Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

परीक्षा पे चर्चा-पंतप्रधानांचा विद्यार्थ्यांशी संवाद

परीक्षा पे चर्चा-पंतप्रधानांचा विद्यार्थ्यांशी संवाद

परीक्षा पे चर्चा-पंतप्रधानांचा विद्यार्थ्यांशी संवाद

परीक्षा पे चर्चा-पंतप्रधानांचा विद्यार्थ्यांशी संवाद


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विद्यार्थ्यांशी परीक्षांबाबत संवाद साधला. नवी दिल्ली येथे तालकटोरा स्टेडिअममध्ये झालेल्या कार्यक्रमात त्यांनी मुलांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. वृत्तवाहिन्या, नरेंद्र मोदी मोबाईल ॲप आणि MyGov मंच अशा विविध माध्यमातूनही मुलांनी त्यांना प्रश्न विचारले.

या सत्राला आपण विद्यार्थ्यांचे, त्यांचे आईवडील आणि कुटुबांचे मित्र या नात्याने आलो असल्याचे पंतप्रधानांनी सुरुवातीला सांगितले. वेगवेगळ्या मंचाच्या माध्यमातून आपण देशभरातल्या सुमारे 10 कोटी लोकांशी बोलत असतो, असे ते म्हणाले. आजही आपल्याला विद्यार्थी जिवंत राहील, अशी मूल्ये, माझ्या शिक्षकांनी माझ्यात रुजवली, असे सांगत पंतप्रधानांनी त्यांच्या शिक्षकांचे स्मरण केले प्रत्येकाने आपल्यातला विद्यार्थी जिवंत ठेवला पाहिजे, असा सल्ला पंतप्रधानांनी यावेळी दिला.

दोन तास चाललेल्या या संवादात पंतप्रधानांनी अनेक विषयांवरच्या प्रश्नांना उत्तरे दिली. यात भीती, चर्चा, एकाग्रता समवयस्कांचा दबाव (पीअर प्रेशर), पालकांच्या अपेक्षा आणि शिक्षकांची भूमिका अशा विविध विषयांचा समावेश होता. पंतप्रधानांनी अत्यंत हजरजबाबीपणे, विनोदाची पेरणी करत, उदाहरणे देत उत्तरे दिली.

परीक्षेचा ताण आणि भीती यावर मात करण्यासाठी आत्मविश्वासाचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी स्वामी विवेकानंदांचे उदाहरण दिले. कॅनडाच्या स्नाबोर्डर मार्क मॅकमॉरीसचे उदाहरण त्यांनी दिले. 11 महिन्यांपूर्वी गंभीर दुखापत होऊन जीव धोक्यात आलेल्या मार्कने यंदाच्या शीतकालीन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये कांस्यपदक जिंकले.

‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमात महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी दिलेल्या सल्ल्याची आठवण पंतप्रधानांनी एकाग्रतेबाबत बोलतांना करून दिली.

सध्या खेळत असलेल्या चेंडूवरच केवळ न केवळ आपण लक्ष्य केंद्रीत करतो, भूतकाळ किंवा भविष्यकाळाबाबत चिंता करत नसल्याचे तेंडुलकर यांनी सांगितले होते. एकाग्रता सुधारण्यासाठी योगाची मदत होऊ शकते, असे पंतप्रधान म्हणाले.

प्रतिस्पर्धा अर्थात दुसऱ्याची स्पर्धा करण्यापेक्षा अनुस्पर्धा अर्थात आपली आपल्याशी स्पर्धा अधिक महत्त्वाची आहे, असे पंतप्रधानांनी समवयस्क दबावाबाबत बोलतांना सांगितले. आपल्या आधीच्या कामगिरीपेक्षा अधिक चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे, असे ते म्हणाले.

प्रत्येक पालक आपल्या मुलासाठी त्याग करत असतो. आपल्या मुलाची कामगिरी सामाजिक प्रतिष्ठेचा मुद्दा करू नये, असे आवाहन पंतप्रधानांनी पालकांना केले. प्रत्येक मुलाकडे वैशिष्ठ्यपूर्ण कलागुण असतात, असे पंतप्रधानांनी सांगितले.

विद्यार्थ्यांच्या जीवनात बौद्धिक निर्देशांक आणि भावनिक निर्देशांक असे दोन्‍ही महत्त्वाचे असतात, असे पंतप्रधानांनी सांगितले.

विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण वर्षभर एकच वेळापत्रक योग्य नसते. वेळापत्रकात लवचिकता असली पाहिजे तसेच वेळेचा पुरेपूर उपयोग झाला पाहिजे, असे पंतप्रधानांनी वेळेच्या व्यवस्थापनाबाबत सांगितले.

B.Gokhale/S.Kakade/P.Kor