नवी दिल्ली , 29 जानेवारी 2024
नमस्कार,
आत्ताच, मी आमच्या सर्व विद्यार्थी मित्रांनी जे काही नवोन्मेष करून दाखवले आहेत आणि विविध प्रकारच्या आकृत्या सादर केल्या आहेत,त्या पाहून आलो.राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला आकार देण्याचा प्रयत्न त्यातून करण्यात आला आहे. जल, स्थल,नभ, अवकाश आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या सर्व क्षेत्रांसंबंधीत देशाची भावी पिढी काय विचार करते आणि त्यांच्याकडे कोणकोणत्या प्रकारचे उपाय आहेत हे पाहण्याची संधी मला मिळाली. असे वाटले की माझ्याकडे 5-6 तास असते तर तेही कमी पडले असते, कारण सर्वांनी छानच सादरीकरण केले आहे. त्या विद्यार्थ्यांचे, त्यांच्या शिक्षकांचे, त्यांच्या शाळांचे खूप खूप अभिनंदन करतो. आणि आपल्याला ही आग्रह करतो आहे, की जाण्यापूर्वी तुम्ही देखील ते प्रदर्शन जरूर बघा आणि त्यात काय आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्या शाळेत परत गेल्यावर तुम्ही तुमचे अनुभव इतर विद्यार्थ्यांसोबत सामायिक करा,कराल की नाही ? इकडून आवाज आला, तिकडून आला नाही, तिकडून पण नाही आला, माझा आवाज तुमच्यापर्यंत ऐकू येतोय ना…ठीक आहे.
तुम्हाला माहीत आहे का, तुम्ही कुठे आला आहात ते. तुम्ही अशा ठिकाणी आला आहात, जिथे भारत मंडपमच्या सुरुवातीलाच जगातील सर्व महान नेत्यांनी 2 दिवस बसून जगाच्या भवितव्याबद्दल चर्चा केली होती,आज तुम्ही त्या ठिकाणी आहात. आणि आज तुम्ही तुमच्या परीक्षेच्या चिंतेसोबत भारताच्या भवितव्याबद्दलही चर्चा करणार आहात. आणि एक प्रकारे परीक्षेवरची ही चर्चा, हा कार्यक्रम माझ्यासाठीही एक परीक्षाच आहे. तुमच्यापैकी बरेच जण असे असतील,ज्यांना कदाचित माझीच परीक्षा घ्यायची असू शकेल.असेही काही लोक असतील ज्यांना अगदी मनापासून असे वाटते आहे, की काही गोष्टी विचारल्या पाहिजेत जेणेकरून त्याची उत्तरे स्वतःला मिळतील आणि इतरांना देखील मिळतील.असे होऊ शकते की आम्ही सर्वांचेच प्रश्न नाही घेऊ शकणार, परंतु त्यापैकी अनेक प्रश्नांच्या उत्तरांमुळे आपल्या बहुतेक मित्रांना काही उपाय सापडतील. चला तर मग जास्त वेळ न घालवता आरंभ करूया. कुठून सुरुवात करायची?
सादरकर्ता – माननीय पंतप्रधानजी. तुमच्या प्रेरणादायी वचनांबद्दल मनापासून धन्यवाद.
कवितेचे स्वैर रुपांतर
हीच राहिली आवड तशी तरच प्रश्न सुटेल.
झाली जमीन नापीक, तरी पाणी तिथूनच येईल.
करता अविरत यत्न असे हे साध्य होईल
या रात्रीच्या गर्भात असे तो उद्याचा उषःकाल
या रात्रीच्या गर्भात असे तो उद्याचा उषःकाल
माननीय पंतप्रधानजी, आपले प्रेरणादायी आणि ज्ञानवर्धक संबोधन /शब्द आम्हाला नेहमीच सकारात्मक ऊर्जा आणि आत्मविश्वास मिळवून देते. तुमच्या आशीर्वादाने आणि परवानगीने आम्ही हा कार्यक्रम सुरू करू इच्छितो. धन्यवाद मान्यवर पंतप्रधान जी.
सादरकर्ता – माननीय पंतप्रधानजी, संरक्षण, आरोग्य आणि पर्यटन या क्षेत्रातील भारताचा भागीदार असलेला अरब देश ओमान येथील दारसैत येथील इंडियन स्कूलची विद्यार्थिनी दानिया शबू आमच्यासोबत ऑनलाइन पद्धतीने सामील झाली आहे आणि ती आपल्याला एक प्रश्न विचारू इच्छिते. दानिया कृपया आपला प्रश्न विचारा.
दानिया- आदरणीय पंतप्रधानजी, मी इंडियन स्कूल दारसाईत, ओमानमधील इयत्ता 10वी तील विद्यार्थिनी दानिया शबू वर्की आहे. माझा प्रश्न असा आहे, की सांस्कृतिक आणि सामाजिक अपेक्षांमुळे विद्यार्थ्यांना कशाप्रकारे परीक्षेच्या वेळी दबाव वाटू शकतो आणि हे बाह्य प्रभाव कसे समायोजित केले जाऊ शकतात? धन्यवाद!
सादरकर्ता – धन्यवाद दानिया.
सर जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीची राजधानी दिल्ली येथील सरकारी सर्वोदय बाल विद्यालय बुरारी येथील, मोहम्मद. अर्श आमच्यासोबत ऑनलाइन सामील होत आहे आणि त्याला त्याच्या मनातील शंका दूर करायच्या आहेत. मोहम्मद अर्श कृपया तुमचा प्रश्न विचारा.
मो. अर्श- माननीय पंतप्रधानजी. नमस्कार. माझे नाव अर्श आहे, मी GSSSB बुरारी शाळेतील इयत्ता 12 वी चा विद्यार्थी आहे. माझा तुम्हाला प्रश्न असा आहे की आमच्या अभ्यासावर आणि चांगली कामगिरी करण्याच्या आमच्या क्षमतेवर लक्षणीय परिणाम करणाऱ्या आमच्या सभोवतालच्या परीक्षांबद्दलच्या नकारात्मक चर्चांना आम्ही कसे सामोरे जाऊ शकतो, विद्यार्थ्यांसाठी अधिक सकारात्मक आणि आश्वासक वातावरण निर्माण करण्यासाठी पावले उचलली जाऊ शकतील का? धन्यवाद.
सादरकर्ता – धन्यवाद मोहम्मद! ओमानमधील दानिया शाबू आणि दिल्लीचे मोहम्मद. अर्श आणि आमच्यासारखे अनेक विद्यार्थी समाजाच्या आणि आजूबाजूच्या लोकांच्या अपेक्षांचे दडपण हाताळू शकत नाहीत. कृपया त्यांना मार्गदर्शन करावे.
पंतप्रधान- कदाचित मला सांगण्यात आले आहे की परिक्षा पे चर्चाचा हा 7 वा भाग आहे, आणि माझ्या आठवणीनुसार हा प्रश्न प्रत्येक वेळी आला आहे,आणि वेगवेगळ्या पध्दतीने विचारला गेला आहे हे मी पाहिले आहे. याचा अर्थ 7 वर्षांत 7 वेगवेगळ्या तुकड्या या परिस्थितीतून गेल्या आहेत. आणि प्रत्येक नवीन तुकडीला देखील त्याच समस्यांचा सामना करावा लागतो आहे. आता विद्यार्थ्यांची तुकडी बदलते पण शिक्षकांची तुकडी इतक्या लवकर बदलत नाही. आत्तापर्यंतच्या माझे जितके एपिसोड्स झाले आहेत त्यमध्ये मी वर्णन केलेल्या काही गोष्टी जर शिक्षकांनी त्यांच्या शाळांमध्ये मांडल्या असतील तर हळूहळू ही समस्या आपण कमी करू शकतो. त्याचप्रमाणे, बहुतेक कुटुंबांमध्ये, मोठा मुलगा किंवा मुलगी एखाद-दुसऱ्यांदा या चाचणीतून गेले असावे. पण त्यांना यातला फारसा अनुभव नाही. पण प्रत्येक मातापित्यांसमोर/ पालकांसमोर ही समस्या कोणत्या ना कोणत्या स्वरूपात नक्कीच आली असेल. आता प्रश्न असा आहे की अशांवर उपाय काय असावा, स्वीच ऑफ, प्रेशर बंद आहे, असे आपण म्हणू शकत नाही,म्हणून आपण स्वत:ला कोणत्याही प्रकारचे दबाव सहन करण्यास सक्षम बनवले पाहिजे. रडत बसू नये. आयुष्यात दडपण येतच राहतं हे स्वीकारलं पाहिजे. त्यामुळे तुम्हाला स्वतःला तयार करावे लागेल. आता जेव्हा कधी तुम्ही अशा ठिकाणी जाणार आहात,जिथे खूप थंडी असेल आणि तुम्ही गरम भागात रहाता तेव्हा तुम्ही मनाची तयारी करता की आता 3-4 दिवस मला अशा ठिकाणी जायचे आहे जिथे खूप थंडी आहे. त्यामुळे मानसिक तयारी केलेली असली तर हळूहळू जाणवते, तिथे पोहोचल्यावर वाटतं,अरे यार, मला वाटलं होतं त्यापेक्षा थंडी कमीच आहे की. कारण आपल्या मनाशी ठरवलं आहेस. म्हणूनच तापमान किती आहे- किती नाही हे तपासण्याची गरजच भासत नाही, मनाची तयारी झालेलीच असते. त्याचप्रमाणे या परिस्थितीवर मात करण्याचा संकल्प आपल्या मनातून एकदा आपल्या पद्धतीने केलाच पाहिजे. दुसरे म्हणजे, दबावांचे प्रकार तर बघा, एक म्हणजे स्वत:वर लादलेला दबाव म्हणजे पहा,तुम्ही मनाशी निश्चय केला आहे,सकाळी 4 वाजता उठायचं म्हणजे उठायचं आहे, रात्री 11 वाजेपर्यंत अभ्यास करायचा म्हणजे करायचाच आहे, एवढे प्रश्न सोडवून झाल्यावरच उठायचे आहे. आणि स्वतःवर खूप दबाव आलेला जाणवतो. मला असे समजते आहे की आपण इतकेही ताणू नये की आपली क्षमताच नष्ट होईल.
आपण हळू हळू वाढ केली पाहिजे, चला, मी काल 7 प्रश्न सोडवले रात्री, आज 8 सोडवीन. मग मला, जर का मी 15 ठरवले आणि 7च प्रश्न सोडवले तर सकाळी उठून विचार करतो, बघा, मी काल तर करू नाही शकलो, तर आज करणार. स्वतःचा देखील एक दबाव निर्माण करतो. आम्ही हे थोडं वैज्ञानिक पद्धतीनी करत आहोत. दूसरा मुद्दा आई वडील दबाव निर्माण करतात. हे का नाही केलं? ते का नाही केलं? झोपून काय राहतो, लवकर उठायला काय होतं, परीक्षा आहे, माहीत नाही का? आणि इथपर्यंत बोलतात, बघ तो तुझा मित्र काय करतो, आणि तू काय करतो. ही जी सकाळ संध्याकाळ कॉमेंट्री सुरू असते, धावते समालोचन, आणि कधी आई थकली, की बाबांचं समालोचन सुरू होतं. बाबा थकले की मोठ्या भावाचं समालोचन सुरू होतं.
आणि हे कमी म्हणून की काय, शाळेत शिक्षकांचं. किंवा मग काही लोक असे असतात .. जा, तुम्हाला काय करायचं ते करा, मी आपला असाच राहणार. काही लोक हे मनावर घेतात. मात्र, हा दबाव टाकण्याचा दुसरा प्रकार आहे. तिसरा एक असाही असतो ज्यात कारण काही नाही, समजून घेण्याचा भाव आहे, आणि विनाकारण आपण त्याला संकट समजतो. जेव्हा खरोखर करतो, तेव्हा लक्षात येतं की, अरे! इतकं कठीण पण नव्हतं, मी उगाचच दबाव झेलत होतो. तर, मला असं वाटतं की, एक तर यावर संपूर्ण कुटुंब आणि शिक्षकांनी, सर्वांनी मिळून समजून घेतलं पाहीजे. फक्त विद्यार्थी बघून घेईल, फक्त पालक बघून घेतील, इतक्याने काही होणार नाही. आणि मी असं मानतो, की कुटुंबात सातत्याने चर्चा होत राहिली पाहिजे. प्रत्येक कुटुंब अशी परिस्थिती कशी हाताळते, याची चर्चा झाली पाहिजे. त्यासाठी एक ठराविक साचेबद्ध कृती करण्यापेक्षा, आपण हळू हळू प्रक्रिया विकसित केली पाहिजे. जर आपण हे विकसित करू शकलो, तर मला पूर्ण विश्वास आहे, की आपण यातून बाहेर पडू शकतो. धन्यवाद!
सादरकर्ता – पंतप्रधान महोदय, दबाव हातळण्याचे मार्ग सुचविल्याबद्दल आपले आभार. स्वा सावरकरांच्या बलिदानाचे साक्षीदार आणि नयनरम्य नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध अंदमान निकोबर बेटांवरून एक पालक भाग्यलक्ष्मीजी आपल्याशी दृकश्राव्य प्रणालीद्वारे जोडल्या जात आहेत. भाग्यलक्ष्मीजी, तुमचा प्रश्न विचारा.
भाग्यलक्ष्मी – माननीय पंतप्रधान महोदय, नमस्कार. एक पालक म्हणून माझा आपल्याला असा प्रश्न आहे की विद्यार्थ्यांवर जो आजूबाजूच्या लोकांचा दबाव असतो, ज्यामुळे एकप्रकारे मैत्रीची सुंदरता संपवतो आणि विद्यार्थ्यांना आपल्याच मित्रांचे स्पर्धक बनवतो, यावर आपलं मत काय आहे. कृपया मला उपाय सांगा. धन्यवाद.
सादरकर्ता – धन्यवाद भाग्यलक्ष्मीजी. जगाला सत्य, अहिंसा आणि धर्म ही त्रिसूत्री देणाऱ्या गुजरातच्या पंचमहल जवहार नवोदय विद्यालायची विद्यार्थिनी दृष्टी चौहान, पंतप्रधान महोदय, आपल्याकडून तिच्या समस्येवर उपाय जाणून घेऊ इच्छिते. दृष्टी कृपया तुझा प्रश्न विचार.
दृष्टि चौहान – माननीय पंतप्रधान महोदय, नमस्कार. मी दृष्टि चौहान जवाहर नवोदय विद्यालय पंचमहल इथे 6वीची विद्यार्थिनी आहे. माझा आपल्याला हा प्रश्न आहे की कधी कधी परीक्षेच्या स्पर्धात्मक वातावरणात मित्रांशी स्पर्धा देखील जास्त दबाव निर्माण करते. कृपया मला सल्ला द्या, की कसे टाळावे? आपण मला यावर मार्गदर्शन करा. धन्यवाद सर.
सादरकर्ता – धन्यवाद दृष्टी. नैसर्गिक सौंदर्याने नटलेला, पावसाच्या पहिल्या सरींनी न्हाऊन निघणाऱ्या केरळ मध्ये असलेल्या केंद्रीय विद्यालय क्रमांक – 1 कालीकत इथून स्वाती दिलीप आपल्याशी दृकश्राव्य पद्धतीने जोडली जात आहे आणि आपल्याला प्रश्न विचारू इच्छिते. स्वाती, कृपया तुझा प्रश्न विचार.
