Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान मोदी आणि भूतानचे पंतप्रधान यांच्यात दूरध्वनीवरुन चर्चा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भूतानचे पंतप्रधान डॉ लोट्ये त्सेरिंग यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली.

दोन्ही पंतप्रधानांनी यावेळी कोविड-19 या जागतिक आजाराच्या पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिस्थितीवर चर्चा केली. तसेच या आजाराचा संसर्ग रोखण्यासाठी दोन्ही देशांत सुरु असलेल्या उपाययोजनांची परस्परांना माहिती दिली.

भूतानमध्ये या आजाराचा प्रादुर्भाव आटोक्यात ठेवण्यासाठी भूतानचे राजे आणि पंतप्रधान ल्योनच्छेन डॉ त्सेरिंग या दोघांच्या नेतृत्वाखाली जी लढाई लढली जाते आहे, त्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले.

कोविड-19 च्या लढाईत प्रादेशिक स्तरावर समन्वय कायम राहावा यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल ल्योनच्छेन डॉ त्सेरिंग यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले. भारतासारख्या विशाल आणि मिश्र लोकवस्ती असलेल्या देशात या लढ्याचे नेतृत्व करत असतांना आशियातील प्रादेशिक स्तरावर देखील मोदी यांनी घेतलेल्या आघाडीबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले.

सार्क देशांच्या 15 मार्च रोजी झालेल्या बैठकीत विशेष व्यवस्थेविषयी झालेल्या निर्णयानुसार अंमलबजावणी सुरु असल्याबद्दल, दोन्ही नेत्यांनी समाधान व्यक्त केले.

पंतप्रधान मोदी यांनी यावेळी भारत-भूतान यांच्यातल्या प्राचीन आणि विशेष स्वरूपाच्या संबंधांचा उल्लेख केला.

कोविड-19 या आजाराचा भूतानच्या जनतेच्या आरोग्यावर आणि भूतानच्या अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम कमी करण्यासाठी भूतानला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन मोदी यांनी ल्योनच्छेन डॉ त्सेरिंग यांना दिले.

भूतानचे राजे, ल्योनच्छेन डॉ त्सेरिंग आणि भूतानच्या सर्व जनतेला निरामय आणि सुखी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

R.Tidke/R.Aghor/D.Rane