भारत आणि बांगलादेशने भूभागाचे हस्तांतरण केल्यानंतर कूचबिहार जिल्हा आणि बांगलादेशी भूभागात पायाभूत सुविधांच्या अद्ययावतीकरणाला आणि पुनर्वसन साहाय्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
विविध घटकांच्या अंमलबजावणीसाठी एकूण वित्तीय तरतूद सुमारे 1005.99 कोटी रुपये आहे. यात कूचबिहार जिल्हा आणि भारतातील बांगलादेशी भूभागात पायाभूत सुविधांची निर्मिती आणि बळकटीकरण यासाठीच्या 898.50 कोटी रुपयांच्या निश्चित खर्चाचाही समावेश आहे. पुनर्वसनासाठी 107.49 कोटी रुपये चल खर्चाला यात समावेश होण्याची शक्यता आहे. वास्तविक चल खर्च भारतात परत येणाऱ्या प्रत्यक्ष कुटुंबांच्या संख्येवर अवलंबून आहे.
सर्व कामांची राज्य सरकार किंवा राज्य सरकारच्या संस्थांच्या माध्यमातून 3 ते 5 वर्षात अंमजबजावणी होणार आहे आणि निधी गृह मंत्रालय राज्य सरकारला अनुदान तत्त्वावर वितरित करणार आहे.
S.Kulkarni/S.Tupe/B.Gokhale