नवी दिल्ली, 18 फेब्रुवारी 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 फेब्रुवारी 2021 रोजी नीती आयोगाच्या सहाव्या प्रशासकीय परिषदेच्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. पंतप्रधान व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून या बैठकीला उपस्थित राहतील. या बैठकीमध्ये कृषी, पायाभूत सुविधा, उत्पादन, मनुष्यबळ विकास, तळागाळातील नागरिकांपर्यंत सेवा वितरण आणि आरोग्य व पोषण या विषयावर चर्चा करण्यात येईल.
प्रशासकीय परिषद आंतर-क्षेत्र, आंतर-विभागीय आणि संघराज्यीय विषयांवर चर्चा करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करते. यामध्ये पंतप्रधान, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री, इतर केंद्रशासित प्रदेशांचे विधिमंडळ आणि उपराज्यपाल यांचा समावेश आहे. या सहाव्या बैठकीत जम्मू-काश्मीर आणि लडाख पहिल्यांदाच केंद्रशासित प्रदेश म्हणून सहभागी होणार आहेत. यावेळी प्रशासकांच्या नेतृत्वाखालील इतर केंद्रशासित प्रदेशांनाही सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या बैठकीला प्रशासकीय परिषदेचे माजी कार्यकारी सदस्य, केंद्रीय मंत्री, उपाध्यक्ष, नीती आयोगाचे विशेष कार्यकारी अधिकारी आणि भारत सरकारचे अन्य वरिष्ठ अधिकारीही उपस्थित असतील.
M.Chopade/S.Mhatre/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com