नवी दिल्ली, 29 मे 2021
कोविड -19 मुळे पालक गमावलेल्या मुलांना आधार देण्यासाठी कोणती पावले उचलावी याबाबत विचारविनिमय आणि चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. सध्याच्या कोविड महामारीचा फटका बसलेल्या मुलांसाठी पंतप्रधानांनी अनेक फायदे जाहीर केले. या उपाययोजनांची घोषणा करताना पंतप्रधानांनी यावर भर दिला की मुले देशाच्या भवितव्याचे प्रतिनिधित्व करतात आणि मुलांना आधार देण्यासाठी व संरक्षण करण्यासाठी देश सर्वतोपरी प्रयत्न करेल जेणेकरून ते बलवान नागरिक म्हणून विकसित होतील आणि त्यांचे भविष्य उज्ज्वल असेल. पंतप्रधान म्हणाले की, अशा कठीण काळात आपल्या मुलांची काळजी घेणे आणि उज्ज्वल भविष्याची आशा बाळगणे हे आपले कर्तव्य आहे. कोविड 19 मुळे, दोन्ही पालक किंवा पालनपोषण करणारे किंवा कायदेशीर पालक / दत्तक पालक गमावलेल्या मुलांना ‘पीएम-केअर्स फॉर चिल्ड्रेन’ योजनेंतर्गत पाठिंबा दिला जाईल. पीएम-केअर्स निधीत केलेल्या उदार योगदानामुळेच या उपाययोजना शक्य झाल्या आहेत आणि त्या कोविड -19 विरुद्धच्या भारताच्या लढ्यास समर्थन देतील असेही त्यांनी सांगितले.
मुलाच्या नावे मुदत ठेव:
शालेय शिक्षणः 10 वर्षाखालील मुलांसाठी
शालेय शिक्षण: 11-18 वर्षांच्या मुलांसाठीः
उच्च शिक्षणासाठी समर्थनः
आरोग्य विमा:
* * *
Jaydevi PS/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com
Supporting our nation’s future!
— Narendra Modi (@narendramodi) May 29, 2021
Several children lost their parents due to COVID-19. The Government will care for these children, ensure a life of dignity & opportunity for them. PM-CARES for Children will ensure education & other assistance to children. https://t.co/V3LsG3wcus