नवी दिल्ली, 17 ऑक्टोबर 2022
नवी दिल्ली येथील प्रगती मैदान येथे आयोजित इंटरपोलच्या 90 व्या महासभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी 18 ऑक्टोबर रोजी दुपारी 1:45 च्या सुमाराला संबोधित करतील.
इंटरपोलची 90 वी महासभा 18 ते 21 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. या बैठकीला इंटरपोलच्या 195 सदस्य देशांचे मंत्री, देशांचे पोलिस प्रमुख, राष्ट्रीय केंद्रीय ब्यूरोंचे प्रमुख आणि वरिष्ठ पोलिस अधिकारी यांचा समावेश असणारी प्रतिनिधीमंडळे सहभागी होणार आहे. महासभा ही इंटरपोलची सर्वोच्च प्रशासकीय संस्था आहे आणि तिच्या कामकाजाशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी वर्षातून एकदा बैठक होते.
इंटरपोलच्या महासभेची बैठक सुमारे 25 वर्षांच्या कालावधीनंतर भारतात होत आहे. यापूर्वी भारतात 1997 मध्ये ती आयोजित करण्यात आली होती. भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षाच्या निमित्ताने 2022 मध्ये नवी दिल्ली येथे इंटरपोलची महासभा आयोजित करण्याचा भारताचा प्रस्ताव महासभेने प्रचंड बहुमताने मान्य केला. भारताच्या कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थेतील सर्वोत्कृष्ट पद्धती संपूर्ण जगाला दाखविण्याची संधी या आयोजनामुळे मिळणार आहे.
केंद्रीय गृहमंत्री, इंटरपोलचे अध्यक्ष अहमद नासेर अल रायसी आणि महासचिव युर्गन स्टॉक, सीबीआयचे संचालकही यावेळी उपस्थित राहणार आहेत.
* * *
S.Kane/S.Kakade/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com
/PIBMumbai
/pibmumbai