स्वाति – नमस्कार. माननीय पंतप्रधान महोदय, मी स्वाती दिलीप, पंतप्रधान श्री केंद्रीय विद्यालय क्र 1, कालीकत, एरनाकुलम क्षेत्र, इथे 11 वीची विद्यार्थिनी आहे. महोदय, या स्पर्धात्मक जगात आम्ही अपायकारक, अनावश्यक स्पर्धा कशी टाळू शकतो आणि आजूबाजूच्या लोकांचा दबाव कसा हाताळू शकतो, यावर कृपया मार्गदर्शन करावे.
सादरकर्ता – धन्यवाद स्वाती. पंतप्रधान महोदय. कृपया भाग्य लक्ष्मीजी, दृष्टी आणि स्वाती यांनी विचारले आहे, जवळच्या व्यक्तींचे दबाव आणि स्पर्धेमुळे होणारी चिंता तसेच यामुळे संबंधात येणारी कटुता यापसून दूर कसे राहावे हे विचारले आहे. कृपया मार्गदर्शन करा.
पंतप्रधान – आयुष्यात जर आव्हानं नसतील, स्पर्धा नसेल, तर आयुष्य फारच प्रेरणाहीन, चेतनाहीन बनेल, स्पर्धा तर असायलाच पाहिजे. मात्र ज्याप्रमाणे एका प्रश्नात कालीकतच्या मुलीनी विचारलं, निकोप स्पर्धा असायला पाहिजे. आता आपला जो प्रश्न आहे, तो थोडा भीतीदायक आहे आणि त्यामुळे मला चिंता वाटते, कदाचित परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात मलाही तो पहिल्यांदाच विचारलं गेला आहे. बघा, कधी कधी या प्रवृत्तीचं विष, हे बीज कौटुंबिक वातावरणातच पेरलं जातं. घरातच आई वडील आणि दोन मुलं असतील तर कधी दोघांपैकी एकाबद्दल चांगलं बोलतील कधी दुसऱ्याबद्दल. तर कधी त्या 2 भाऊ – बहीणीत किंवा 2 भावा भावांत किंवा 2 बहिणींत देखील बघा, आई तर तिला असं म्हणाली आणि मला असं बोलली. या प्रकारचे विकृत स्पर्धात्मक विचार जाणते – अजाणतेपणी कुटुंबाच्या दैनंदिन आयुष्यात पेरले जातात. आणि म्हणून माझी सर्व पालकांना आग्रहाची विनंती आहे की कृपा करून मुलांची अशा प्रकारची स्पर्धा आपल्याच मुलांची अशा प्रकारची स्पर्धा लावू नका. यातून एक द्वेषाची भावना निर्माण होते आणि ते कुटुंब कधी ना कधी, दीर्घ काळानंतर एक खूप मोठा विषारी वृक्ष बनते. त्याच प्रकारे, मी खूप आधी एक व्हिडिओ बघितला होता. कदाचित तुम्ही लोकांनी देखील बघितला असेल. काही दिव्यांग मुलं त्यांच्या स्पर्धेत सगळे धावत आहेत, 12 – 15 वेगवेगळी मुलं, दिव्यांग आहेत तर अडचणी येणारच, पण ते धावत आहेत. इतक्यात धावता धावता एक मुलगा पडतो. आता जर का जास्त बुद्धिमान लोक असते, तर त्यांनी काय केलं असतं – चला, बरं झालं, एक जण स्पर्धेतून कमी झाला. पण त्या मुलांनी काय केलं – सगळेच्या सगळे, जे पुढे निघून गेले होते, ते देखील मागे आले, जे धावत होते ते पण थांबले. सर्वात आधी सर्वांनी त्याला उभं केलं, आणि मग, पुन्हा धावायला सुरवात केली. खरोखर, हा व्हिडिओ भलेही दिव्यांग मुलांच्या आयुष्यातला असेल, मात्र आपल्यासाठी देखील हा खूप मोठी प्रेरणा आणि खूप मोठा संदेश देतो.
आता तिसरा विषय आहे की आपल्या मित्रांशी कशाची स्पर्धा? समजा 100 गुणांची प्रश्न पत्रिका आहे, आता जर मित्राला 90 गुण मिळाले, तर तुमच्यासाठी फक्त 10 गुण उरले का? तुमच्यासाठी फक्त 10 गुण उरले का? तुमच्यासाठी सुद्धा 100 आहेत ना. तर, तुम्हाला त्याच्याशी स्पर्धा करायची नाही, स्वतःशी करायची आहे. स्वतःशी करायची आहे, की त्याला 90 गुण मिळाले, मी 100 पैकी किती मिळवणार. त्याचा द्वेष करण्याची गरज नाही.
वास्तविक, असा सहाध्यायी तुच्यासाठी प्रेरणा ठरू शकतो आणि जर तुमची ही मानसिकता असेल तर तुम्ही काय तुमच्यापेक्षा हुशार विद्यार्थ्याला तुमचा मित्र बनवणार नाही का? बाजारात ज्याची चलती नाही त्याला मित्र बनवून तुम्ही मोठे कंत्राटदार म्हणून फिरत राहणार का? खरे तर आपल्यापेक्षा जास्त बुद्धिमान मित्र शोधावेत. जितके हुशार मित्र मिळतील तितकी आपण जास्त मेहनत करू. आपला आत्मविश्वासही वाढतो. आणि म्हणूनच या प्रकारचा मत्सर आपण कधीही आपल्या मनात येऊ देऊ नये.
आणि तिसरा हा पालकांसाठीही अत्यंत चिंतेचा विषय आहे. पालक जर प्रत्येक वेळी आपल्या मुलांना टोकत राहिले कि बघ- तू खेळत राहतोस आणि तो पुस्तके वाचतो. तू यात वेळ घालवतोयस आणि बघ, तो अभ्यास करतोय. म्हणजे तेही नेहमी तेच तेच उदाहरण देतात. मग तुम्हीही तेच गृहीत धरायला लागता. कृपया पालकांनी या गोष्टी टाळाव्या. कधी कधी मी पाहिले आहे की जे पालक त्यांच्या आयुष्यात फारसे यशस्वी झालेले नाहीत, ज्यांना त्यांच्या सामर्थ्याविषयी, त्यांच्या यशाबद्दल किंवा त्यांच्या कर्तृत्वाबद्दल जगाला सांगण्यासारखं किंवा बोलण्यासारखे काही नसतं, तेव्हा ते त्यांच्या मुलांचे प्रगतीपुस्तकच आपले व्हिजिटिंग कार्ड असल्यासारखे वापरतात. जो भेटेल त्याला आपल्या पाल्याविषयी सांगतात. आता या स्वभावामुळे मुलाच्या मनातही आपणच सर्वज्ञ आहोत, अधिक काही करण्याची गरज नाही अशी भावना बळावते….यामुळेही अशा मुलाचे खूप नुकसान होते.
खरे तर आपल्या मित्राचा मत्सर करण्याऐवजी आपण त्याची बलस्थानं शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर त्याचे गणित पक्के आणि माझे कच्चे असेल आणि जर त्याने मला समजेल अशारितीने आपल्या शिक्षकांपेक्षा अधिक सोप्या पद्धतीने गणित विषय शिकण्यात मदत केली कदाचित मीही त्याच्यासारखा गणितात प्राविण्य मिळवेन. जर समजा भाषा विषयात तो कच्चा असेल आणि माझे भाषांवर प्रभुत्व असेल तर मी त्याला भाषा विषयात मदत केली तर आम्ही दोघे परस्परांच्या साथीने अधिक चांगले प्राविण्य मिळवू. आणि म्हणून कृपया आपल्या मित्रांसोबत स्पर्धा आणि मत्सराच्या भावनेत स्वतःला हरवून जाऊ देऊ नका आणि मी असे लोक पाहिले आहेत जे स्वतः अपयशी ठरतात, परंतु मित्र यशस्वी झाला तर ते मिठाई वाटतात. मी तर असेही मित्र पाहिले आहेत ज्यांना खूप चांगले गुण मिळाले पण मित्राला मिळाले नाही म्हणून त्याने त्याच्या घरी पार्टी केली नाही, सण साजरा केला नाही, का… तर माझा मित्र मागे राहिला. ..असेसुद्धा मित्र असतात. आणि मैत्री हा काय देवाणघेवाणीचा खेळ आहे का? नाही…मैत्री ही देवाणघेवाणीची बाब नाही. जिथे अशाप्रकारची देवघेव नसते तिथे निस्वार्थ प्रेम असते, तीच खरी मैत्री असते. आणि ही मैत्री केवळ शाळेपुरतीच नाही तर आयुष्यभर तुमच्यासोबत असते. आणि म्हणून, कृपया मित्रांनो, आपण आपल्यापेक्षा अधिक हुशार-बुद्धिमान मित्र निवडून त्यांच्याकडून नेहमी शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. धन्यवाद.
सादरकर्ता –माननीय पंतप्रधान महोदय, मानवतेचा हा संदेश आपल्याला स्पर्धेमध्येही नेहमीच प्रेरणा देत राहील. भारताच्या आग्नेयकडील आंध्रप्रदेश राज्यातील कृषिप्रधान तिरुमला भूमीच्या एनकापल्ली जिल्ह्यातील उपरपल्ली येथील जिल्हापरिषद शाळेतील संगीत शिक्षक कोंडाकांची संपतराव जी, आपल्यासोबत कार्यक्रमात ऑनलाइन सहभागी होत आहेत आणि त्यांना तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे.. संपतरावजी कृपया तुमचा प्रश्न विचारा.
संपतराव – संपतरावांचे पंतप्रधानांना अभिवादन. माझे नाव कोंडकांची संपतराव आहे आणि मी आंध्रप्रदेशातील एनकापल्ली जिल्ह्यातील उपरपल्ली येथील जिल्हापरिषद शाळेत शिक्षक आहे. महोदय, माझा तुम्हाला प्रश्न आहे की एक शिक्षक या नात्याने मी माझ्या विद्यार्थ्यांना परीक्षा देताना तणावमुक्त राहण्यासाठी कोणत्या प्रकारे मदत करू शकतो? कृपया मला याबाबत मार्गदर्शन करावे. धन्यवाद सर.
सादरकर्ता – धन्यवाद सर. सभागृहात उपस्थित असलेल्या भारताच्या पूर्वेकडील चहाच्या मळ्यांची भूमी आणि ब्रह्मपुत्रेचा सुंदर डोंगराळ प्रदेश आसाममधील शिवसागर येथील सायरा उच्च माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षिका बंटी मेधी जी, यांना पंतप्रधानांना एक प्रश्न विचारायचा आहे. मॅडम, कृपया तुमचा प्रश्न विचारा.
बंटी मेधी- नमस्कार, माननीय पंतप्रधान महोदय, मी बंटी मेधी आसामधील शिवसागर जिल्ह्यातील शिक्षिका आहे. विद्यार्थ्यांना प्रेरित करण्यात शिक्षकाची भूमिका काय असावी हा माझा प्रश्न आहे. कृपया आम्हाला मार्गदर्शन करा. धन्यवाद.
सादरकर्ता – धन्यवाद मॅडम, पंतप्रधान महोदय, आंध्र प्रदेशचे संगीत शिक्षक श्री संपतराव जी आणि सभागृहात उपस्थित शिक्षिका बंटी मेधीजी यांनी विचारलेल्या या प्रश्नांमध्ये त्यांना परीक्षेच्या वेळी शिक्षकांच्या भूमिकेबद्दल तसेच ते विद्यार्थ्यांना तणावमुक्त राहण्यास कशी मदत करू शकतात याविषयी जाणून घ्यायचे आहे. कृपया संपूर्ण शिक्षक वर्गाला आपण मार्गदर्शन करावे.
पंतप्रधान: सर्वप्रथम, मला वाटते की संगीत शिक्षक केवळ त्यांच्या वर्गाचाच नव्हे तर संपूर्ण शाळेतील मुलांचा ताण दूर करू शकतात. संगीतात ती शक्ती असते… होय, आपण कान बंद करून संगीत ऐकत बसलो असतो… कधी कधी असं होतं… की आपण तिथे असतो, संगीत वाजत असतं पण मनाने आपण तिथे नसतो आणि त्यामुळेच त्याचा आनंद आपल्याला अनुभवता येत नाही. विद्यार्थ्यांवरील हा ताण कसा दूर करायचा याचा विचार जेव्हा कोणताही शिक्षक करतो तेव्हा मला वाटते.. कदाचित मी चुकतही असेन, पण मला वाटते की शिक्षकांच्या मनात फक्त परीक्षेचा कालावधी आहे. शिक्षक आणि विद्यार्थी यांचे नाते जर फक्त परीक्षेच्या काळापुरते मर्यादित असेल तर सर्वप्रथम ते नाते सुधारले पाहिजे. विद्यार्थ्याशी तुमचे नाते: वर्षाच्या सुरुवातीला तुम्ही वर्गात प्रवेश केल्याच्या क्षणापासून, त्या दिवसापासून ते परीक्षेपर्यंत तुमचे नाते अधिकाधिक दृढ झाले पाहिजे, तर कदाचित परीक्षेच्या दिवसांत कोणताही ताण येण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही.
जरा विचार करा, आज मोबाईलचे युग आहे, विद्यार्थ्यांकडेही तुमचा मोबाईल क्रमांक असेलच. तुम्हाला कधी विद्यार्थ्याने फोन केला आहे का? फोन करून विचारले आहे का की मला अमुक एक अडचण आहे, मला काळजी वाटते…कधीच केला नसेल. का…कारण त्याच्या आयुष्यात तुमचे काही खास स्थान आहे असं त्याला वाटतच नाही. त्याला वाटते कि त्याचे आणि तुमचे नाते फक्त ठराविक विषयापुरते जसे कि गणित, रसायनशास्त्र, भाषा असे सीमित आहे. ज्या दिवशी तुम्ही अभ्यासक्रमाच्या पलीकडे जाऊन त्याच्याशी नाते प्रस्थापित कराल, तेव्हा तो त्याच्या छोट्या-छोट्या अडचणीच्या वेळीही त्याचे मन तुमच्याकडे मोकळे करेल.
हे ऋणानुबंध निर्माण झाल्यास परीक्षेच्या वेळी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाहीशी होईल. तुम्ही बरेच डॉक्टर पाहिले असतील, त्या सर्व डॉक्टरांकडे पदवी तर असते, पण काही डॉक्टर जे जनरल प्रॅक्टिशनर्स आहेत… ते जास्त यशस्वी होतात कारण रुग्ण निघून गेल्यावर, एक-दोन दिवसांनी, ते त्याला स्वतः संपर्क साधून त्याच्या तब्येतीची चौकशी करतात, औषधपाणी नीट घेत असल्याची खातरजमा करतात. ती आजारी व्यक्ती दुसऱ्या दिवशी पुन्हा दवाखान्यात येईपर्यंत वाट पाहण्यापेक्षा त्याच्याशी अधेमधे बोलल्यामुळे तो अर्धा बरा होतो. तुमच्यापैकी काही शिक्षक असे असतात… समजा, एखाद्या मुलाने खूप चांगले गुण मिळवले, आणि तुम्ही त्याच्या घरी जाऊन त्याच्या घरच्यांना म्हणालात कि तुमच्या पाल्याने इतकी चांगली कामगिरी केली आहे तर चला काहीतरी गोडधोड खाऊया. तुम्ही कल्पना करू शकता की तुम्ही त्या मुलाच्या घरी जाण्यापूर्वी त्या मुलाने पालकांना सांगितले असेलच की आज त्याने असे काही यश संपादन केले आहे. पण जेव्हा एखादा शिक्षक स्वतः जाऊन सांगतो, तेव्हा त्या शिक्षकाचे त्या कुटुंबात येणे, त्यांना त्यांच्या पाल्याविषयी चांगले सांगणे हे त्या मुलालाही बळ देते आणि कुटुंबालाही कधी कधी पाल्याविषयी इतकी कल्पना नसते पण जेव्हा स्वतः शिक्षक येऊन सांगतात तेव्हा कुटुंबालाही त्या मुलांमधील सुप्तगुणांची जाणीव होईल आणि खरंच आपण थोडं लक्ष द्यायला हवं असे त्यांना वाटू लागेल.
त्यामुळे तुम्हाला दिसेल, वातावरण अचानक बदलेल आणि म्हणूनच आता पहिली गोष्ट म्हणजे परीक्षेच्या वेळी तणाव दूर करण्यासाठी काय करावे लागेल, त्यासाठी मी आधीच बरेच काही सांगितले आहे. मी त्याचा पुनरुच्चार करत नाही. पण तुमचं त्याच्याशी वर्षभर नातं असेल तर… मी कधी कधी अनेक शिक्षकांना विचारतो, तुम्ही किती वर्षं शिक्षक आहात? जे पहिल्यांदा तुमच्या कडून शिकून गेले असतील, त्यांची आता लग्नं झाली असतील. तुमचा कुणी विद्यार्थी तुम्हाला लग्नपत्रिका द्यायला आला होता का? 99 टक्के शिक्षक मला सांगतील की एकही विद्यार्थी आला नाही. म्हणजे काय तर आम्ही नोकऱ्या करायचो, आम्ही कुणाची आयुष्य नाही बदलायचो. शिक्षकाचे काम फक्त नोकरी करणे नसते, शिक्षकाचे काम आयुष्य घडवणे, जीवनाला बळ देणे असते आणि त्यातूनच बदल घडतो. धन्यवाद!
सादरकर्ता – शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील नातेसंबंधात परस्पर विश्वास महत्त्वाचा आहे. आम्हाला एक नवीन दृष्टीकोन दिल्याबद्दल धन्यवाद. अनोखी आदिवासी संस्कृती लाभलेल्या त्रिपुरा या ईशान्य भारतातील एक राज्यातील प्रणवानंद विद्या मंदिर या पश्चिम त्रिपुरातील शाळेची एक विद्यार्थिनी अद्रिता चक्रवर्ती, आपल्या सोबत ऑनलाइन सहभागी होत आहे. परीक्षेच्या तणावातून मुक्त होण्यासाठी, तिला माननीय पंतप्रधानांकडून तिच्या समस्येचे निराकरण हवे आहे. अद्रिता कृपया तुमचा प्रश्न विचारा.
अद्रिता चक्रवर्ती – नमस्कार पंतप्रधानजी, माझे नाव अद्रिता चक्रवर्ती आहे. मी प्रणवानंद विद्या मंदिर पश्चिम त्रिपुरा इथे इयत्ता 12 वी ची विद्यार्थीनी आहे. माझा तुम्हाला प्रश्न असा आहे की पेपर संपल्यानंतर शेवटच्या काही मिनिटांत मी घाबरून जाते आणि माझे हस्ताक्षरही बिघडते. मी या परिस्थितीला कसे सामोरे जाऊ, कृपया मला उपाय सांगा, धन्यवाद सर.
सादरकर्ता –धन्यवाद अद्रिता! नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध असलेल्या तांदळाची वाटी म्हणून प्रसिद्ध असलेल्या छत्तीसगढ येथील जवाहर नवोदय विद्यालय कराप कांकेरचे विद्यार्थी शेख तैफुर रहमान, ऑनलाइन माध्यमातून आपल्या समवेत आहेत आणि त्यांना परीक्षेच्या तणावातून मुक्त होण्यासाठी मार्गदर्शन हवे आहे. तैफुर रहमान कृपया तुमचा प्रश्न विचारा.
शेख तैफुर रहमान- पंतप्रधानजी नमस्कार! माझे नाव शेख तैफुर रहमान आहे. मी पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय कांकेर छत्तीसगढचा विद्यार्थी आहे. बहुसंख्य विद्यार्थ्यांना मोठ्या परीक्षेदरम्यान चिंता वाटते.त्यामुळे ते प्रश्न नीट न वाचण्यासारख्या मूर्ख चुका करुन बसतात. महोदय, माझा तुम्हाला प्रश्न आहे की या चुका कशा टाळायच्या. कृपया मार्गदर्शन करा, धन्यवाद!
सादरकर्ता – धन्यवाद तैफूर, आपल्या समवेत, ओदिशा आदर्श विद्यालय, कटक येथील राजलक्ष्मी आचार्य या विद्यार्थिनी, सभागारात उपस्थित आहेत. त्या पंतप्रधानजींना प्रश्न विचारु इच्छितात. राजलक्ष्मी कृपया तुमचा प्रश्न विचारा.
राजलक्ष्मी आचार्य- माननीय पंतप्रधानजी, जय जगन्नाथ! माझे नाव राजलक्ष्मी आचार्य आहे, मी ओदिशा आदर्श विद्यालय, जोकिडोला बांकी कटक इथली आहे. सर, माझा प्रश्न आहे- शांत मनाने परीक्षेला सामोरे जा असे म्हणणे सोपे आहे, पण परीक्षागारात परिस्थिती इतकी भितीदायक असते… जसे हलू नका, सरळ पहा…..मग ते इतके छान-शांत कसे असू शकते, धन्यवाद सर!
सूत्रसंचालक:- धन्यवाद राजलक्ष्मी! पंतप्रधानजी, अद्रिता, तैफूर आणि राजलक्ष्मी आणि त्यांच्यासारख्या अनेकांचे आभार, हा प्रश्न विद्यार्थ्यांकडून परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाच्या मागील सर्व आवृत्त्यांमध्ये अनेकदा विचारला गेला आहे आणि आताही हा प्रश्न काही विद्यार्थ्यांसाठी चिंतेचा विषय बनला आहे की परीक्षे दरम्यान निर्माण होणारा ताण त्यांनी कसा सहन करावा? कृपया या याबाबत मार्गदर्शन करा.
पंतप्रधान : इथून तिथून फिरुन पुन्हा तणाव आला. आता या तणावातून मुक्ती कशी मिळवायची? आपण पहा, नेमकी काय चूक होते ती! दैनंदिन जीवनात आपण काही चुका पाहिल्या तर त्या आपल्या लक्षात येते. पालकांच्या अतिउत्साहामुळे काही चुका होतात. काही चुका विद्यार्थ्यांच्या फाजील काटेकोरपणामुळे होतात. हे टाळले पाहिजे असे मला वाटते. उदाहरणार्थ, मी पाहिले आहे की काही पालकांना असे वाटते की आज परीक्षा असल्याने आपल्या मुलासाठी नवीन पेन आणावे. जर तुम्ही त्याला चांगले कपडे घालून जायचा आग्रह केला तर तो त्या नव्या कपड्यांशी जुळवून घेण्यातच बराच वेळ घालवेल. शर्ट बरोबर आहे की नाही, गणवेश बरोबर आहे की नाही. मी पालकांना विनंती करतो की रोज वापरतात ना तेच पेन द्या त्यांना. तो परिक्षेच्या ठिकाणी काही पेन दाखवायला थोडाच जातोय आणि परीक्षेच्या वेळी कुणालाच वेळ नसतो….तुमचा पाल्य नवीन कपडे घालून आला आहे, की जुने कपडे घालून आला आहे, हे पहायला! तेव्हा, या मानसिकतेतून तुम्हाला बाहेर यावे लागेल. दुसरे म्हणजे, ते त्याला अशा गोष्टी खायला घालतील की ही परीक्षा आहे…. हे खाऊन जा, परीक्षा आहे….. ते खाऊन जा, मग त्याला आणखी त्रास होईल कारण त्याला ते सोयीचे नसते. त्या दिवशी गरजेपेक्षा जास्त खा…. मग आई म्हणेल तुझे परीक्षा केंद्र खूप दूर आहे….. रात्रीचे 7 वाजतील. असं कर, काहीतरी खाऊन जा, मग म्हणेल काहीतरी घेऊन जा! तो विरोध करू लागतो, नाही, मी घेणार नाही. तिथूनच तणाव सुरू होतो, नेमके घर सोडण्यापूर्वीच हे घडते. त्यामुळे सर्व पालकांकडून माझी अपेक्षा आहे आणि माझी सूचना आहे की तुम्ही त्याला त्याच्या मनासारखे करु द्यावे. परीक्षा द्यायला चालला असाल, तर उत्साहाने आनंदाने जावे, बस!त्यांच्या रोजच्या सवयी जशा आहेत तशाच राहू देत. आता जे फाजील काटेकोर विद्यार्थी असतात त्यांची अडचण काय असते? तर, परिक्षा कक्षाच्या दरवाजा पर्यंत पुस्तक सोडतच नाहीत, अगदी दारापर्यंत सोडत नाहीत. आता तुम्ही अचानक असं कराल तर कसे होईल? रेल्वे स्थानकावर गेल्यावरही गाडी आणि तुम्ही, एकाचवेळी फलाटात शिरता का? नाही ना! तुम्ही 5-10 मिनिटे लवकर जाता, फलाटावर उभे राहता, तुमचा डबा कुठे येईल याचा अंदाज घेता, मग त्या ठिकाणी जाता, मग डब्यात आधी कोणते सामान घेऊन जायचे, नंतर कोणते घेऊन जायचे याचा विचार करता. म्हणजे गाडी येण्याआधीच तुमचे मन परिस्थितीशी जुळवून घेऊ लागते. त्याचप्रमाणे तुमच्या परीक्षा कक्षाचे सुद्धा आहे. हे शक्य आहे की ते अगदी सकाळी सकाळी तुमच्यासाठी कक्ष उघडणार नाहीत, परंतु कमीतकमी 10-15 मिनिटे आधी तर परवानगी देतातच देतात. तर मग तो कक्ष उघडताच, आरामात आत जा, आणि आरामात आणि आनंदाने बसा! जर काही जुन्या मजेदार गोष्टी असतील तर त्या आठवा आणि जर एखादा मित्र जवळ असेल तर एक किंवा दोन विनोद सांगा. 5-10 मिनिटे हसतखेळत घालवा. हे काही नाही, ते जाऊ द्या, किमान एक दीर्घ श्वास घ्या, खूप खोल श्वास घ्या. हळू हळू, 8-10 मिनिटे स्वतःसाठी जगा, स्वतःमध्ये हरवून जा. काही क्षण परीक्षेच्या मानसिकतेमधून बाहेर पडा. आणि मग प्रश्नपत्रिका हातात आल्यावर तुम्ही आरामात असाल. नाहीतर काय होते, हा आला की नाही,तो आला की नाही, त्याने पाहिलं की नाही, तो कसा आहे, काय माहीत शिक्षक कुठे पाहतोय…..तिथे CCTV कॅमेरा आहे. . अरे, तुला काय करायचे आहे, कुठल्या कोपऱ्यात सीसीटीव्ही कॅमेरा पडला आहे तो… तुझे काय त्यांच्याशी देणेघेणे आहे? आपण या गोष्टींमध्ये अडकून पडतो आणि विनाकारण त्यात आपली शक्ती आणि वेळ वाया घालवतो. आपण आपल्यातच मशगुल असावे आणि प्रश्नपत्रिका आली की…आपण बऱ्याच वेळा अनुभवले असेल…. की जर तुमचा परिक्षा क्रमांक पहिल्या बाकावर असेल…तर पर्यवेक्षक मागून प्रश्नपत्रिका वाटायला लागतो आणि तुमची चलबिचल सुरु होते. बघ त्या शेवटच्या बाकावरच्याला पाच मिनिटे माझ्या आधी प्रश्नपत्रिका मिळेल, मला पाच मिनिटे उशिराने मिळेल. हे असेच घडते, हो की नाही? हे असेच घडते, बरोबर ना? आता जर तुम्ही तुमचे मन अशा गोष्टींचा विचार करण्यात गुंतवले…की… मला आधी प्रश्नपत्रिका मिळाली की 20 जणांनंतर मिळाली… तर तुम्ही तुमची ऊर्जा नाहक वाया घालवता.विचार करा….. असे करुन तुम्ही, आहे ती परिस्थिती बदलू शकता का….तर नाही बदलू शकत!.
समजा शिक्षकाने तिथून सुरुवात केली तर तुम्ही उभे राहू शकत नाही आणि म्हणू शकत नाही की आधी मला द्या, तुम्ही असे करू शकत नाही. त्यामुळे हे घडणार आहे हे तुम्हाला माहीत आहे, मग तुम्ही स्वतः असे नियोजन करावे. आपण आपल्या आजूबाजूच्या या संपूर्ण जगाबद्दल अनेकदा वाचलं आहे आणि आपण ते लहानपणापासून वाचत आहोत. ती अर्जुनची पक्ष्याच्या डोळ्याची कथा आपण ऐकतो. पण जीवनात अशावेळी फक्त पक्ष्याचा डोळा नाही दिसत, तेव्हा झाड दिसते, पानेही दिसतात. मग तुम्हाला तो पक्ष्याचा डोळा दिसत नाही. तुम्हीही या कथा ऐकल्या आणि वाचल्या तर त्या तुमच्या आयुष्यात अंमलात आणण्याची ही तुमच्यासाठी संधी आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला या सर्व बाह्य गोष्टींची काळजी वाटते, दुसरी गोष्ट म्हणजे कधी कधी परीक्षेतील अस्वस्थतेचे हे कारण असते, कधी मला वाटते की माझ्याकडे वेळ कमी आहे, तर कधी वाटते की मी अमुक एखादा प्रश्न आधी वाचला असता तर बरे झाले असते. तर यावर उपाय म्हणजे आधी संपूर्ण प्रश्नपत्रिका एकदा वाचून काढणे. मग कुठल्या उत्तरावर किती वेळ घालवायचा हे मनाशी ठरवा आणि त्याच पद्धतीने तुमचा वेळ ठरवा. आता तुम्ही जेंव्हा जेवता, जेवायला बसलो की वीस मिनिटात जेवायचं असा विचार करून घड्याळाकडे बघून थोडं खाता . त्यामुळे जेवताना सवय होते.हो भाऊ, 20 मिनिटे झाली आणि जेवणही झाले. त्यासाठी एखादे घड्याळ किंवा घंटा वाजते आणि म्हणते चला आता खायला सुरुवात करू, आता खाणे बंद करा, असे होत नाही. तर हे सरावातून होते. दुसरे म्हणजे, आजकाल मी पाहिलेली सर्वात मोठी समस्या. तुम्ही मला सांगा, जेव्हा तुम्ही परीक्षा द्यायला जाता तेव्हा तुम्ही शारीरिकदृष्ट्या काय करता? तुम्ही पेन हातात धरून शारीरिकरित्या लिहिता, तुम्ही तेच करता ना? मेंदू त्याचं काम करतो पण तुम्ही काय करता तर तुम्ही लिहता. आजच्या युगात आयपॅड, कॉम्प्युटर आणि मोबाईलमुळे माझी लिहिण्याची सवय हळूहळू कमी झाली आहे. पण परीक्षेत तर लिहावे लागते. याचा अर्थ असा की जर मला तुमच्याकडून परीक्षेची तयारी करून घ्यायची असेल तर मला तुमच्याकडून लेखनाचीही तयारी करून घ्यावी लागेल. आजकाल लिहिण्याची सवय असणारे फार कमी लोक आहेत. आता म्हणूनच तुम्ही शाळेनंतर तुमच्या अभ्यासात दररोज इतका वेळ घालवता. त्यातला कमीतकमी 50% वेळ, किमान 50% वेळ तुम्ही स्वतः तुमच्या वहीमध्ये काहीतरी लिहा. शक्य असल्यास त्याच विषयावर लिहीन असा प्रयत्न करा. लिहून झाल्यावर तुम्ही जे लिहिले आहे ते तीन-चार वेळा वाचा आणि ते जे लिहिले आहे ते दुरुस्त करा. त्यामुळे कोणाच्याही मदतीशिवाय तुमच्यात इतकी चांगली सुधारणा होईल की तुम्हाला नंतर लिहिण्याची सवय लागेल. त्यामुळे किती पाने लिहायची, लिहिण्यात किती वेळ घालवायचा, यावर तुमचे प्रभुत्व होईल. कधी कधी तुम्हाला वाटते की मला बरेच विषय माहित आहेत. समजा तुम्ही एक अतिशय प्रसिद्ध गाणे ऐकत आहात. एखादे गाणे वाजत असताना तुम्हाला असे वाटते की मला हे गाणे माहित आहे कारण तुम्ही ते अनेकदा ऐकले आहे. पण एकदा गाणं थांबवलं की ते गाणं कागदावर लिहा, तुम्हाला ते माहीत आहे का? तर तुला जाणवेल मित्रांनो की ऐकताना माझ्यात जो आत्मविश्वास होता, मला हे गाणं आवडतं मला हे गाणं येतं,पण प्रत्यक्षात मला ते माहित नव्हतं , मला तिथून काहीतरी सूचना मिळत होत्या, त्यामुळे मला ती ओळ आठवायची. आणि त्यातही जर हे सगळ अगदी अचूक असण्याबाबत बोलायचं झालं तर मी मागे राहीन.
मी माझ्या आजच्या पिढीतील माझ्या मित्रांना माझा आग्रह आहे की कृपया तुमच्या परीक्षेत एक मोठे आव्हान असते ते म्हणजे लिहणे. तुम्हाला किती आठवते, ते बरोबर होते की चूक , तुम्ही ते बरोबर लिहिता की चुकीचे लिहिता हा नंतरचा विषय आहे. तुम्ही सरावात यावर लक्ष केंद्रित करा. जर तुम्ही अशा काही गोष्टींवर लक्ष केंद्रित केले तर मला खात्री आहे की परीक्षा हॉलमध्ये बसल्यानंतर तुम्हाला कोणतीही अस्वस्थता किंवा दडपण जाणवणार नाही कारण तुम्हाला याची सवय आहे. जर तुम्हाला पोहणे माहित असेल तर तुम्हाला पाण्यात जाण्याची भीती वाटत नाही कारण तुम्हाला पोहणे माहित आहे. तुम्ही पुस्तकांमध्ये पाहिलं असेल की पोहणं असं होतं आणि तुम्हाला वाटतं, हो, मी वाचलंय की हात असं करतात, आधी दुसरा हात, मग तिसरा हात, मग चौथा हात. मग तुम्हाला वाटतं, हो, आधी हात, आधी पाय . तुम्ही मन लावून काम केले आहे, आत गेल्यावर पुन्हा त्रास सुरू होतो. पण जो पाण्यात सराव करायला लागतो, पाणी कितीही खोल असलं तरी तो पार करेल असा आत्मविश्वास असतो. आणि म्हणूनच सराव खूप महत्त्वाचा आहे, लेखनाचा सराव खूप महत्त्वाचा आहे. आणि तुम्ही जितके जास्त लिहाल तितकी त्याची तीक्ष्णता जास्त. तुमच्या विचारातही तीक्ष्णता येईल. आणि तुम्ही जे लिहिले आहे ते तीन-चार वेळा वाचा आणि स्वतः दुरुस्त करा. जितके तुम्ही स्वतःला दुरुस्त कराल तितकी तुमची त्यावर पकड वाढेल. त्यामुळे तुम्हाला आत बसण्यास कोणतीही अडचण येणार नाही. दुसरे म्हणजे अमुक कोणीतरी प्रचंड वेगाने लिहितो. मी अजून तिसऱ्या प्रश्नावर आहे, तो सातव्या प्रश्नावर गेला आहे. बाबांनो, यात वेळ वाया घालवू नका. तो 7वीत पोहोचला, तो 9वीला पोहोचला, तो करतो की नाही, तो सिनेमाची कथा लिहितो की नाही हे मला माहीत नाही, तुमचा स्वत:वर विश्वास आहे, तुम्ही स्वत:वर विश्वास ठेवा. शेजारी कोण काय करतो त्याचा विचार करू नका. तुम्ही जितके स्वतःवर लक्ष केंद्रित कराल तितके तुम्ही प्रश्नपत्रिकेवर लक्ष केंद्रित करू शकाल. तुम्ही प्रश्नपत्रिकेवर जितके जास्त लक्ष केंद्रित कराल तितकी तुमची उत्तरे शब्दानुरूप असतील आणि शेवटी तुम्हाला त्याचा लाभ मिळेल, धन्यवाद.
सादरकर्ता – धन्यवाद पंतप्रधान महोदय, तणाव व्यवस्थापनाचे हे सूत्र आपल्याला आयुष्यभर प्रेरणा देईल. पंतप्रधान महोदय, धीरज सुथार हा राजस्थान मधील राजसमंदचा एक विद्यार्थी जो कोंडवा येथील सरकारी वरिष्ठ माध्यमिक विद्यालयात शिकतो, तो आज या सभागृहात उपस्थित आहे आणि तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छितो.
धीरज, कृपया तुमचा प्रश्न विचारा.
धीरज सुथार – नमस्कार माननीय पंतप्रधान, मी धीरज सुथार आहे, मी राजस्थान मधील राजसमंद जिल्ह्यातील कोंडवा येथील सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयचा विद्यार्थी आहे. मी बारावीत शिकत आहे. व्यायाम आणि अभ्यास यांची सांगड घालत यासाठी वेळ कसा द्यावा हा माझा प्रश्न आहे, कारण शारीरिक स्वास्थ्य हे मानसिक आरोग्याइतकेच महत्त्वाचे आहे, कृपया मार्गदर्शन करावे, धन्यवाद सर.
पंतप्रधान – तुमची शरीरयष्टी पाहून असं वाटतंय की, तुम्ही मला अगदी योग्य प्रश्न विचारला आहे आणि तुम्हाला वाटणारी ही चिंताही बरोबरच आहे.
सादरकर्ता –धन्यवाद धीरज, आपल्या सांस्कृतिक परंपरा आणि बर्फाच्छादित डोंगररांगांवर तैनात राहण्याचे शौर्य दाखवण्याविषयी प्रसिद्ध असलेल्या उत्तर भारतातील प्रमुख केंद्रशासित प्रदेश लडाखच्या पीएम श्री केंद्रीय वि़द्यालयाची विद्यार्थिनी, नजमा खातून आपल्याबरोबर ऑनलाइन माध्यमाने जोडली गेली असून, ती पंतप्रधानांना प्रश्न विचारू इच्छिते. नजमा, कृपया आपला प्रश्न विचारावा.
नजमा खातून – माननीय पंतप्रधान जी, नमस्कार! माझं नाव नजमा खातून आहे. मी लडाखमधील कारगिल इथल्या पीएम श्री केंद्रीय विद्यालयात शिकते. मी इयत्ता दहावीची विद्यार्थिनी आहे. माझा आपल्याला असा प्रश्न आहे की, परीक्षेची तयारी आणि आरोग्यदायी जीवनशैली यांच्यामध्ये समतोल कसा साधता येईल? धन्यवाद!
सादरकर्ता – धन्यवाद, नजमा. ईशान्य भारतातील रत्न मानले जाणारे आदिवासी-बहुल राज्य, अरूणाचल प्रदेशातील नाहरलागून शासकीय उच्च माध्यमिक प्रशालेतील एक शिक्षिका तोबी लॉमी या सभागृहामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांना पंतप्रधानांना प्रश्न विचारण्याची इच्छा आहे.
तोबी लॉमी – नमस्कार माननीय पंतप्रधान जी, माझं नाव तोबी लॉमी आहे. मी एक शिक्षिका असून अरूणाचल प्रदेशातील नाहरलागून शासकीय उच्च माध्यमिक प्रशालेत शिकवते. माझा प्रश्न आहे, विद्यार्थ्यांना खेळामध्येच नाही तर अभ्यासामध्ये प्रामुख्याने कशाप्रकारे लक्ष्य केंद्रीत करता येईल, कृपया याविषयी मार्गदर्शन करावे, धन्यवाद सर!
सादरकर्ता – धन्यवाद मॅडम! पंतप्रधान जी, धीरज, नजमा आणि तोबी जी यांना अभ्यास आणि आरोग्यदायी जीवनशैली यांच्यामध्ये ताळमेळ कसा साधायचा, याविषयी आपल्याकडून मार्गदर्शन मिळावे, असे वाटते.
पंतप्रधान – आपल्यापैकी बहुतांश विद्यार्थी मोबाइल फोनचा वापर करीत असणार. आणि काही लोक असेही असणार की, कदाचित त्यांना अनेक तास मोबाइल वापरण्याची सवय झाली असणार. परंतु कधीतरी तुमच्या मनात असा विचार आला का? की, मी फोन चार्जिंगला लावला नाही तर आपोआपच माझा फोनचा वापर कमी होईल, आणि यासाठीच मी फोन रिचार्जही करणार नाही. जर मी फोन रिचार्ज केला नाही तर मोबाइल काम करू शकेल का? करेल का? तर मोबाइलसारखी रोज लागणारी वस्तू झाली आहे, हे खरेच आहे. मात्र त्यालाही चार्ज करावे लागतेच, हो की नाही? अरे, तुम्ही उत्तर द्या की! मोबाइल रिचार्ज करावा लागतो की नाही? जर मोबाइललाही रिचार्ज करावा लागत असेल तर या शरीरालाही रिचार्ज करायला हवे की नको? ज्याप्रमाणे फोनसाठी रिचार्ज करणे ही त्या फोनची आवश्यकता, गरज आहे, अगदी त्याचप्रमाणे आपल्या शरीरालाही चार्जिंगची अतिशय गरज असते. आता असा विचार करा की, नाही अभ्यास करायचा. बस्स! खिडकी बंद!! एखाद्या बसची खिडकी बंद केल्याप्रमाणे अभ्यासही बंद, इतर सर्व गोष्टी बंद! असे कधीही होवू शकत नाही. जीवनात असे काहीही होत नसते. आणि म्हणूनच आयुष्य जगताना थोडा समतोल साधावाच लागतो. काही लोक असे असतात की, ते फक्त खेळ एके खेळ असेच करत राहतात. ही गोष्टसुद्धा एकप्रकारे चुकीचीच आहे. मात्र ज्यावेळी आपल्याला परीक्षा द्यायची आहे, आणि विद्यार्थी दशेमध्ये या गोष्टीला म्हणजे परीक्षेलाही एक महत्व आहेच. परीक्षेसारखी गोष्ट आपण टाळू शकत नाही. परंतु आपले आरोग्य चांगले नसेल, तब्येत बरोबर नसेल आणि जर आपल्या शरीरामध्ये ताकद नसेल, परीक्षेसाठी एका आसनी तीस तास बसण्याइतके सामर्थ्यही आपल्यात राहणार नाही. परीक्षा देण्याची शारीरिक क्षमताच आपण हरवून बसू. आणि केवळ पाच मिनिटे असेच बसून रहावे लागेल. आणि म्हणूनच आरोग्यपूर्ण शरीर, मजबूत स्वस्थ मन यांच्यासाठी काही गोष्टी करणे अतिशय आवश्यक आहे. आता आरोग्यपूर्ण शरीर याचा अर्थ काही प्रत्येकाला काही कुस्ती करायची आहे, पैलवान व्हायचे आहे, असे अजिबात नाही. सर्वांनीच पैलवानासारखी कसरत करण्याची आवश्यकता नाही, मात्र रोजचे आयुष्य जगताना काही नियम निश्चित असतात. ते तुम्ही पाळले पाहिजेत. आता तुम्हीच कधीतरी विचार करावा की, तुम्ही किती काळ, किती वेळ मोकळ्या आकाशाखाली फिरता आणि स्वच्छ सूर्यप्रकाशामध्ये वेळ घालवता? जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल, काही वाचायचे असेल तर, पुस्तक हाती घेवून मोकळ्या जागी भरपूर सूर्यप्रकाशामध्ये काही वेळ जरूर बसावे. कधी-कधी आपले हे शरीर रिचार्ज करण्यासाठी सूर्यप्रकाशाचीही खूप गरज असते. असा प्रयत्न तुम्ही कधी केला आहे का? दैनंदिन नियम म्हणून काही झाले तरी दिवसा उजेडी मी थोडा वेळ तरी सूर्यप्रकाशात बसण्यासाठी काढणार, अशी संधी सोडणार नाही. यामुळे सूर्यप्रकाशाबरोबर माझे नाते कायम राहील. त्याच प्रकारे कितीही अभ्यास करायचा असो, वाचायचे राहिलेले असो, तरीही झोपेला गौण मानून चालणार नाही. ज्यावेळी तुमची आई, तुम्हाला सांगते की, ‘‘जा, आता झोपायला’’, तर आईने तुमच्या अभ्यासात व्यत्यय आणला आहे, असे अजिबात मानू नये. बहुतांश विद्यार्थ्यांना आईने ‘जा झोपायला’ म्हटले की, त्यांचा इगोला म्हणजेच अहंला धक्का लागल्यासारखे होते. अनेक मुलं आईला म्हणतात, ‘‘ तू कोण आहेस, मला झोपायला सांगणारी, उद्या मला परीक्षा द्यायची आहे, मी आज काही झोपणार नाही. तुला काय करायचंय, मी नाही झोपलो तरी? अस्संच तुम्ही घरामध्ये बोलता की नाही? जे असे बोलत नाहीत, त्यांनी – ‘‘नाही’’ म्हणावं आणि जे आईला अशाच आशयाचे काहीतरी बोलतात, त्यांनी; ‘‘हो… थोडंफार …!! असं म्हणावं. हे काय, कोणीच काही बोलत नाही. परंतु झोपेविषयी अशी गोष्ट घडते, हे पक्के आहे. झोपेच्या बाबतीत काय होतं की, एकदा का रील पहायला लागलो की, एका पाठोपाठ, दुसरा, तिसरा…मग पुढचे असे कितीतरी रील पहात आपण बसतो, समजतही नाही…. किती रील पाहतो, याविषयी माहिती लपवून ठेवावी वाटते ना?…. रीलमुळे किती वेळ गेला, हे लक्षातही येत नाही. यामुळे झोपही गेली, नंतर झोप लागतच नाही. हे लक्षातच येत नाही. म्हणजे सर्वात आधी काय निघाले – तर फोनमध्ये पहिल्यांदा रील. काढला. बराच वेळ, तुम्ही रील पाहत बसता. मात्र पाहिलेला पहिला रील काय होता, हे तुमच्या लक्षातही नसते. तुमची झोप चांगलीच उडालेली असते. एकूण काय तर आपण झोप महत्वाची मानत नाही. झोप दुय्यम, कमी मानून झोपेकडे दुर्लक्ष करतो.
आजच्या आधुनिक आरोग्य शास्त्राविषयी जाणून घेतले तर त्यामध्ये झोपेला अतिशय महत्व दिले जात असल्याचे दिसून येते. तुम्ही पुरेशी, आवश्यक झोप घेता की नाही घेत, ही गोष्ट तुमच्या निरामय आरोग्यासाठी अतिशय महत्वाची आहे. तुम्ही या गोष्टीकडे लक्ष्य केंद्रीत करण्याची गरज आहे. याचा अर्थ असाही नाही की, परीक्षा तर येतच राहणार आहे…. मोदीजींना भेटलो होतो, त्यांनी सांगितले की, झोप घ्या! आता इथंच अगदी कलात्मक पद्धतीने, हुषारीने शब्द तयार करायचा आणि घरी गेलं की लिहायचे — झोप काढा!! आई-बाबांना दाखवायचे — झोप काढा!! असे तर करणार नाही ना? एक सांगतो, कमी, अपुरी झोप आपल्या आरोग्यासाठी चांगली नाही. काही लोक खूप वरच्या टप्प्यापर्यंत पोहोचले आहेतही. त्यांनी आपल्या शरीराला तितके उंचीवर नेले आहे की, त्यांना कमी काळाची झोपही पुरते. मात्र सामान्य लोकांच्या दृष्टीने असे खूप वेळ जागृतावस्थेमध्ये राहणे अयोग्य आहे. पुरेशा झोपेची आपल्याला गरज असते.
एका गोष्टीसाठी तुम्ही सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे, तो म्हणजे, तुम्हाला जितकी गरज आहे, आणि जितका वेळ तुम्ही झोपणार आहे, त्यावेळी झोप पूर्ण झाली पाहिजे. आणि एक लक्षात घेतले पाहिजे की, आपण ज्यावेळी झोपतो ती ‘साउंड स्लीप’ असते का, म्हणजे अगदी गाढ झोप आपल्याला लागते की नाही, याकडे लक्ष दिले पाहिजे. गाढ झोप लागणे आवश्यक आहे. तुम्हाला नवल वाटेल,… हे शिक्षक बसलेले आहेत ना, वयाने ज्येष्ठ असलेले हे शिक्षकही ऐकून नक्कीच नवल व्यक्त करतील. आजही मला…इतके सर्व काम आहे,…. अर्थात तुम्हा लोकांइतके काम नाही, तरीही 365 दिवस, अगदी एकाही दिवसाचा अपवाद नाही…दररोज मी ज्यावेळी अंथरूणावर पाठ टेकतो, त्यावेळी अवघ्या 30 सेकंदामध्ये गाढ झोपेच्या स्वाधीन झालो नाही, असे झालेले नाही. म्हणजे गाढ झोपेचा टप्पा गाठण्यासाठी मला अवघे 30 सेकंद लागतात. इथे तर किती लहान वयाची मुले आहेत. त्यांच्यापैकी अनेकांना रोज अंथरूणावर पडल्यानंतर, कधी या कुशीवर, कधी त्या कुशीवर, कधी इकडे, कधी तिकडे असे केल्यानंतरही झोप आली तर येते, नाही तर येतच नाही. असा अनुभव नक्कीच येत असणार. मला लवकर गाढ झोप का बरं आणि कशी काय लागते? कारण मी ज्यावेळी जागृत अवस्थेमध्ये असतो, त्यावेळी मी पूर्ण जागृत असतो, अधिक दक्ष असतो, मी प्रत्येक कामामध्ये लक्ष्य केंद्रीत केलेले असते. म्हणजेच ज्यावेळी जागृत असेन त्यावेळी पूर्ण जागृत! आणि ज्यावेळी मी झोपतो, त्यावेळी पूर्णपणे गाढ झोपलेला असतो आणि झोपेचे संतुलन राखतो. आता जे वयाने ज्येष्ठ आहेत, त्यांनाही असे संतुलन साधणे त्रासदायक ठरू शकते. कारण आम्हाला झोपच येत नाही, अर्धा तास तर अशाच प्रकारे इकडून- तिकडे कूस बदलण्यात जातो, असे अनेकजण म्हणतात. परंतु झोपेचे संतुलन साधण्याचे काम तुम्ही करू शकता.
आणखी एक विषय आहे की, पोषक, समतोल आहार. आणि तुम्ही मंडळी ज्या वयोगटामध्ये आहात, त्या वयामध्ये शरीराच्या वाढीसाठी ज्या गोष्टींची, जीवनसत्वांची गरज आहे, ती सर्व सत्वे तुमच्या आहारात आहेत की नाही, हे लक्षात घेतले पाहिजे… एक गोष्ट पसंत आहे, म्हणून तोच पदार्थ खात राहणे, पोटात तोच पदार्थ भरणे …यामुळे त्या पदार्थाविषयी मन तर भरून जाते… परंतु शरीराच्या आवश्यक गरजा काही पूर्ण होतातच असे नाही.
10वी, 12वी चा हा कालखंड असा आहे, जेव्हा तुमच्याकडे परीक्षेचे वातावरण आहे तेव्हा एक गोष्ट निश्चित करा की माझ्या शरीराला जितकी गरज आहे तेवढी मी घेत आहे. आई-वडिलांनी देखील आपल्या मुलांना असे करू नये… नाही-नाही… आज तर हलवा बनवला आहे जरा जास्त खा. कधीतरी आई-वडिलांना देखील असे वाटते जास्त प्रमाणात खायला दिले की मूल जास्त खूष होते… अजिबात नाही, त्याचे शरीर…आणि यामध्ये श्रीमंती गरिबीचा मुद्दा नाही आहे, ज्या उपलब्ध गोष्टी असतात, त्यातूनच मिळत जाते. त्यामध्येच सर्व घटक असतात… कमीत कमी खर्चाच्या गोष्टी देखील असतात, ज्या आपल्या पोषणाची गरज भागवू शकतात आणि म्हणूनच आपल्या आहारात संतुलन… हे देखील आरोग्यासाठी तितकेच गरजेचे आहे.
आणि मग व्यायाम- आपण कुस्तीपटूंचे व्यायाम करत असो वा नसो, ती वेगळी बाब आहे… पण तंदुरुस्तीसाठी व्यायाम केले पाहिजेत, जसे दररोज दात घासता ना… तशाच प्रकारे कोणतीही तडजोड न करता…. व्यायाम केले पाहिजेत. मी काही मुले पाहिली आहेत, जी घराच्या गच्चीमध्ये जातात, पुस्तके घेऊन चालत राहतात… वाचत राहतात… दोन्ही कामे करतात…. यात काहीच चुकीचे नाही, ते अभ्यास देखील करतात आणि ऊन्हात चालणे देखील करतात… व्यायाम देखील होऊन जातो.
कोणता ना कोणता असा मार्ग निघाला पाहिजे, ज्यामध्ये तुमच्या शारीरिक हालचाली होत राहिल्या पाहिजेत. 5 मिनिटे, 10 मिनिटे, व्यायामासारख्या समर्पित शारीरिक हालचाली होत राहिल्या पाहिजेत. 5 मिनिटे, 10 मिनिटे व्यायामासारख्या समर्पित शारीरिक हालचाली केल्याच पाहिजेत. जास्त करू शकलात तर चांगली गोष्ट आहे. जर या गोष्टींना तुम्ही सहजतेने करू शकलात. परीक्षांच्या ताणामध्ये सर्व काही येथेच करू, हे नाही करणार असे नाही चालणार. संतुलित करा, तुम्हाला खूप फायदा होईल. धन्यवाद.
सादरकर्ता – पीएम सर तुम्ही तुमच्या एग्जाम वॉरियर मध्येही हाच संदेश दिला आहे…जितके खेळाल तितके फुलाल. धन्यवाद पीएम सर. रवींद्रनाथ टागोर, वंदे मातरमची अमर भूमि, समृद्ध कला-कौशल्याने भरपूर असलेले राज्य बंगालच्या नॉर्थ 24 परगणा येथील केन्द्रीय विद्यालयाची विद्यार्थिनी मधुमिता मल्लेख आपल्याला आभासी माध्यमातून प्रश्न विचारू इच्छित आहे. मधुमिता कृपया तुमचा प्रश्न विचारा.
मधुमिता– माननीय पंतप्रधान महोदय नमस्कार, माझे नाव मधुमिता मल्लेख आहे. मी पीएम श्री केंद्रीय विद्यालय बराकपूर लष्कर कोलकाता विभागाची 11वीं विज्ञानाची विद्यार्थिनी आहे. माझा तुम्हाला हा प्रश्न आहे की तुम्ही त्या विद्यार्थ्यांना कोणता सल्ला द्याल ज्यांच्या मनात आपल्या करियरविषयी अनिश्चितता आहे किंवा एखादी विशेष करियर किंवा व्यवसायाची निवड करण्याचा दबाव त्यांना जाणवत आहे. कृपया या विषयावर मला मार्गदर्शन करा. धन्यवाद महोदय.
सादरकर्ता – धन्यवाद मधुमिता. पीएम सर, भगवान कृष्णाची उपदेश भूमी, वीर बहादुर खेळाडूंचा प्रदेश असलेल्या हरियाणामधील पानीपतच्या द मिलेनियम स्कूल ची विद्यार्थिनी आदिती तन्वर, ऑनलाइन माध्यमातून आपल्यासोबत जोडलेली आहे आणि तुमच्याकडून मार्गदर्शनाची अपेक्षा करत आहे. आदिती कृपया आपला प्रश्न विचारा.
अदिति तनवर– माननीय पंतप्रधान महोदय, नमस्कार, माझे नाव अदिति तनवर आहे आणि मी द मिलेनियम स्कूल, पानीपत, हरियाणा ची अकरावीत शिकणारी विद्यार्थिनी आहे. माझा तुम्हाला असा प्रश्न आहे की मी humanities हा माझा विषय म्हणून निवडला आहे आणि त्यावरून लोक रोजच मला टोमणे मारत असतात. मला या विषयाची आवड आहे म्हणून मी तो निवडला आहे. पण कधी कधी अशा शेरेबाजीला तोंड देणे अवघड होऊन जाते. या सर्वांची हाताळणी कशी करू आणि कशा प्रकारे दुर्लक्ष करू. यामध्ये मला तुमचे मार्गदर्शन हवे आहे.धन्यवाद श्रीमान, नमस्कार.
सादरकर्ता –धन्यवाद अदिति. मधुमिता आणि अदिति तसेच यांच्यासारख्या काही विद्यार्थ्यांना जीवनात करियरची निवड करताना अशा दबावाचा अनुभव येतो, सर, एक विशेष करियर किंवा स्ट्रीम निवडण्याच्या मानसिकतेच्या दबावाच्या समस्येचे निराकरण कसे करायचे?
पंतप्रधान– मला नाही वाटत की तुम्ही स्वतः गोंधळलेले आहात. तुम्ही स्वतः संभ्रमात आहात असे मला वाटत नाही. वस्तुस्थिती ही आहे की तुमचा स्वतःवर विश्वास नाही आहे. तुमच्या विचारशक्तीविषयी तुम्ही द्विधा मनःस्थितीत आहात. म्हणून मग तुम्ही आता 50 लोकांना विचारत राहाता की हे केले तर… काय वाटेल, ते केले तर. तुम्ही स्वतःला ओळखलेले नाही आणि त्यामुळे तुम्ही दुसऱ्या कोणाच्या तरी सल्ल्यावर अवलंबून आहात आणि जी व्यक्ती जास्त चांगली वाटते, तुम्हाला ज्याचा सल्ला सर्वात सोपा वाटतो, तुम्ही त्याचाच अंगिकार करता. आता जसे मी सांगितले आहे की खेळलात तर खूप काही बनाल, जो संकल्प करून तुम्ही आता घरी जाल… मोदी जींनी सांगितले आहे की खेळा-खुलत रहा, खेळा-खुलत रहा. आता मी अभ्यास करणार नाही, बस… कारण त्याने आपली आवड ठरवून टाकली आहे.
मला असे वाटते की सर्वात वाईट स्थिती आहे ना, ती संभ्रमावस्था आहे, निर्णयक्षमतेचा अभाव आहे, निर्णयक्षमतेचा अभाव… तुम्ही पाहिले असेल, जुन्या काळापासून एक गोष्ट सांगितली जात होती… कोणी गाडी घेऊन जात होते आणि कुत्रा हे ठरवू शकत नव्हता की या बाजूला जाऊ… त्या बाजूला जाऊ आणि अखेर तो गाडीखाली सापडला. हेच होत आहे… जर त्याला माहीत असेल की त्याबाजूला गेलो तर तो ड्रायव्हरच त्याला वाचवेल.
पण तो या बाजूला गेला… त्या बाजूला गेला.. तिकडे गेला… मग तो ड्रायव्हर कितीही निष्णात का असेना, वाचवू शकणार नाही. आपल्याला या अनिश्चिततेपासून स्वतःचा बचाव केला पाहिजे, निर्णयक्षमतेच्या अभावापासून देखील बचाव केला पाहिजे. आणि निर्णय घेण्यापूर्वी सर्व गोष्टी… आपल्याला जितक्या तराजूवर तोलून पाहता येतील, तितक्या तोलून पाहिल्या पाहिजेत.
दुसरी गोष्ट म्हणजे, कधी-कधी काही लोकांना वाटते की अमुक गोष्ट अशी आहे… तमुक गोष्ट आहे… आता मला सांगा- स्वच्छतेचा विषय आहे, जर पंतप्रधानांच्या दृष्टीकोनातू पाहाल तर अगदीच किरकोळ विषय आहे की नाही? कोणीही म्हणेल… मित्रा, पीएमना इतकी सर्व कामे आहेत… ही स्वच्छता-स्वच्छता करत राहिले आहेत. पण ज्यावेळी मी त्यामध्ये आपले लक्ष घातले, प्रत्येक वेळी त्याला आपले महत्त्वाचे साधन बनवले… आज स्वच्छता देशाचा प्राईम अजेंडा बनला की नाही बनला? स्वच्छता तर लहान विषय होता, मी त्यामध्ये जीव भरला तर तो खूप मोठा बनला.
म्हणून आपण हा विचार करता कामा नये…. तुम्ही पाहिले असेलच की मी पूर्ण तर वाचू शकलो नाही, पण माझी नजर गेली त्यावेळी कोणीतरी म्हणाले की गेल्या दहा वर्षात कला आणि संस्कृतीच्या क्षेत्रात भारताची बाजारपेठ 250 पटीने वाढली आहे. आता यापूर्वीच्या काळात कोणी पेंटिंग करू लागले तर आई-वडील म्हणायचे आधी अभ्यास कर.
सुटीमध्ये पेंटिंग कर. त्याला तर असे वाटतच नसायचे की पेंटिंग देखील जीवनातील महत्त्वाचा विषय असू शकतो. आणि म्हणूनच आपण कोणत्याही गोष्टीला कमी लेखू नये आणि आपल्यामध्ये जर ताकद असेल तर आपण त्यामध्ये जीव निर्माण करू शकतो. आपल्यात सामर्थ्य असले पाहिजे आणि तुम्ही जे काम हाती घ्याल, त्यामध्ये मनापासून सहभागी व्हा. आपण अर्धे-अपूर्ण…मित्रा, त्याने ते घेतले… मी हे घेतले असते तर चांगले झाले असते. त्याने हे घेतले, मी हे घेतले असते तर बरे झाले असते. ही संभ्रमावस्था तुम्हाला अनेक संकटामध्ये ढकलू शकते.
दुसरा विषय म्हणजे आज राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने तुमच्यासाठी अनेक सुविधा उपलब्ध केल्या आहेत. तुम्ही एका क्षेत्रात प्रगती करत आहात, परंतु तुम्हाला वाटले की दुसऱ्या क्षेत्रात प्रयत्न करून बघू, तर तुमचा मार्ग बदलू शकता. तुम्हाला कुठेही अडकून राहण्याची गरज नाही, तुम्ही स्वतःहून प्रगती करू शकता. आणि त्यामुळे आता शिक्षणातही अनेक गोष्टी घडत आहेत.आता मी प्रदर्शन पाहत होतो, मुलांमधील प्रतिभा ज्याप्रकारे प्रकट झाली आहे ते प्रभावित करणारे आहे.
सरकारचे माहिती आणि प्रसारण मंत्रालय सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जे करत आहे… त्याहून अधिक या मुलांनी चांगल्या प्रकारे केले आहे. नारीशक्तीचे महत्त्व इतक्या उत्तम प्रकारे मांडले आहे. याचा अर्थ असा की कोणत्याही परिस्थितीत आपण निर्णयक्षम असायला हवे. आणि एकदा निर्णयक्षम होण्याची सवय लागली की कुठलाही गोंधळ उडत नाही. नाहीतर तुम्ही पाहिलं असेल की कधी कधी आपण कुटुंबासोबत रेस्टॉरंटमध्ये जातो…आठवून बघा तुम्ही …मला तर संधी मिळत नाही मात्र तुम्हाला मिळत असेल. जेव्हा तुम्ही एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जाता, तेव्हा आधी तुम्ही विचार करता मी हे मागवेन . मग तुम्हाला तुमच्या शेजारच्या टेबलावर काही दिसलं की तुम्ही म्हणता नाही, हे नको, मी हे मागवतो. तेवढ्यात तो वेटर ट्रेमध्ये काहीतरी वेगळं घेऊन जाताना दिसतो… तेव्हा , हे काहीतरी वेगळं आहे, नाही-नाही, हे काय आहे … अच्छा, माझे ते दोन रद्द करा हे घेऊन या. अशाने त्याचे कधीच पोट भरणार नाही. त्याला कधीच समाधान मिळणार नाही आणि जेव्हा डिश येईल तेव्हा त्याला वाटेल की याऐवजी आधीची डिश घेतली असती तर बरे झाले असते. जे लोक रेस्टॉरंट मधील डायनिंग टेबलवर निर्णय घेऊ शकत नाहीत ते कधीही रेस्टॉरंटचा किंवा जेवणाचा आनंद घेऊ शकत नाहीत, तुम्हाला निर्णय घ्यावे लागतात. जर तुमची आईने तुम्हाला रोज सकाळी विचारले की आज काय खायला बनवू आणि तिने तुम्हाला 50 प्रकारचे पदार्थ सांगितले … तुम्ही काय कराल? फिरून-फिरून तिथेच याल, रोज जेवता .. तेच सांगाल.
मला वाटतं आपण निर्णयक्षम बनण्याची सवय लावायला हवी. निर्णय घेण्यापूर्वी आपण 50 गोष्टीकडे बारकाईने पहायला हवं , त्याचे फायदे-तोटे लक्षात घ्यायला हवेत. फायदे-तोटे जाणून घेण्यासाठी कुणाला तरी विचारावं … आणि त्यानंतर आपण निर्णय घ्यायचा. आणि म्हणूनच गोंधळ कोणत्याही परिस्थितीत कोणासाठीही चांगला नाही. निर्णय घेऊ न शकणं हे आणखी वाईट असतं आणि आपण त्यातून बाहेर पडायला हवे. धन्यवाद.
सादरकर्ता – सर, निर्णयाच्या स्पष्टतेमध्ये यश दडलेले आहे… तुमचे हे वाक्य मला नेहमी लक्षात राहील. धन्यवाद. शांत समुद्रकिनारे, नयनरम्य रस्ते आणि सांस्कृतिक विविधतेसाठी प्रसिद्ध असलेले शहर पुदुच्चेरी येथील सरकारी उच्च माध्यमिक विद्यालय, सेदारापेट येथील विद्यार्थिनी डी. वर्सरी, या सभागृहात आपल्यामध्ये उपस्थित आहे आणि तिला प्रश्न विचारायचा आहे. दीपश्री कृपया तुझा प्रश्न विचार.
दीपश्री – नमस्कार , वणक्कम , माननीय पंतप्रधान साहेब .
पंतप्रधान– वणक्कम, वणक्कम
डी. वर्सरी– माझे नाव दीपश्री आहे. मी सेदारपेट पुडुचेरी येथील सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयात शिकत आहे. माझा प्रश्न असा आहे की आपण खूप मेहनत करत आहोत हा विश्वास पालकांमध्ये कसा निर्माण करायचा. धन्यवाद सर.
सादरकर्ता –धन्यवाद दीपश्री. पंतप्रधान जी, आम्ही मेहनत करत आहोत हा विश्वास पालकांमध्ये कसा निर्माण करायचा. दीपश्रीला या विषयावर तुमचे मार्गदर्शन हवे आहे.
पंतप्रधान : तुम्ही प्रश्न विचारला आहे, पण प्रश्नाच्या आड तुमच्या मनात आणखी एक प्रश्न आहे, जो तुम्ही विचारत नाही. दुसरा प्रश्न आहे की संपूर्ण कुटुंबात विश्वास नाही. विश्वासाचा अभाव आहे आणि याचा अर्थ तुम्ही खूप चांगल्या प्रकारे परिस्थिती मांडली आहे. मात्र तुम्ही अशा पद्धतीने मांडली की घरी कोणाला राग येणार नाही , मात्र ही शिक्षकांबरोबरच पालकांसाठीही विचार करण्याची गोष्ट आहे. कौटुंबिक जीवनात आपण विश्वासाचा अभाव अनुभवत आहोत याचे कारण काय आहे? कौटुंबिक जीवनातही विश्वासाची कमतरता जाणवत असेल, तर ती अत्यंत चिंतेची बाब आहे.
आणि हा विश्वासाचा अभाव अचानक होत नाही… बऱ्याच काळानंतर तो जाणवतो. आणि म्हणून प्रत्येक पालकाने, प्रत्येक शिक्षकाने, प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या आचरणाचे बारकाईने विश्लेषण करत रहायला हवं. माझ्या बोलण्यावर आईवडिलांचा विश्वास का बसत नाही… कधीतरी अशा गोष्टी घडल्या असाव्यात ज्यातून त्यांचे हे मत तयार झालं असावं. तुम्ही कधी म्हटले असेल मी माझ्या मैत्रिणीला भेटायला जात आहे आणि नंतर जर तुमच्या पालकांना कळले की तुम्ही तिच्याकडे गेलाच नाहीत , तर विश्वासाला तडा जायला सुरुवात होते. तिने तर सांगितले होते कि तिथे जाईन मात्र नंतर जेव्हा ती तिथे गेली नाही आणि तुम्ही सांगितले की मी ठरवले होते तिच्याकडे जायचे पण वाटेत माझे मन बदलले म्हणून मी दुसरीकडे गेले. तर विश्वासाचा अभाव असलेली परिस्थिती कधीच उद्भवणार नाही. आणि एक विद्यार्थी म्हणून आपण असा विचार नक्की केला पाहिजे की, असे तर नाही की मी म्हटले होते आई, तू झोप , काळजी करू नकोस, मी अभ्यास करेन. आणि जर आईने हळूच पाहिले की मी झोपलो आहे, तर विश्वास कमी होईल की तो तर म्हणत होता की मी अभ्यास करेन , पण तो अभ्यास करत नाही, झोपला आहे.
तुम्ही म्हणायचात की आई, मी आठवडाभर मोबाईलला हात लावणार नाही. पण आईला गुपचूप दिसत आहे .. मग विश्वास कमी होत जातो. तुम्ही जे म्हणता त्याचे खरोखरच पालन करता का? जर तुम्ही पालन करत असाल तर मला नाही वाटत की पालकांना किंवा शिक्षकांना अशा प्रकारच्या विश्वास कमी होणाऱ्या स्थितीला सामोरे जावं लागेल. तुमच्याबद्दल अविश्वास निर्माण होईल. पालकांनीही असाच विचार करायला हवा. काही पालकांना अशी सवय असते, उदाहरणार्थ, समजा आईने खूप छान जेवण बनवले आहे आणि मुलगा आला आहे, काही कारणास्तव त्याला जेवायची इच्छा नाही त्यामुळे खूप कमी खाल्ले आहे, तर आई काय म्हणेल ….हं , नक्कीच कुठूनतरी खाऊन आला असेल, नक्कीच कुणाच्या तरी घरी पोटभर जेवून आला असेल. मग त्याचे मन दुखावते आणि तो सत्य सांगत नाही. मग आईला बरं वाटावं म्हणून, ठीक आहे , बरं वाटेल , वाईट वाटेल, जेवढे जाईल तेवढे तोंडात टाकतो. हा अविश्वास निर्माण होतो. हा अनुभव प्रत्येक घरात येत असेल. तुम्हाला आईने, बाबांनी समजा पैसे दिले आणि तुम्हाला सांगितले की एक महिन्याचे हे 100 रुपये पॉकेटमनी देतो आणि मग दर तिसऱ्या दिवशी विचारले , तू त्या 100 रुपयांचे काय केलेस?… अरे बाबांनो, तुम्ही 30 दिवसांसाठी दिले आहेत ना, तो तुमच्याकडे मागायला आला नाही… त्यामुळे विश्वास ठेवा ना ….जर विश्वास नव्हता तर द्यायचे नव्हते. बहुतांश पालकांच्या बाबतीत हे घडते, ते दररोज विचारतात, अच्छा, ते 100 रुपये…हं , कुणी असे विचारू शकते, विचारण्याची पद्धत असते, कोणी म्हणतो – बेटा, त्या दिवशी पैसे नव्हते, मी तुला फक्त 100 रुपये दिले. तू काळजी करू नकोस , गरज भासली तर सांग. तेव्हा त्या मुलाला वाटले – नाही, नाही , माझ्या आई-वडिलांनी मला 100 रुपये दिले… बघा, तुमच्या पसंतीचा विषय निघाला तर तुम्ही टाळ्या वाजवता.
जर त्यांनी तोच प्रश्न विचारला, तुम्ही 100 चे काय केले, असे म्हणण्याऐवजी हे म्हणा… मग मुलगा म्हणेल नाही आई मुळीच नाही, माझ्याकडे पैसे आहेत, पुरेसे आहे. म्हणजे आपण एकमेकांशी कशाप्रकारे बोलतो. सामान्य जीवनात अनुभवल्या जाणाऱ्या या गोष्टी हळूहळू आपल्या दैनंदिन अपेक्षांच्या आणि शिक्षण व्यवस्थेच्या संघर्षात रूपांतरित होतात. मग तिथे गुण का नाही आलेत? तुम्ही वाचतच नसाल, तुम्ही लक्षच देत नसाल, तुम्ही वर्गात बसतच नसाल, तुम्ही तुमच्या मित्रांशी गप्पा मारत असाल. कदाचित पैसे असतील ते, चित्रपट पाहण्यात गेले असतील, मोबाईल फोनवर रील्स पाहत असाल. मग तो काहीतरी बोलू लागतो, मग अंतर वाढते, प्रथम विश्वास संपतो, नंतर अंतर वाढते आणि हे अंतर कधीकधी मुलांना नैराश्याकडे ढकलते. आणि म्हणूनच पालकांसाठी हे खूप महत्वाचे आहे.
त्याचप्रमाणे शिक्षक, शिक्षकांनीही मुलांशी इतके मोकळेपणाने वागले पाहिजे की ते सहजपणे स्वतःला व्यक्त करू शकतील, त्यांना एखादा प्रश्न समजला नाही तर शिक्षकांनी ओरडले, तुम्हाला काहीही समजणार नाही, म्हणून उर्वरित विद्यार्थ्यांचा वेळ वाया घालवू नका, जा बसा. कधीकधी शिक्षक देखील असे करतात की जी 4-5 हुशार मुले आहेत, त्यांना ते खूप आवडतात, त्यांच्यात मन रमते, बाकी वर्गात 20 मुले आहेत, 30 मुले आहेत, त्यांचे ते जाणोत. ते त्यांचे मन 2-4 जणांमध्येच अडकवतात, प्रत्येक गोष्ट, त्यांच्या निकालाबाबात ते त्यांचेच कौतुक करत राहतात. आता तुम्ही ते किती पुढे नेऊ शकता ही वेगळी बाब आहे, परंतु उर्वरित तेथून अधोदिशेने ढकलले जाते. आणि म्हणून कृपया सर्व विद्यार्थी तुमच्यासाठी सारखेच असावे . सर्वांच्या बाबतीत समान ट, होय, जो हुशार आहे तो आपोआप त्यातून अमृत शोषून घेईल. पण जर ज्याला सर्वात जास्त गरज आहे, त्याच्या गरजेनुसार आणि त्याच्यातही, मी म्हणेन त्याच्या गुणांची प्रशंसा करा.
एखादे मूल अभ्यासात पूर्णपणे कमकुवत असते, परंतु त्याचे हस्तलेखन चांगले असते, मग त्याच्या जागेवर जाऊन म्हणा, अरे, तू किती सुंदर लिहितोस, तुझे हस्तलेखन किती चांगले आहे, तू किती स्मार्ट आहेस. कधीकधी असा एखादा बुजरा विद्यार्थी असतो, त्याला म्हणा अरे यार, तुझे कापड एकदम कडक आहे, कापड खूप छान आहे. त्याच्या आत एक आत्मविश्वास निर्माण होईल, तो तुमच्यासमोर मोकळा होईल, तो तुमच्याशी बोलू लागेल, साहेबांचे माझ्याकडे लक्ष आहे. जर हे सहज वातावरण निर्माण झाले, मला असे वाटत नाही, परंतु ही तितकीच विद्यार्थ्यांचीही जबाबदारी आहे, अशा कोणत्या गोष्टी होत्या ज्यामुळे माझ्या कुटुंबाचा माझ्यावरील विश्वास उडाला याचे आपण आत्मपरीक्षण केले पाहिजे.
कोणत्याही परिस्थितीत आपले आचरण, आपल्या कुटुंबाचा किंवा शिक्षकांचा आपल्यावरील विश्वास उडू नये; आपल्याच्याने काही झाले नाही तर आपण तसे बोलले पाहिजे. दुसरं, मला वाटतं कुटुंबात एक प्रयोग करता येईल… समजा तुमच्या मुलाला किंवा मुलीला 5 मित्रमैत्रिणी असतील तर ठरवा की महिन्यातून एकदा पाचही कुटुंबं एका कुटुंबात 2 तास जमतील, पुढच्या महिन्यात दुसऱ्या कुटुंबात. अगदी स्नेहसंमेलन करु. आणि त्यात सर्व असतील, मुले, वृद्ध, असे नाही की आम्ही दोन लोकांना घरी सोडून येऊ, जर 80 वर्षांचे पालक शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असतील तर ते येऊ शकतात, त्यांना देखील घेऊन या. आणि मग ठरवा की आज तिसऱ्या मित्राची आई एक सकारात्मक पुस्तक वाचेल आणि त्याची कथा सांगेल. पुढच्या वेळी, मित्र क्रमांक 4 च्या वडिलांनी एखादा सकारात्मक चित्रपट पाहिला असेल तर ते त्याची कथा सांगतील हे ठरवा.
जेव्हा जेव्हा तुम्ही तासभर एकत्र याल तेव्हा काही संदर्भ घेऊन फक्त आणि फक्त सकारात्मक गोष्टींवर उदाहरण देऊन चर्चा करा, तिथे इतर कोणाच्याही संदर्भाने नाही. तुम्हाला दिसेल की सकारात्मकता हळूहळू झिरपत जाईल. आणि ही सकारात्मकता फक्त तुमच्या मुलांप्रतीच नाही तर तुमच्यात विश्वासाचे असे वातावरण निर्माण होईल की तुम्ही सर्वजण एक एकक व्हाल, एकमेकांना मदत कराल आणि असे प्रयोग होत राहावेत असा माझा विश्वास आहे. धन्यवाद.
सादरकर्ता – माननीय पंतप्रधान जी, कुटुंबावरचा विश्वास महत्त्वाचा आहे, तुमच्या हा संदेश घराघरात आनंद घेऊन येईल. धन्यवाद पंतप्रधान साहेब. छत्रपती शिवाजी महाराज आणि समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांचे जन्मस्थान असलेल्या महाराष्ट्रातील पुण्यनगरी पुण्यातील एक पालक श्री चंद्रेश जैन हे ऑनलाइन माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी होत आहेत आणि माननीय पंतप्रधान जी, त्यांना तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. चंद्रेश जी कृपया तुमचा प्रश्न विचारा.
चंद्रेश जैन- माननीय पंतप्रधान. तुम्हाला माझा प्रणाम. माझे नाव चंद्रेश जैन आहे, मी एक पालक आहे. माझा तुम्हाला एक प्रश्न आहे, तुम्हाला असे वाटत नाही का की आजकालच्या मुलांनी त्यांच्या मेंदूचा वापर करणे सोडून दिले आहे, कारण सर्व काही त्यांच्या बोटांच्या टोकावर उपलब्ध असल्याने ते तंत्रज्ञानावर अधिक अवलंबून राहू लागले आहेत? या तरुण पिढीने तंत्रज्ञानाचे गुलाम नव्हे तर स्वामी बनले पाहिजे याची जाणीव कशी करून देणार? कृपया मार्गदर्शन करावे. धन्यवाद.
सादरकर्ता – धन्यवाद चंद्रेश जी. आदिवासी जमातीचे लोकनायक स्वातंत्र्यसैनिक बिरसा मुंडा यांचे जन्मस्थान असलेल्या झारखंडच्या रामगड जिल्ह्यातील पालक श्रीमती पूजा श्रीवास्तव या ऑनलाइन माध्यमातून या कार्यक्रमाशी जोडल्या गेल्या आहेत आणि माननीय पंतप्रधान त्यांना तुम्हाला प्रश्न विचारून त्यांच्या शंकांचे निरसन करायचे आहे. पूजा, तुमचा प्रश्न विचारा.
पूजा श्रीवास्तव– नमस्कार.
माननीय पंतप्रधान महोदय. माझे नाव कुमारी पूजा श्रीवास्तव आहे. मी झारखंडमधील रामगढ येथील श्री गुरुनानक पब्लिक स्कूलमध्ये शिकणारी प्रियांशी श्रीवास्तव हिची पालक आहे. महोदय, मला विचारायचे आहे की इंस्टाग्राम, स्नॅपचॅट, ट्विटर यासारख्या सोशल मीडिया मंचाचा वापर करून मी माझ्या मुलीचे शिक्षण कसे व्यवस्थापित करू शकते. कृपया मला यासाठी मार्गदर्शन करा. धन्यवाद महोदय.
सादरकर्ता – धन्यवाद महोदया. हिमाचल प्रदेशच्या शिवालिक डोंगररांगाच्या पायथ्याशी वसलेल्या हमीरपूर जिल्ह्यातील टी. आर. डी. ए. व्ही. कांगू शाळेतील अभिनव राणा ऑनलाईन संपर्क साधत आहे आणि पंतप्रधान जी त्यांना तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. अभिनव कृपया तुमचा प्रश्न विचारा.
अभिनव राणा- माननीय पंतप्रधान सर नमस्कार. माझे नाव अभिनव राणा आहे, मी हिमाचल प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यातील टी. आर. डी. ए. व्ही. कांगू सार्वजनिक वरिष्ठ माध्यमिक शाळेचा विद्यार्थी आहे. सर, माझा प्रश्न असा आहे की आपण विद्यार्थ्यांना परीक्षेचा ताण प्रभावीपणे व्यवस्थापित करण्यासाठी कसे शिक्षित आणि प्रोत्साहित करू शकतो, तसेच अभ्यासाच्या मौल्यवान कालावधीत लक्ष विचलित होऊ न देता शिकण्याचे साधन म्हणून फायदेशीर मोबाइल तंत्रज्ञान कसे वापरू शकतो. धन्यवाद सर.
सादरकर्ता – धन्यवाद अभिनव. पंतप्रधान जी, चंद्रेश जैन, पूजा आणि अभिनव यांच्यासारखे अनेक जण जीवनात सोशल मीडिया आणि तंत्रज्ञानाच्या वाढत्या दबावाच्या परिस्थितीमुळे त्रस्त आहेत. तंत्रज्ञानावरील अवलंबित्व आणि अतिवापरामुळे होणाऱ्या दुष्परिणामांपासून त्यांनी कसा बचाव करावा ? कृपया या संदर्भात योग्य मार्गदर्शन करावे.
चांगल्या गोष्टी दाखवा आणि नंतर तुम्ही भलतेच काही करा. असे करू नये. काय चालले आहे, हे आपल्या संपूर्ण कुटुंबाला माहिती असले पाहिजे. आपला मोबाईल फोन लॉक करण्याचा जो नंबर असतो तो घरातील सर्वांना माहिती असला तर काय नुकसान होईल? कुटुंबातील प्रत्येक सदस्याला प्रत्येक मोबाईलचा.. इतकी पारदर्शकता असेल तर आपण अनेक वाईट गोष्टींपासून वाचू शकता. म्हणजे काय तर प्रत्येकाचा मोबाईल वेगवेगळा असला तरी प्रत्येकाला त्याचा कोड माहिती असेल. ही एक चांगली गोष्ट होऊन जाईल.
दुसरे म्हणजे आपण आपला स्क्रीन टाईम मॉनिटर करणारी जी ॲप्स असतात, ती डाऊनलोड करून ठेवा. आपला स्क्रीन टाईम आज इतका झाला, आपण या गोष्टीसाठी इतका वेळ दिला, याची माहिती ते ॲप देईल. आपण किती वेळ घेतला, याचा मेसेज स्क्रीनवर दिसू लागेल. तो आपल्याला सतर्क करत राहतो. अलर्ट देणारी अशी अनेक टूल्स आहेत, ती आपण आपल्या गॅजेट सोबत जोडली पाहिजेत, जेणेकरून आपल्यालाही समजत राहील, अरे खूपच जास्त वेळ झाला. आता मी थांबले पाहिजे.. कमीत कमी ते आपल्याला अलर्ट करत राहते. त्याचवेळी त्याचा सकारात्मक उपयोग कशाप्रकारे करता येईल. समजा मी काही लिहीत आहे, पण मला एक चांगला शब्द मिळत नाही आणि अशावेळी मला शब्दकोशाची आवश्यकता असते.
मी डिजिटल यंत्रणेचा वापर करून त्याचा उपयोग करू शकतो. समजा की मी गणित करत आहे आणि मला गणिताचे एखादे सूत्र आठवत नाही. चला, मी डिजिटल गॅजेटची मदत घेतली आणि त्याला विचारले, तर त्याचा फायदाच होईल. पण जर मला माझ्या मोबाईल मध्ये काय आहे, हे ठाऊकच नसेल, तर मी त्याचा उपयोग कसा करू शकेन? आणि म्हणूनच मला तर वाटते की कधीकधी वर्गात सुद्धा मोबाईलच्या सकारात्मक गोष्टी काय आहेत, सकारात्मकतेने वापरता येण्यासारख्या कोणत्या गोष्टी आहेत, अशा विषयावर दहा-पंधरा मिनिटांची चर्चा वर्गात केली पाहिजे. एखादा विद्यार्थी आपला अनुभव सांगेल की मी अमुक एक संकेतस्थळ पाहिले, आपल्यासाठी, विद्यार्थ्यांसाठी ते खूप चांगले संकेतस्थळ आहे. मी अमुक वेबसाईट पाहिली, अमुक विषयासाठी तिथे खूप चांगले शिकवले जाते, चांगले धडे दिले जातात. समजा आपण प्रवासाला निघालो आहोत. प्रवासाचा कार्यक्रम आपल्याकडे आहे आणि मुले चालली आहेत की चला, आता आपण जैसलमेर येथे जात आहोत. सर्वांना सांगितले जावे की जरा ऑनलाइन या बरे, आणि जैसलमेरचा संपूर्ण प्रकल्प अहवाल तयार करा. तर त्याचा सकारात्मक उपयोग करण्याची सवय लावून घेतली पाहिजे. तुमच्या सहाय्यासाठी अनेक व्यवस्था उपलब्ध आहेत आणि तुम्ही त्याचा वापर केला पाहिजे, असे वाटले पाहिजे. जितक्या जास्त सकारात्मकतेने तुम्ही उपयोग कराल, तितका जास्त लाभ आपल्याला होईल, आणि मी आग्रहाने सांगतो की आपण त्यापासून पळ काढायचा नाही. मात्र आपण प्रत्येक गोष्टीचा वापर विवेकाने तसेच कुटुंबामध्ये पारदर्शकता ठेवून करावा. जितकी जास्त पारदर्शकता राहील, तितके चांगले. लपवाछपवी केली जात असेल तर त्याचा अर्थ काहीतरी गडबड आहे. जितकी जास्त पारदर्शकता असेल तितका त्याचा जास्त लाभ होईल. अनेकानेक आभार.
सादरकर्ता – पी एम सर, यश मिळवण्यासाठी जीवनात संतुलन अतिशय महत्त्वाचे आहे. हा मंत्र आपल्याला योग्य मार्गावर अग्रेसर करेल. धन्यवाद. महाकवी सुब्रमण्यम भारती यांची जन्मभूमी तमिळनाडूची राजधानी चेन्नई मधील मॉडेल सीनियर सेकंडरी स्कूलचे विद्यार्थी एम वागेश ऑनलाइन माध्यमातून आपल्या सोबत आहेत आणि पंतप्रधानजी, ते आपणाला प्रश्न विचारू इच्छितात. एम वागेश, कृपया तुमचा प्रश्न विचारा.
एम वागेश – आदरणीय पंतप्रधान महोदय नमस्ते, माझे नाव एम. वागेश आहे. मी चेन्नईमधील नांगनल्लूर येथील मॉडर्न उच्च माध्यमिक विद्यालयात शिकतो. माझा प्रश्न असा आहे की, पंतप्रधान पदासारख्या सर्वात शक्तिशाली पदावर काम करताना येणारा ताण आणि दबाव यांना तुम्ही कसे हाताळता, ताणावर नियंत्रण मिळवण्याच्या संदर्भात तुम्हाला कोणता महत्त्वाचा घटक उपयुक्त ठरतो? धन्यवाद.
पंतप्रधान – तुलाही व्हायचे आहे की काय? तशी तयारी करत आहेस का?
सादरकर्ता – धन्यवाद एम. वागेश. आजच्या कार्यक्रमातील शेवटचा प्रश्न. देवभूमी उत्तराखंड तेथील नैसर्गिक संपत्तीसाठी प्रसिद्ध आहे. तेथील उधम नगर मध्ये असलेल्या डायनेस्टी मॉडर्न गुरुकुल अकादमीची विद्यार्थिनी स्नेहा त्यागी ऑनलाईन माध्यमातून आपल्याशी जोडली गेली आहे आणि पंतप्रधानांना प्रश्न विचारू इच्छिते आहे. स्नेहा, कृपया तुझा प्रश्न विचार.
स्नेहा त्यागी – आपण दिव्य आहत, अतुलनीय आहात, दुर्दम्य साहसाचे रूप आहात आपण. युगायुगांचे निर्माते, अद्भुत भारताचे भविष्य आहात आपण. आदरणीय पंतप्रधान मोदी यांना देवभूमी उत्तराखंडहून माझा नमस्कार. माझे नाव स्नेहा त्यागी आहे. मी उधम सिंग नगर मधील खातिमा, चिंकी फार्म येथील डायनेस्टी मॉडर्न गुरुकुल अकादमीमध्ये सातव्या इयत्तेत शिकणारी विद्यार्थिनी आहे. आदरणीय पंतप्रधानांना मी असे विचारू इच्छिते की, आम्ही त्यांच्याप्रमाणे सकारात्मक कसे होऊ शकतो? धन्यवाद महोदय.
सादरकर्ता – धन्यवाद स्नेहा. पंतप्रधान महोदय, तुम्ही तुमच्या व्यस्त जीवनात ताणतणाव कसा हाताळता आणि इतक्या प्रमाणात ताण असताना देखील नेहमी सकारात्मक कसे राहू शकता, तुम्ही हे सर्व कसे साध्य करू शकता, पंतप्रधान जी, कृपया तुमच्या सकारात्मक उर्जेचे रहस्य आम्हाला सांगा.
पंतप्रधान – या प्रश्नांची अनेक उत्तरे असू शकतात. एक तर पंतप्रधान असलेल्या व्यक्तीला किती ताण असतो हे तुम्हाला माहित आहे ही गोष्ट मला चांगली वाटली. नाहीतर तुम्हाला वाटत असेल, यांच्यासाठी विमान आहे, हेलिकॉप्टर आहे, इथून तिथे जायचे असते, हे-हे करायचे असते. पण सकाळ संध्याकाळ सतत किती काम असते हे तुम्हाला माहित आहे. खरेतर प्रत्येकालाच आयुष्यात स्वतःच्या परिस्थिती खेरीज अशाही अनेक गोष्टींचे व्यवस्थापन करावे लागते. त्याने कधी विचारही केला नसेल अशा गोष्टी त्याच्या व्यक्तिगत आयुष्यात, कौटुंबिक जीवनात सामोऱ्या येतात आणि मग त्याला त्यावर उपाय शोधावे लागतात. आता अशा वेळी, काही लोकांचा स्वभाव असा असतो की, बाबा रे, खूप मोठे वादळ आले आहे, चला काही क्षण शांत राहूया, वादळ शांत होऊन जाईल, किंवा एखादे संकट आले आहे, मान खाली घालून तिकडे दुर्लक्ष करा, ती वेळ टळेल. असे लोक कदाचित जीवनात काहीही साध्य करू शकत नाहीत. माझा मात्र असा स्वभाव नाही आहे, आणि हा स्वभाव मला नेहमीच उपकारक वाटला आहे की मी प्रत्येक आव्हानालाच आव्हान देत असतो. संकट टळेल, परिस्थिती सुधारेल याची वाट बघत मी शांत झोपून राहत नाही. आणि या स्वभावामुळे मला नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात. प्रत्येक परिस्थिती हाताळण्याची नवी पद्धत, नवे प्रयोग, नवी नीती शोधून काढण्याचा माझा सहज स्वभाव एक प्रकारे माझाच विकास घडवत जातो. दुसरे म्हणजे माझ्यात खूप मोठ्या प्रमाणात आत्मविश्वास आहे. मी नेहमीच म्हणतो की, काहीही झाले तरी 140 कोटी देशबांधव माझ्यासोबत आहेत. जर 10 कोटी आव्हाने असतील तर त्यावर अब्जावधी उपाययोजना देखील आहेत. मी एकटाच आहे असे मला कधीच वाटत नाही, जे काम आहे ते मलाच करायचे आहे असेही मला कधी वाटत नाही. मला नेहमीच माहित असते की माझा देश सामर्थ्यशाली आहे, माझ्या देशातील लोक सामर्थ्यवान आहेत, माझ्या देशातील लोकांच्या बुध्दीचे सामर्थ्य अमाप आहे आणि आम्ही कोणत्याही आव्हानाला यशस्वीपणे तोंड देऊ. माझ्या विचारांचा हाच मुलभूत पिंड आहे; आणि याच कारणाने मला असे कधीच वाटत नाही की अरे बापरे, माझ्यासमोर हे संकट आले आहे आता मी काय करू? त्यावेळी मला असे वाटते, की, आपण एकटे नाही आहोत, 140 कोटी लोक आहोत, निभावून नेऊ. अर्थात मलाच आघाडीवर राहावे लागेल आणि काही चुकीचे घडले तर मलाच दोष दिला जाईल, ठीक आहे; पण माझ्या देशाकडे ताकद आहे आणि म्हणूनच मी माझी शक्ती देशाची ताकद वाढवण्याच्या कामी खर्च करत आहे; आणि जितके मी माझ्या देशबांधवांचे सामर्थ्य वाढवीन तितकीच आव्हानांना आव्हान देण्याची आपली ताकद वाढत जाईल. भारताच्या आतापर्यंतच्या प्रत्येक सरकारला गरिबीच्या संकटाचा सामना करावा लागलेला आहे. आपल्या देशात हे संकट नेहमीच होते आणि आहे. मात्र मी घाबरून गेलो नाही. मी त्यावर उपाय शोधला. आणि मी असाही विचार केला की सरकार असे कोण आहे जे गरिबी दूर करणार. जेव्हा माझ्या देशातील प्रत्येक गरीब व्यक्ती गरिबीतून बाहेर पडण्याचा मनोमन निश्चय करेल तेव्हाच गरिबी दूर होईल. आता तो फक्त स्वप्नच पाहत राहील तर गरिबी दूर होणार नाही. तर अशावेळी माझ्यावर अशी जबाबदारी येते की मी त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याला सक्षम बनवले पाहिजे, त्याला राहायला पक्के घर देणे, शौचालयाची सोय करून देणे, शिक्षणाची व्यवस्था करणे, आयुष्मान योजनेचा लाभ मिळवून देणे, त्याला घरात नळाने पाणी उपलब्ध करुन देणे या गोष्टी केल्या पाहिजेत. ज्या गोष्टींसाठी त्याला दैनंदिन जीवनात संघर्ष करावा लागतो आहे त्यातून जर मी त्याला सुटका मिळवून दिली, त्याला सशक्त केले तर त्यालाही वाटेल की आपली गरिबी गेली, आता मी यातून कसाही बाहेर पडेन. तुम्ही पाहताच आहात की या दहा वर्षांच्या माझ्या कार्यकाळात देशातील 25 कोटी व्यक्ती दारिद्र्यरेषेच्या बाहेर पडल्या आहेत. आता इतर लोकांनी जशी ही परिस्थती जैसे थे ठेवून वेळ घालवला तसाच मीही घालवू शकलो असतो. आणि म्हणून मी असा प्रयत्न करत असतो की आपण आपल्या देशाच्या सामर्थ्यावर, देशातील साधनसंपत्तीवर विश्वास ठेवला पाहिजे. जेव्हा आपण या सगळ्या गोष्टी घडताना पाहतो तेव्हा आपण स्वतःला एकटे समजत नाही. मी काय करू? मी कसे करु? अरे, मी तर केवळ एक चहा विकणारा माणूस आहे, मी काय करू शकतो? असा विचार मी करू शकत नाही. मला स्वतःबद्दल पूर्ण विश्वास असला पाहिजे आणि म्हणूनच पहिली गोष्ट अशी आहे की ज्यांच्यासाठी तुम्ही हे सर्व करता आहात त्यांच्यावर देखील तुम्हाला असलेला अपार विश्वास. दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्याजवळ नीर-क्षीर विवेक असायला हवा. काय योग्य, काय अयोग्य, कोणती गोष्ट आज गरजेची आहे तर कोणती आत्ता केली नाही नंतर केली तरी चालेल, हे ठरवता यायला हवे. प्राधान्यक्रम ठरवण्याची क्षमता तुमच्यात असायला हवी. ती अनुभवाने येते, प्रत्येक गोष्टीचे विश्लेषण करण्यातून येते, दुसरे काम म्हणजे मी हे विश्लेषण करत असतो. तिसरी गोष्ट म्हणजे, काही चूक झाली तरी मी म्हणतो की माझ्यासाठी हा एक धडा आहे. मी त्या चुकीमुळे निराश होत नाही. आता तुम्ही विचार करा, कोविडचे संकट केवढे भयंकर होते, सामान्य आव्हान नव्हते ते. संपूर्ण जगच त्याच्या विळख्यात अडकले होते. आता माझ्यासाठी स्थिती अशी होती की, काय करावे, ही तर जागतिक महामारी आहे, जगभरात पसरली आहे, ज्याने त्याने आपापल्या परीने तोंड द्यावे, असे बोलू की काय, पण मी असे केले नाही. रोज दूरचित्रवाणीवर देशवासियांना दिसत राहिलो, त्यांच्याशी बोलत राहिलो, कधी टाळ्या वाजवायला सांगितल्या, कधी थाळ्या वाजवायला सांगितल्या तर कधी दिवे लावायला सांगितले. या गोष्टी काही कोरोनाला संपवू शकत नाहीत. पण अशा गोष्टी कोरोनाविरुध्द लढा देण्यासाठी सामुहिक शक्ती निर्माण करतात. सामुहिक शक्तीची उभारणी करणे महत्त्वाचे आहे. आठवून पहा, पूर्वी आपल्या देशातील लोक खेळाच्या मैदानात उतरत असत, एखादा जिंकून येत असे, एखादा जिंकून येत नसे. जाणाऱ्याला कोणी विचारत नसे, आणि येणाऱ्याची सुद्धा कोणी विचारपूस करत नसे.
मी म्हटले यांनी तीन पदके जिंकून आणली याचा मी सर्वत्र नक्कीच गाजावाजा करेन. तर हळूहळू 107 पदके आणण्याचे सामर्थ्य याच मुलांमधून सामोरे आले. सामर्थ्य तर होतेच, योग्य दिशा, योग्य रणनीती, योग्य नेतृत्व फलदायी ठरते. ज्याच्याकडे जे सामर्थ्य आहे त्याचा योग्य उपयोग करायला हवा. प्रशासनाप्रती माझे एक तत्व आहे, उत्तम रीतीने सरकार चालवण्यासाठी, या समस्यांचे निराकरण करण्यासाठीही आपल्याला तळापासून वरच्या दिशेने योग्य माहिती आली पाहिजे, अचूक माहिती आली पाहिजे आणि वरून खालच्या दिशेने अचूक मार्गदर्शन गेले पाहिजे. ही दोन चॅनेल व्यवस्थित राहिली, त्यांच्यातला संवाद, व्यवस्था, नियमावली ठीक सांभाळली तर आपण गोष्टी नीट सांभाळू शकतो.
कोरोना एक मोठे उदाहरण आहे. जीवनात आपल्याला निराश होण्याचे कारणच नाही, असे माझे म्हणणे आहे आणि एकदा मनात ठाम निश्चय केला की निराश व्हायचे नाही, तर सकारात्मकतेशिवाय मनात काही येतच नाही आणि माझ्याकडे तर निराशेचे सर्व दरवाजे बंद आहेत. एखादा कोपरा, एखादी छोटी खिडकीही मी खुली ठेवली नाही की ज्यातून निराशा प्रवेश करू शकेल. आपण आणखी एक पाहिले असेल मी कधी निराशेचे रडगाणे गात बसत नाही. काय होईल माहित नाही, आपल्यासमवेत येईल की नाही, आपल्याशी टक्कर घेईल का, हे तर चालतच राहते. म्हणुनच माझे म्हणणे आहे जीवनात आत्मविश्वासाने परिपूर्ण आणि आपल्या लक्ष्याच्या दिशेने ठाम राहायला हवे. दुसरी गोष्ट म्हणजे वैयक्तिक स्वार्थ नसेल, तर निर्णय घेताना द्विधा मनःस्थिती होत नाही. ही एक मोठीच ठेव माझ्या कडे आहे. माझे काय, मला काय, याच्याशी माझे देणे-घेणे नाही, फक्त आणि फक्त देशासाठी करायचे आहे आणि आपणासाठी करायचे आहे, जेणे करून आपल्या आई-वडिलांना ज्या समस्यांना तोंड द्यावे लागले त्या आपल्याला सोसाव्या लागू नयेत, असे मला वाटते. मित्रांनो, आपल्याला असा देश घडवायचा आहे ज्यामुळे आपल्या भावी पिढीला, आपल्या मुलाबाळांमध्ये अशी भावना राहिली पाहिजे की आपण अशा देशात आहोत, जिथे आपल्या कलागुणांना वाव मिळेल, आपण आपल्या सामर्थ्याचे दर्शन घडवू शकू. आपणा सर्वांचाच हा सामूहिक संकल्प असला पाहिजे आणि त्याचा परिणाम नक्कीच दिसून येतो.
म्हणूनच मित्रांनो, जीवनात सकारात्मक विचारांचे फार मोठे सामर्थ्य असते. वाईटातल्या वाईट गोष्टींकडेही सकारात्मकतेने पाहता येऊ शकते. आपण तसे पाहायला हवे. धन्यवाद.
सादरकर्ता- पीएम सर, आपण अत्यंत सहज आणि सुलभतेने आमच्या सर्व प्रश्नांचे निराकरण केले. आम्ही सर्व पालक आणि शिक्षक आपले सदैव ऋणी राहू. आम्ही नेहमी ‘एक्झाम वॉरियर्स’ राहू, ‘वरीयर’ नव्हे. धन्यवाद माननीय पंतप्रधान जी.
पंतप्रधान- झाले सारे प्रश्न?
सादरकर्ता – काही पक्षी उडत आहेत वादळ वाऱ्यात, काही पक्षी उडत आहेत वादळ वाऱ्यात, त्यांच्याकडे सामर्थ्य आहे योग्य आणि हिंमत आहे जरूर, अशा प्रकारे नित्य आगेकूच करत राहिले तर आपण पहाल एक दिवस, निश्चित सागरापर्यंतचे अंतर कमी होईल जरूर, निश्चित सागरापर्यंतचे अंतर कमी होईल जरूर.
पंतप्रधान – आपण पाहिले असेल ही मुले ज्याप्रकारे सूत्र संचालन करत आहेत, आपणही आपल्या शाळा-महाविद्यालयात हे करू शकता. त्यांच्या कडून जरूर शिका.
सादरकर्ता – ‘परीक्षा पे चर्चा 2024’च्या या यशस्वी सकाळचा समारोप करताना माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांच्या मौल्यवान आणि प्रेरक मार्गदर्शनाबद्दल त्यांच्याप्रती आम्ही मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो.
पुस्तकात वर्णिल्याप्रमाणे पंतप्रधान सरांनी शिकवण्याची वैशिष्ट्येच आज सोदाहरण दाखवून दिली आहेत. त्यांच्या सूचना मनावर कोरल्या गेल्या असून देशातल्या असंख्य विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांच्या मनात त्यांनी चैतन्य निर्माण केले आहे. पुन्हा एकदा धन्यवाद, माननीय पंतप्रधान सर.
पंतप्रधान- मित्रांनो, आपणा सर्वांचेही खूप खूप आभार. हाच उल्हास आणि उत्साहा सह आपण आपल्या कुटुंबालाही विश्वास द्याल, स्वतः आत्मविश्वास बाळगाल आणि उत्तम परिणाम साध्य कराल, अशी आशा मी करतो. जीवनात ज्याची आकांक्षा बाळगली आहे, त्यासाठी परिश्रम करणे ही आपली सवय ठरेल. आपल्याला ज्याची आकांक्षा आहे ते फळ आपल्याला प्राप्त होईल. आपणा सर्वाना माझ्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.
JPS/ST/NM/RA/HA/SP/Sampada/Radhika/Vasanti/Ashutosh/Gajendra/Suvarna/Shailesh/Sushama/Vinayak/Madhuri/Sanjana/Nilima/PM
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
Join Pariksha Pe Charcha! Great to connect with students from across the country. https://t.co/z1UDFjYMWv
— Narendra Modi (@narendramodi) January 29, 2024
It is crucial to instill resilience in our children and help them cope with pressures. pic.twitter.com/BmkH2O6vV6
— PMO India (@PMOIndia) January 29, 2024
The challenges of students must be addressed collectively by parents as well as teachers. pic.twitter.com/lvd577dgx1
— PMO India (@PMOIndia) January 29, 2024
Healthy competition augurs well for students' growth. pic.twitter.com/lCa4PzoqRl
— PMO India (@PMOIndia) January 29, 2024
दबाव पर हमें अपने तरीके से जीत हासिल करनी है, ये संकल्प करना है। pic.twitter.com/EEhCHbRLG0
— PMO India (@PMOIndia) January 29, 2024
Parents should not make report cards of their children as their visiting card. pic.twitter.com/Y75KDAxdD3
— PMO India (@PMOIndia) January 29, 2024
The bond between students and teachers must be beyond syllabus and curriculum. pic.twitter.com/IUhTUWyFHC
— PMO India (@PMOIndia) January 29, 2024
Never sow the seeds of competition and rivalry between your children. Rather, siblings should be an inspiration for each other. pic.twitter.com/xIxN3iq02R
— PMO India (@PMOIndia) January 29, 2024
Strive to be committed and decisive in all the work and study you do. pic.twitter.com/S21e5eUyv0
— PMO India (@PMOIndia) January 29, 2024
Practice the writing of answers as much as possible. If you have that practice, the majority of exam hall stress will go away. pic.twitter.com/2kAsFiDo6m
— PMO India (@PMOIndia) January 29, 2024
Technology should not become a burden. Use it judiciously. pic.twitter.com/qveSxDbEjn
— PMO India (@PMOIndia) January 29, 2024
There is nothing like the ‘right’ time, so do not wait for it. Challenges will keep coming, and you must challenge those challenges. pic.twitter.com/s63iq9mG8Z
— PMO India (@PMOIndia) January 29, 2024
If there are millions of challenges, there are billions of solutions as well. pic.twitter.com/rcQqllZ8yB
— PMO India (@PMOIndia) January 29, 2024
Failures must not cause disappointments. Every mistake is a new learning. pic.twitter.com/crhbeRyldi
— PMO India (@PMOIndia) January 29, 2024
My brave #ExamWarriors are very capable of overcoming any challenge whatsoever. I highlighted why it is important to become resilient to pressure and remaining free from stress. #ParikshaPeCharcha pic.twitter.com/lxeToKibe9
— Narendra Modi (@narendramodi) January 29, 2024
Competition, when healthy, is good.
— Narendra Modi (@narendramodi) January 29, 2024
No #ExamWarrior must be adversely impacted by fear of marks or peer pressure. #ParikshaPeCharcha pic.twitter.com/72xuaakwjr
Here is how teachers can help overcome exam stress and shape the lives of their students. #ParikshaPeCharcha pic.twitter.com/3gCvKdxRef
— Narendra Modi (@narendramodi) January 29, 2024
Dear #ExamWarriors,
— Narendra Modi (@narendramodi) January 29, 2024
Never let your surroundings distract you. Focus on your preparation and appear for exams with a calm mind. #ParikshaPeCharcha pic.twitter.com/OA1xTaaBgU
I have a clear message to the #ExamWarriors - all study and no play is not good. Sports and fitness can boost academic performance. pic.twitter.com/rDSBFJScIK
— Narendra Modi (@narendramodi) January 29, 2024
It is understandable for students to keep thinking about careers but making thoughtful decisions will help overcome such uncertainties. #ParikshaPeCharcha pic.twitter.com/vcUhwjnOSH
— Narendra Modi (@narendramodi) January 29, 2024
Creating an environment of trust increases positivity among children. #ParikshaPeCharcha pic.twitter.com/5OM8ho0Cgw
— Narendra Modi (@narendramodi) January 29, 2024
Spoke about a commonly asked theme- the role and impact of technology while preparing for exams. Do hear… #ParikshaPeCharcha pic.twitter.com/w7CjZBBL71
— Narendra Modi (@narendramodi) January 29, 2024
For millions of challenges, there are billions of solutions! #ParikshaPeCharcha pic.twitter.com/4OLNLnhSYx
— Narendra Modi (@narendramodi) January 29, 2024
Here are some glimpses from the #ParikshaPeCharcha programme earlier today. pic.twitter.com/qqqAyRz3cd
— Narendra Modi (@narendramodi) January 29, 2024