पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी 20 नोव्हेंबर रोजी दुसऱ्या इंडिया-कॅरिकॉम शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर,सेंट लुसियाचे पंतप्रधान महामहीम श्री. फिलिप जे. पियरे यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत यशस्वीपणे चर्चा केली.
दोन्ही नेत्यांनी क्षमता विकास, शिक्षण, आरोग्य, अक्षय ऊर्जा, क्रिकेट आणि योग यासह अनेक मुद्द्यांवरील द्विपक्षीय सहकार्यावर चर्चा केली.भारत- कॅरिकॉम भागीदारी मजबूत करण्यासाठी पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या सात कलमी योजनेची पंतप्रधान पियरे यांनी प्रशंसा केली.
दोन्ही नेत्यांनी आकाराने लहान असलेल्या द्वीप राष्ट्रांसाठी आपत्ती व्यवस्थापन क्षमता आणि विरोध करण्याची क्षमता मजबूत करण्यावर विशेष लक्ष केंद्रित करून, हवामान बदलामुळे निर्माण झालेल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी सहकार्याचे महत्त्व अधोरेखित केले.
***
JPS/SP/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai
Met the Prime Minister of Saint Lucia, Mr. Philip J. Pierre. We discussed ways to boost trade linkages. We also talked about enhancing ties in sectors like healthcare, pharma, energy, sports and more.@PhilipJPierreLC pic.twitter.com/Cc3FZ1cVQp
— Narendra Modi (@narendramodi) November 21, 2024
Prime Minister @narendramodi met with Prime Minister @PhilipJPierreLC of St. Lucia on the sidelines of the 2nd India-CARICOM Summit. The two leaders discussed strengthening cooperation in key areas such as capacity building, education, health, sports, yoga and more. pic.twitter.com/ygz7BRKDsE
— PMO India (@PMOIndia) November 21, 2024