नवी दिल्ली, 26 जानेवारी 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 जानेवारी 2024 रोजी दिल्लीमध्ये करिअप्पा मैदानावर संध्याकाळी साडेचार वाजता होणाऱ्या वार्षिक एनसीसी पीएम रॅलीमध्ये मार्गदर्शन करणार आहेत.
‘अमृत काळातील एनसीसी’ या संकल्पनेवर या रॅलीमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येईल ज्यामध्ये अमृत पिढीचे योगदान आणि सक्षमीकरण याचे दर्शन घडवण्यात येईल. खऱ्या अर्थाने वसुधैव कुटुंबकम ही भारतीय भावना सार्थ करत एनसीसीचे 2200 छात्र आणि 24 परकीय देशांचे तरुण छात्र यंदाच्या रॅलीमध्ये सहभागी होतील.
विशेष निमंत्रित म्हणून व्हायब्रंट व्हिलेजेसमधील 400 पेक्षा जास्त सरपंच आणि देशाच्या विविध भागातील बचत गटांमधील 100 हून जास्त महिला देखील एनसीसी पीएम रॅलीमध्ये सहभागी होतील.
* * *
S.Kane/S.Patil/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com
/PIBMumbai
/pibmumbai