पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या, 27 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी 12 वाजता नवी दिल्लीत आयोजित बी-20 अर्थात बिझनेस 20 परिषदेला संबोधित करणार आहेत.
बी-20 शिखर परिषद – इंडिया अंतर्गत, धोरणकर्ते, व्यवसाय प्रमुख आणि जगभरातील तज्ञांना एका मंचावर आणत, बी-20 इंडिया’च्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा केली जाते. या बी-20 इंडिया परिषदेत 54 शिफारशी आणि 172 धोरणात्मक कृती तपशील जी-20 मध्ये सादर केले जाणार आहेत.
बिझनेस -20 (B20) हा जागतिक व्यावसायिक समुदायासाठी औपचारिक संवादाचा एक मंच आहे. 2010 साली स्थापन झालेला बी-20 मंच, जी-20 मधील सर्वात महत्वाच्या संवादात्मक समूहापैकी एक असून त्यात विविध कंपन्या आणि व्यावसायिक संस्था सहभागी होतात. B20 आर्थिक वृद्धी आणि विकासाला चालना देण्यासाठी ठोस कृती करण्यायोग्य धोरण शिफारशी देण्याचे काम करते.
25 ते 27 ऑगस्ट असे तीन दिवस या शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. R.A.I.S.E – जबाबदार, वेगवान, नाविन्यपूर्ण, शाश्वत आणि समान न्यायाचे व्यवसाय अशी या परिषदेची संकल्पना आहे. सुमारे 55 देशांतील 1,500 हून अधिक प्रतिनिधी यात सहभागी होत आहेत.
***
M.Pange/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai