Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान 28 जानेवारी रोजी करिअप्पा मैदानावर एनसीसी पीएम रॅलीला संबोधित करणार


नवी दिल्ली, 26 जानेवारी 2023

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 जानेवारी 2023 रोजी संध्याकाळी सुमारे 5:45 वाजता नवी दिल्ली इथल्या करिअप्पा परेड ग्राउंडवर वार्षिक एनसीसी पीएम रॅलीला संबोधित करतील.

यंदा एनसीसी (नॅशनल कॅडेट कॉर्प्स) आपल्या स्थापनेचे 75 वे वर्ष साजरे करत आहे. या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान एनसीसीच्या 75 वर्षांच्या यशस्वी वाटचालीच्या स्मरणार्थ विशेष डे कव्हर आणि खास घडवण्यात आलेले रुपये 75/- मूल्याचे नाणे जारी करतील. यावेळी दिवस-रात्रीची एक रॅली आयोजित केली जाईल, ज्यामध्ये ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ संकल्पनेवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम असतील. वसुधैव कुटुंबकम या भावनेला अनुसरून, 19 देशांमधील 196 अधिकारी आणि कॅडेट्सना या उत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.   

 

 

 

 

R.Aghor/R.Agashe/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai