पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 डिसेंबर 2023 रोजी दुपारी 12:30 वाजता विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. यावेळी पंतप्रधान उपस्थितांना संबोधित देखील करणार आहेत.
या कार्यक्रमात देशभरातून विकसित भारत संकल्प यात्रेचे हजारो लाभार्थी सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री, खासदार, आमदार आणि स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनिधीही सहभागी होणार आहेत.
15 नोव्हेंबर 2023 रोजी विकसित भारत यात्रेला प्रारंभ झाल्यापासून, पंतप्रधानांनी देशभरातील विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी नियमितपणे संवाद साधला आहे. दूरदृश्य प्रणालीद्वारे तीन वेळा (30 नोव्हेंबर, 9 डिसेंबर आणि 16 डिसेंबर) संवाद झाला आहे. तसेच, पंतप्रधानांनी वाराणसीच्या अलिकडच्या दौऱ्यात सलग दोन दिवस (17-18 डिसेंबर) विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी थेट संवाद साधला आहे.
या योजनांचा लाभ सर्व लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत कालबद्ध रीतीने पोहोचेल हे सुनिश्चित करून सरकारच्या प्रमुख योजनांची परिपूर्णता साधण्याच्या उद्देशाने देशभरात विकसित भारत संकल्प यात्रा हाती घेण्यात येत आहे.
***
S.Bedekar/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai