Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांनी इजिप्तचे राष्ट्रपती श्री. अब्देल फत्ताह अल-सिसी यांच्याशी साधला दूरध्वनीवर संवाद


आज दूरध्वनीवरून झालेल्या संभाषणाद्वारे पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांनी इजिप्तचे राष्ट्रपती श्री.अब्देल फत्ताह अल-सिसी यांना तसेच इजिप्तच्या जनतेला ईद-उल-फित्र निमित्त शुभेच्छा दिल्या.

इजिप्तच्या राष्ट्रपतींनी शुभेच्छांचा स्वीकार केला. ते म्हणाले की, इजिप्त आणि भारत या दोहोंना जगातील प्राचीनतम संस्कृतींमध्ये महत्त्वाचे स्थान आहे. या दोन देशांमध्ये वेगाने वृद्धिंगत होत जाणाऱ्या द्विपक्षीय संबंधांबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

कोविड-19 संकटकाळात इजिप्तमध्ये असलेल्या भारतीयांच्या सुरक्षा आणि कल्याण बाबत काळजी घेतल्याबद्दल पंतप्रधानांनी इजिप्तच्या शासनयंत्रणेची व अधिकारी वर्गाची प्रशंसा केली.

यावर्षी पंतप्रधान इजिप्तला भेट देणार होते, मात्र कोविड-19 साथरोगामुळे तो दौरा पुढे ढकलावा लागला. या भेटीचा संदर्भ देत पंतप्रधानांनी, परिस्थिती सुरळीत होताच इजिप्तचे राष्ट्रपती सिसी यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली.

B.Gokhale/ J.Vaishanpayan/P.Kor