Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पीएसएलव्ही सी 54 मोहिमेच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल पंतप्रधानांनी इस्रो आणि एनएसआयएलचे अभिनंदन केले


पीएसएलव्ही सी 54 च्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रो आणि एनएसआयएलचे अभिनंदन केले आहे. या प्रक्षेपणामध्ये सहभागी असलेल्या सर्व कंपन्यांचेही मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

ट्वीट संदेशांच्या मालिकेत पंतप्रधान म्हणाले;

पीएसएलव्ही सी54 च्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल इसरो आणि एनएसआयएलचे अभिनंदन. ईओएस-06 उपग्रहामुळे आपल्या सागरी संसाधनांचा सुयोग्य वापर करण्यामध्ये मदत होईल.”

@PixxelSpace आणि @DhruvaSpace या भारतीय कंपन्यांच्या 3 उपग्रहांच्या प्रक्षेपणामुळे भारतीय गुणवत्तेला पुरेपूर न्याय देऊ शकणाऱ्या अंतराळ तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात एका नव्या युगाचा प्रारंभ झाला आहे. या प्रक्षेपणामध्ये सहभागी असलेल्या सर्व कंपन्या आणि प्रत्येकाचे अभिनंदन.”

***

S.Kane/S.Patil/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai