Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान, 30 नोव्हेंबर रोजी विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी साधणार संवाद


पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून विकसित भारत संकल्प यात्रेतील लाभार्थ्यांशी  संवाद साधतील. या योजनांचे लाभ सर्व लक्ष्यित घटकांपर्यंत कालबद्ध रीतीने पोहोचतील हे सुनिश्चित करून सरकारच्या प्रमुख योजनांची पूर्णता प्राप्त करण्याच्या उद्देशाने देशभरात ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ आयोजित केली आहे.

महिलाभिमुख विकास सुनिश्चित करण्यासाठी पंतप्रधानांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. या दिशेने आणखी एक पाऊल उचलत पंतप्रधान महिला किसान ड्रोन केंद्राचा ते शुभारंभ करणार आहेत. याद्वारे महिला बचत गटांना (एसएचजी) ड्रोन प्रदान केले जातील जेणेकरून हे तंत्रज्ञान त्यांना उपजीविकेसाठी वापरता येईल. पुढील तीन वर्षांत महिला बचत गटांना 15,000 ड्रोन पुरवले जातील. महिलांना ड्रोन उडवण्याचे आणि वापरण्याचे आवश्यक प्रशिक्षणही दिले जाईल. या उपक्रमामुळे शेतीमध्ये तंत्रज्ञानाच्या वापराला प्रोत्साहन मिळेल.

आरोग्यसेवा परवडणारी असावी आणि ती सहज उपलब्ध करून देणे हा पंतप्रधानांच्या निरोगी भारताच्या दृष्टिकोनाचा पाया आहे. परवडणाऱ्या दरात औषधे उपलब्ध करून देण्यासाठी जनऔषधी केंद्राची स्थापना, या दिशेने उचललेल्या प्रमुख उपक्रमांपैकी एक आहे. या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान देवघर येथील एम्स येथील 10,000 व्या जनऔषधी केंद्राचे लोकार्पण करतील. देशातील जनऔषधी केंद्रांची संख्या 10,000 वरून 25,000 पर्यंत वाढवण्याच्या कार्यक्रमाचाही पंतप्रधान शुभारंभ करतील.

महिला बचत गटांना ड्रोन प्रदान करणे आणि जनऔषधी केंद्रांची संख्या 10,000 वरून 25,000 पर्यंत वाढवणे या दोन्ही उपक्रमांची घोषणा पंतप्रधानांनी या वर्षाच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात  केली होती. हा कार्यक्रम या आश्वासनांची पूर्तता करणारा आहे.

***

NM/Vinayak/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai