Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान 7 डिसेंबर रोजी आग्रा मेट्रो प्रकल्पाच्या बांधकामाचे उद्‌घाटन करणार


पंतप्रधान नरेंद्र मोदी 7 डिसेंबर 2020 रोजी दुपारी 12:00 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आग्रा मेट्रो प्रकल्पाच्या बांधकामाचे उद्‌घाटन करतील. केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी कामकाज मंत्री हरदीपसिंग पुरी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि इतर मान्यवर देखील आग्रा येथील 15 बटालियन पीएसी परेड मैदानावर होणाऱ्या या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

आग्रा मेट्रो प्रकल्पाबद्दल

आग्रा मेट्रो प्रकल्पात एकूण 29.4  किमी लांबीचे दोन कॉरिडॉर आहेत आणि ते ताजमहाल, आग्रा किल्ला, सिकंद्रा यासारख्या प्रमुख पर्यटन स्थळांना रेल्वे स्थानक आणि बसस्थानकांशी जोडतात. या प्रकल्पामुळे आग्रा शहराच्या 26 लाख जनतेला फायदा होईल आणि दरवर्षी आग्र्याला भेट देणाऱ्या 60 लाखाहून अधिक पर्यटकांचीही सोय होईल. ऐतिहासिक आग्रा शहराला पर्यावरण अनुकूल जलद वाहतूक प्रणाली प्रदान करेल. या प्रकल्पाची अंदाजे किंमत 8,379.62 कोटी रुपये असेल जो 5 वर्षात पूर्ण होईल.

तत्पूर्वी, 8 मार्च 2019 रोजी पंतप्रधानांनी ‘सीसीएस विमानतळ ते मुन्शीपुलिया’ पर्यंत संपूर्ण 23 किमी लांबीच्या उत्तर-दक्षिण कॉरिडॉरवर लखनौ मेट्रोचे व्यावसायिक परिचालन सुरू करण्याबरोबरच आग्रा मेट्रो प्रकल्पाचे उद्‌घाटन केले होते.