Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

परीक्षेच्या ताणाला यशात रुपांतरीत करून परीक्षा योद्ध्यांना हसत हसत परीक्षा देणे शक्य करणे हा परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाचा उद्देश आहे : पंतप्रधान


नवी दिल्‍ली, 14 डिसेंबर 2023

 

परीक्षेच्या ताणाला यशात रुपांतरीत करून परीक्षा योद्ध्यांना हसत हसत परीक्षा देणे शक्य करणे हा परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाचा उद्देश आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने एक्स मंचावरील संदेशाद्वारे, विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांना परीक्षा पे चर्चा 2024   उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

खाली दिलेल्या संकेतस्थळाला भेट देऊन कोणतीही व्यक्ती या उपक्रमात सहभागी होऊ शकते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी थेट संवाद साधण्याची संधी मिळवू शकते, असे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या संदेशात म्हटले आहे. संकेतस्थळाची लिंक खाली दिली आहे.

https://innovateindia.mygov.in/ppc-2024/

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने एक्स मंचावर पाठवलेल्या संदेशाला प्रतिसाद देताना पंतप्रधान एक्स मंचावरील संदेशात लिहितात;

“ताणतणावाला यशात रुपांतरीत करून #ExamWarriors ना हसत हसत परीक्षा देणे शक्य करणे हा #ParikshaPeCharcha या कार्यक्रमाचा उद्देश आहे. कोणास ठाऊक, यापुढील आपल्या संवादात्मक सत्रादरम्यान आपल्याला अभ्यासाविषयी एखादी फार उत्तम सूचना अचानक मिळून जाईल!”

 

* * *

S.Kakade/S.Chitnis/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai