चीनच्या राष्ट्राध्यक्षपदी पुन्हा एकदा निवाढून आल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शी जिनपिंग यांचे दूरध्वनीवरून अभिनंदन केले.
एकविसावे शतक ‘आशियाचे शतक’ म्हणून सिद्ध करायचे असेल, तर भारत आणि चीन या आशियातल्या दोन महासत्तांचे परस्पर संबंध उत्तम राहणं अत्यंत आवश्यक आहे, यावर दोन्ही नेत्यांनी सहमती व्यक्त केली.
परस्पर हितसंबंधांच्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर वेळोवेळी संवाद सुरूच ठेवण्याविषयी मोदी आणि जिनपिंग यांनी सहमती दर्शवली.
B.Gokhale/ R.Aghor