Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांनी संयुक्तपणे आयटीईआर सुविधेला दिली भेट


नवी दिल्ली, 12 फेब्रुवारी 2025

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आज सकाळी कॅडाराचे येथील आंतरराष्ट्रीय थर्मोन्यूक्लियर प्रायोगिक अणुभट्टी [आयटीईआर] ला संयुक्तपणे भेट दिली. आयटीईआरच्या  महासंचालकांनी उभय नेत्यांचे स्वागत केले. जगातील सर्वात महत्त्वाकांक्षी फ्यूजन ऊर्जा प्रकल्पांपैकी एक असलेल्या आयटीईआरला कोणत्याही राष्ट्रप्रमुख किंवा सरकारप्रमुखाने दिलेली ही पहिलीच भेट होती.

या भेटीदरम्यान, उभय नेत्यांनी आयटीईआरच्या प्रगतीचे कौतुक केले, ज्यामध्ये जगातील सर्वात मोठ्या टोकामॅकच्या असेंब्लीचा समावेश आहे आणि इथे बर्निंग प्लाझ्मा तयार करून, समाविष्ट करून आणि नियंत्रित करून 500 मेगावॅट फ्यूजन पॉवर तयार केली जाईल. या प्रकल्पावर काम करणाऱ्या आयटीईआर अभियंते आणि शास्त्रज्ञांच्या समर्पणाचेही नेत्यांनी कौतुक केले.

गेल्या दोन दशकांमध्ये या प्रकल्पात योगदान देणाऱ्या सात आयटीईआर सदस्यांमध्ये भारताचा समावेश आहे. आयटीईआर प्रकल्पात सुमारे 200 भारतीय शास्त्रज्ञ आणि सहाय्यक तसेच एल अँड टी, आयनॉक्स इंडिया, टीसीएस, टीसीई, एचसीएल टेक्नॉलॉजीज यासारख्या प्रसिद्ध कंपन्यांचा सहभाग आहे.

N.Chitale/S.Kane/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai