Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान 26 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या संविधान दिन कार्यक्रमात होणार सहभागी


नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर 2024

भारतीय राज्यघटनेच्या स्वीकाराला 75 वर्षे पूर्ण होत  आहेत, या  महत्त्वपूर्ण प्रसंगानिमित्त आयोजित करण्‍यात आलेल्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत.सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासकीय  संकुलातील सभागृहात संध्याकाळी 5 वाजता  संविधान   दिनाचा सोहळा होणार आहे.यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय न्यायपालिकेचा वार्षिक अहवाल (2023-24) जारी  करणार असून  उपस्थितांना संबोधित करणार आहेत.

हा कार्यक्रम भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने आयोजित केला आहे. भारताचे सरन्यायाधीश आणि सर्वोच्च न्यायालयाचे इतर न्यायाधीशही यावेळी उपस्थित राहणार आहेत.

N.Chitale/S.Bedekar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai