Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान 6 सप्टेंबर रोजी ‘जल संचय जन भागीदारी उपक्रमाच्या ’ शुभारंभ कार्यक्रमाला करणार संबोधित


नवी दिल्ली, 5 सप्टेंबर 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 12:30 वाजता गुजरातमधील सूरत येथे आयोजित ‘जलसंचय जन भागीदारी उपक्रमाच्या ’ शुभारंभ  कार्यक्रमाला दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित करणार आहेत.

जल सुरक्षेच्या पंतप्रधानांचा दृष्टिकोन  पुढे नेण्यासाठी, या उपक्रमात सामुदायिक भागीदारी आणि मालकी यावर भर देऊन पाण्याचे संवर्धन करण्याचा प्रयत्न  केला जाणार आहे आणि संपूर्ण समाज आणि संपूर्ण सरकार दृष्टीकोनातून प्रेरित आहे. गुजरात सरकारच्या नेतृत्वाखालील जलसंचय उपक्रमाच्या यशाच्या धर्तीवर,जलशक्ती मंत्रालय राज्य सरकारच्या सहकार्याने गुजरातमध्ये “जलसंचय जन भागीदारी ” उपक्रम सुरू करत आहे. जल सुरक्षित भविष्य सुनिश्चित करण्यासाठी गुजरात सरकारने नागरिक, स्थानिक संस्था, उद्योग आणि इतर हितधारकांना एकत्र आणण्याचा  प्रयत्न केला आहे.

या कार्यक्रमांतर्गत राज्यभरात सामुदायिक भागीदारीतून पावसाच्या पाण्याची साठवण करणाऱ्या 24,800 संरचना  बांधल्या जाणार  आहेत. या पुनर्भरण संरचना पावसाच्या पाण्याची साठवण आणि पाण्याची दीर्घकालीन शाश्वतता सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतील.

 S.Patil/S.Kane/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai