नवी दिल्ली, 27 डिसेंबर 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधानांनी उपस्थितांना संबोधित देखील केले.
या कार्यक्रमात देशभरातून विकसित भारत संकल्प यात्रेचे हजारो लाभार्थी सहभागी झाले होते. कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री, खासदार, आमदार आणि स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
पंतप्रधानांनी लाभार्थ्यांशी संवाद साधला. पीएम आवास, उज्ज्वला, मोफत शौचालयाचे लाभार्थी असलेले त्रिपुरातील चहाच्या मळ्यात काम करणारे अर्जुन सिंह यांना 1.3 लाख रुपयांची मदत मिळाल्यानंतर ते कच्च्या घरातून पक्क्या घरात रहायला गेले आणि चुलीच्या जागी गॅसची शेगडी मिळाल्यामुळे त्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडून आला. मोदी की गारंटीच्या गाडीबद्दल त्यांच्या गावात आणि आसपासच्या भागात उत्सुकता असल्याची माहिती त्यांनी पंतप्रधानांना दिली. सरकारी योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळताना फारशी अडचण येत नाही याबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले.
N.Chitale/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai