Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पर्यटन क्षेत्रात सहकार्य मजबूत करण्यासंबंधी भारत आणि फिनलंड यांच्यातल्या सामंजस्य कराराला मंत्रिमंडळाची मंजुरी


 

पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने पर्यटन क्षेत्रात सहकार्य मजबूत करण्यासंबंधी भारत आणि फिनलंड यांच्यातल्या सामंजस्य कराराला मंजुरी दिली आहे.

 

लाभ-

सामंजस्य कराराची मुख्य उद्दिष्टे पुढीलप्रमाणे-

o   पर्यटन क्षेत्रात यशस्वी द्विपक्षीय सहकार्याला प्रोत्साहन आणि चालना देण्यासाठी पाया निर्माण करणे

o   पर्यटन संबंधी माहितीज्ञानयांचे आदानप्रदान  करणे

o   धोरण आखणीतील अनुभवपर्यटन धोरणाचे नियोजनअंमलबजावणी आणि विकास याचे नियमन करण्यातील अनुभवाचे आदानप्रदान,

o   भेटबैठककार्यशाळासह-निर्मिती सत्र आणि प्रत्यक्ष मूल्यांकन यांच्याद्वारे कंपन्या आणि संघटनांमधील संयुक्त प्रकल्पप्रयोगिक  प्रकल्प आणि भागीदारीची ओळख आणि विस्तार करणे .

o   फिनलंड आणि भारताच्या तज्ञांसाठी सहकार्याबाबत कार्यशाळा आणि अभ्यास दौऱ्याच्या माध्यमातून सर्वोत्तम पद्धतींचे आदानप्रदान

o   समान हित असलेल्या आंतरराष्ट्रीय वित्त संस्थांच्या बहुपक्षीय विकास कार्यक्रम आणि प्रकल्पांसंदर्भात भागीदारी विकसित करण्याला प्रोत्साहन देणे

 

पार्श्वभूमी

भारत आणि फिनलंड यांच्यात मजबूत दीर्घकालीन आणि राजनैतिक आर्थिक संबंध आहेत. हे संबंध अधिक मजबूत करण्याचा दोन्ही देशांचा प्रयत्न आहे. त्या अनुषंगाने उभय देशांनी सामंजस्य करार केला आहे.

 

 

G.Chippalkatti/S.Kane/D.Rane