नवी दिल्ली, 18 ऑगस्ट 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे गुजरातमधील सोमनाथ येथे विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. सोमनाथ प्रोमनेड, सोमनाथ प्रदर्शन केंद्र आणि पुनर्बांधणी केलेल्या जुन्या सोमनाथच्या मंदिर परिसराचा उद्घाटन केले जाणाऱ्या प्रकल्पांमध्ये समावेश आहे. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान श्रीपार्वती मंदिराची पायाभरणीही करणार आहेत.
सोमनाथ प्रोमनेड (तीर्थयात्रा कायाकल्प आणि आध्यात्मिक, हेरिटेज ऑगमेंटेशन ड्राइव्ह) योजनेअंतर्गत 47 कोटींपेक्षा जास्त रुपये खर्चून विकास करण्यात आला आहे. ‘पर्यटक सुविधा केंद्र’ च्या आवारात विकसित केलेल्या सोमनाथ प्रदर्शन केंद्रात जुन्या सोमनाथ मंदिराचे सुट्टे भाग आणि जुन्या सोमनाथच्या नगर शैलीतील मंदिराची वास्तू असलेली शिल्पे मांडण्यात आली आहेत.
जुन्या (जुना) सोमनाथचा जीर्णोद्धार केलेल्या मंदिर परिसराचे काम श्री सोमनाथ ट्रस्टने एकूण 3.5 कोटी रुपये खर्चून पूर्ण केले आहे. या मंदिराला अहिल्याबाई मंदिर असेही संबोधले जाते कारण जेव्हा त्यांना आढळले की जुने मंदिर भग्नावस्थेत आहे तेव्हा इंदूरच्या राणी अहिल्याबाईंनी ते बांधले होते,. संपूर्ण जुना मंदिर परिसर यात्रेकरूंच्या सुरक्षिततेसाठी आणि वाढीव क्षमतेसह समग्रपणे पुनर्विकसित करण्यात आला आहे.
श्रीपार्वती मंदिर एकूण 30 कोटी रुपये खर्चून बांधण्याचे प्रस्तावित आहे. यामध्ये सोमपुरा सलाट शैलीतील मंदिर बांधकाम, गर्भ गृह आणि नृत्य मंडप यांचा समावेश असेल.
यावेळी केंद्रीय गृहमंत्री, केंद्रीय पर्यटन मंत्री यांच्यासह गुजरातचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित असतील.
* * *
M.Chopade/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com