Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान 5 मार्च रोजी रोजगार विषयक अर्थसंकल्पोत्तर वेबिनारमध्ये सहभागी होणार


नवी दिल्ली, 04 मार्च 2025

पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 मार्च 2025 रोजी दुपारी 1:30 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून, रोजगार विषयक अर्थसंकल्पोत्तर वेबिनारमध्ये सहभागी होणार आहेत. नागरिकांमधील गुंतवणूक, अर्थव्यवस्था आणि नवोन्मेष अशा महत्वाच्या विषयांवर या वेबिनारमध्ये चर्चा होणार आहे. यावेळी पंतप्रधान उपस्थितांना संबोधितही करणार आहेत.

रोजगार निर्मिती हे सरकारच्या मुख्य प्राधान्य क्षेत्रांपैकी एक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीने प्रेरीत होऊन केंद्र सरकारने रोजगार वाढीला चालना देण्यासाठी तसेच रोजगाराच्या अधिकाधिक संधी निर्माण करण्यासाठी असंख्य पावले उचलली आहेत. या वेबिनारच्या माध्यमातून सरकार, उद्योग क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र आणि नागरिकांधील परस्पर सहकार्याच्या वाढीला चालना देणारा मंच उपलब्ध होणार आहे. या माध्यमातून अर्थसंकल्पातील परिवर्तनात्मक घोषणा प्रभावीपणे अंमलात आणण्याच्या दिशेने सर्व घटकांमध्ये विचारमंथन घडून येणार आहे. या सर्व चर्चांमध्ये नागरिकांचे सक्षमीकरण, अर्थव्यवस्थेला बळकटी देणे आणि नवोन्मेषाला चालना अशा महत्वाच्या मुद्यांवर भर दिला जाणार आहे. या चर्चांमुळे विकसित भारत 2047 च्या संकल्पपुर्तीच्या दृष्टीने महत्वाचे असलेल्या शाश्वत आणि सर्वसमावेशक विकास, तंत्रज्ञान आणि इतर क्षेत्रांतील नेतृत्व, तसेच कौशल्यधारीत आणि सुदृढ मनुष्यबळाची जडणघडण करण्याचा मार्गही प्रशस्त होणार आहे.

 

N.Chitale/T.Pawar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com