नवी दिल्ली, 11 मार्च 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मॉरिशसचे राष्ट्रपती महामहीम धरमबीर गोखूल,यांची स्टेट हाऊस येथे आज भेट घेतली.
भारत आणि मॉरिशसमधील विशेष आणि जिव्हाळ्याच्या द्विपक्षीय संबंधांना अधिक दृढ करण्याबाबत दोन्ही नेत्यांनी विचारांची देवाणघेवाण केली.या संदर्भात, त्यांनी दोन्ही देशांमधील सामायिक इतिहास आणि लोकांमधील उत्तम संबंधांचे स्मरण केले.मॉरिशसच्या राष्ट्रीय दिनाच्या समारंभात दुसऱ्यांदा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणे हा आपल्यासाठी सन्मान असल्याचे पंतप्रधान मोदींनी नमूद केले. यावेळी पंतप्रधानांनी राष्ट्रपती गोखूल आणि प्रथम महिला वृंदा गोखूल यांना ओसीआय कार्ड प्रदान केले. भारत सरकारच्या सहकार्याने स्टेट हाऊसमध्ये उभारण्यात आलेल्या आयुर्वेद उद्यानालाही पंतप्रधानांनी भेट दिली.आयुर्वेदासह पारंपारिक औषधांचे लाभ विस्तारण्यात मॉरिशस हा भारताचा एक महत्त्वाचा भागीदार असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.
चर्चेनंतर, राष्ट्रपती गोखुल यांनी पंतप्रधानांच्या सन्मानार्थ खास मेजवानीचे आयोजन केले होते.
* * *
S.Kane/S.Patgaonkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com
/PIBMumbai
/pibmumbai