Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी


पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा पहिला टप्पा विकसित करायला मंजुरी दिली. पुणे मेट्रो रेल्वे कॉरिडॉर ३१.२५४ किलोमीटर लांबीचा असेल ,ज्यात दोन कॉरिडॉर्सचा समावेश असेल. पहिला कॉरिडॉर १६.५८९ किलोमीटर(११.५७ किलोमीटर उन्नत आणि ५.०१९ किलोमीटर भुयारी) लांबीचा पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते स्वारगेट असा असेल. आणि दुसरा कॉरिडॉर वनाझ ते रामवाडी असा १४. ६६५ किलोमीटर लांबीचा पूर्णपणे उन्नत मार्ग असेल.

मेट्रो रेल्वे कॉरिडॉरचा एकूण खर्च ११,४२० कोटी रुपये असेल. या कॉरिडॉरचा लाभ पुणे महानगर क्षेत्रातील सुमारे ५० लाख लोकांना मिळेल.

सविस्तर प्रकल्प अहवालानुसार काम सुरु झाल्यापासून पाच वर्षात हा प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित आहे.

या प्रकल्पामुळे पुण्यातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल तसेच वेगवान, आरामशीर, सुरक्षित आणि प्रदूषणमुक्त वाहतूक यंत्रणा उभारली जाईल, ज्यामुळे या परिसराचा विकास होण्यास मदत मिळेल.

B.Gokhale/S.Kane/Anagha