नवी दिल्ली, 7 डिसेंबर 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 डिसेंबर 2023 तोजी सकाळी साडेदहा वाजता इन्फिनिटी फोरम या आर्थिक क्षेत्रातील तंत्रज्ञानावर आधारित जागतिक वैचारिक मंचाच्या दुसऱ्या वर्षीच्या कार्यक्रमाला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करणार आहेत.
भारत सरकारच्या अधिपत्याखाली, आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र प्राधिकरण (आयएफएससीए) आणि जीआयएफटी(गिफ्ट) सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने इन्फिनिटी फोरमच्या दुसऱ्या वर्षीचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत असून तो व्हायब्रंट गुजरात जागतिक शिखर परिषद 2024 चा पूर्ववर्ती कार्यक्रम आहे. जेथे संपूर्ण जगभरातील प्रागतिक संकल्पना, तातडीच्या समस्या आणि अभिनव तंत्रज्ञाने यांचा शोध घेतला जाऊन त्यावर चर्चा होईल आणि त्या उपाययोजना तसेच संधींमध्ये विकसित होतील असा मंच या फोरमने पुरवला आहे.
इन्फिनिटी फोरमच्या दुसऱ्या वर्षीच्या कार्यक्रमाची संकल्पना–‘जीआयएफटी-आयएफएससी: नव्या युगातील जागतिक वित्तीय सेवांसाठीचे महत्त्वाचे केंद्र अशी आहे’ आणि ती खालील तीन मार्गांनी साकार करण्यात येईल.
प्रत्येक ट्रॅकमध्ये उद्योग क्षेत्रातील आघाडीच्या व्यक्तींचा इन्फिनिटी टॉक तसेच भारताच्या आणि जगभरच्या उद्योगक्षेत्रातील तज्ञ व्यक्ती आणि आर्थिक क्षेत्रातील व्यावसायिक यांच्या पथकाची गटचर्चा यांचा समावेश असेल. यातून व्यावहारिक विचार आणि अंमलबजावणीयोग्य उपाय यांची माहिती मिळेल.
भारत तसेच अमेरिका, यूके,सिंगापूर,दक्षिण आफ्रिका,संयुक्त अरब अमिरात,ऑस्ट्रेलिया आणि जर्मनी यांच्यासह जगभरातील 20 पेक्षा जास्त देशांतील प्रेक्षक यांच्या सशक्त ऑनलाईन सहभागासह 300 हून अधिक सीएक्सओज या कार्यक्रमात भाग घेतील. परदेशी विद्यापीठांचे उपकुलगुरू तसेच परदेशी दूतावासांचे प्रतिनिधी देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
S.Patil/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai