पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 19 जून 2022 रोजी सकाळी 10-30 वाजता प्रगती मैदान एकात्मिक संक्रमण मार्गिका प्रकल्पाचा मुख्य बोगदा आणि पाच भुयारी मार्ग राष्ट्राला समर्पित करणार आहेत. या वेळी ते उपस्थितांना संबोधितही करणार आहेत. प्रगती मैदान पुनर्विकास प्रकल्पाचा एकात्मिक संक्रमण मार्गिका प्रकल्प हा अंतर्गत घटक आहे.
प्रगती मैदान संक्रमण मार्गिका प्रकल्प 920 कोटी रूपये खर्च करून बांधण्यात आला असून संपूर्ण निधीचा पुरवठा हा केंद्र सरकारने केला आहे. प्रगती मैदान येथे विकसित करण्यात येत असलेल्या नवीन जागतिक दर्जाचे प्रदर्शन केंद्र आणि संमेलन स्थळापर्यंत विनाअडथळा आणि सुरळीतपणे जाता यावे, हा यामागील उद्देश्य आहे. तसेच यामुळे प्रगती मैदान येथे होणारे कार्यक्रम आणि प्रदर्शनांमध्ये प्रदर्शक तसेच नागरिकांना सहजपणे सहभाग घेण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.
या प्रकल्पाचा परिणाम केवळ प्रगती मैदानपुरताच रहाणार नाही तर विनाअडथळा वाहतूक होणार असल्याने लोकांचा जाण्यायेण्याचा वेळ आणि खर्च वाचणार आहे. तसेच प्रकल्पाचा फायदा खूप मोठ्या प्रमाणावर होणार आहे. नागरी पायाभूत सुविधांमध्ये परिवर्तन घडवून लोकांचे जीवन सुखमय करण्याची सुनिश्चिती करण्याच्या सरकारच्या व्यापक दृष्टिकोनाचाच हा प्रकल्प भाग आहे.
मुख्य बोगदा हा रिंग रोडला इंडिया गेटशी पुराना किला मार्गाद्वारे जोडत असून तो प्रगती मैदानातून जातो. सहा पदरी विभाजित बोगद्याचे बहुविध उद्देश्य आहेत. ज्यात प्रगती मैदानाच्या तळघरातील विशाल पार्किंग स्थळापर्यंत प्रवेशमार्गाचा समावेश आहे. बोगद्याचे आगळे वेगळे वैशिष्ट्य हे आहे की, मुख्य बोगदा मार्गाच्या खाली जे दोन आडवे बोगदे बांधण्यात आले आहेत, त्यामुळे पार्किंगच्या जागेतून दोन्ही बाजूंनी वाहतूक चालेल. वाहतूक सुरळीत चालण्यासाठी बोगद्यात अद्ययावत अग्नी व्यवस्थापन, आधुनिक वायुवीजन आणि स्वयंचलित गटार व्यवस्था, डिजिटल नियंत्रित सीसीटीव्ही आणि सार्वजनिक उद्घोषणा प्रणाली अशा अत्याधुनिक जागतिक दर्जाच्या सुविधा सुसज्ज आहेत. भैरव मार्ग हा त्याच्या वहन क्षमतेच्या कितीतरी जास्त प्रमाणात वापरला जात असून हा बहुप्रतिक्षित बोगदा भैरव मार्गाला पर्यायी मार्ग म्हणून काम करेल आणि त्यामुळे भैरव मार्गावरील वाहतुकीचा ताण कमी होणयास मदत होईल.
या बोगद्याबरोबरच, सहा भुयारी मार्ग असून त्यापैकी चार मथुरा रस्त्यावर तर एक भैरव मार्गावर आणि एक रिंग रोड तसेच भैरव मार्ग एकमेकांना छेद देऊन जातात त्याठिकाणी आहे.
***
S.Thakur/U.Kulkarni/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com