन विकास मार्ग उपलब्ध होईल आणि जागतिक स्तरावर स्पर्धा करण्यासाठी सक्षम खेळाडू निर्माण होतील.
  • या कार्यक्रमाचा उद्देश देशभरात 20 विद्यापीठ सर्वोत्कृष्ट क्रीडा केंद्र म्हणून प्रोत्साहन देणे हा आहे.
  • निरोगी जीवनशैलीसह सक्रीय जनसमूह निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.
  • या कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय शारीरिक तंदुरुस्ती मोहिमेअंतर्गत 10 ते 18 वयोगटातील 20 कोटी मुलांना सामावून घेतले जाईल.

परिणाम

  • लिंग समानता आणि सामाजिक सर्वसमावेशकतेला प्रोत्साहन देण्यास खेळाचे सामर्थ्य सर्वश्रृत असून ही उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विशेष उपाययोजना केल्या जात आहेत.
  • वंचित समाजातील तरुणांना क्रीडा प्रकारात सामावून घेऊन त्यांना राष्ट्र विकासाच्या प्रक्रियेत आणणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.
  • शालेय आणि महाविद्यालयीन स्तरावर स्पर्धेचा दर्जा उंचावून संघटीत क्रीडा स्पर्धांसाठी त्यांना तयार करण्यात येणार आहे.

 

N.Sapre/S.Kane/P.Kor