पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने पाटणा मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दानापूर-मिठापूर आणि पाटणा रेल्वे स्थानक-न्यू आयएसबीटी कॉरिडॉरला मंजुरी दिली आहे. यासाठी 13365.77 कोटी रुपये अंदाजे खर्च येणार आहे.
प्रकल्पाचा तपशील-
पाच वर्षात प्रकल्प पूर्ण केला जाईल.
दानापूर छावणी ते मिठापूर कॉरिडॉर शहराच्या मध्यवर्ती भागातून जाईल आणि राजा बाजार, सचिवालय, उच्च न्यायालय, विधी विद्यापीठ रेल्वे स्थानकाला जोडले जाईल.
पाटणा जंक्शन ते आयएसबीटी मार्गिका गांधी मैदान, पाटणा विद्यापीठ, राजेंद्र नगर , महात्मा गांधी सेतू ,आयएसबीटी या भागांना जोडेल.
या मेट्रोमुळे नागरिकांना, औद्योगिक कर्मचाऱ्यांना, पर्यटकांना, प्रवाशांना [पर्यावरणस्नेही आणि शाश्वत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध होईल.
पाटणा मेट्रो प्रकल्पाची वैशिष्ट्ये
दानापूर -मिठापूर कॉरिडॉरची लांबी 16.94 किमी आहे . यातील 11.20 किमी भुयारी असेल तर 5.48 किमी उन्नत मार्ग असेल. यावर 11 स्थानके असतील.
पाटणा जंक्शन ते आयएसबीटी कॉरिडॉरची लांबी 14.45 किमी असेल. यापैकी 9.9 किमी उन्नत तर 4.55 किमी भुयारी असेल. यावर 12 स्थानके असतील.
पाटणाच्या 26.23 लाख लोकसंख्येला या मेट्रो प्रकल्पाचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष लाभ होईल.
N.Sapre/S.Kane/P.Kor