पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज टोकिओ येथे भारतीय समुदायाच्या लोकांशी संवाद साधला. आपल्या भाषणात पंतप्रधानांनी भारत-जपान सहकार्याच्या अनेक पैलूंवर प्रकाश टाकला.
जपानचे पंतप्रधान शिंजो ॲबे आणि जपानी जनतेने दाखवलेल्या आदरातिथ्याबद्दल आणि स्वागताबद्दल पंतप्रधान मोदी यांनी आभार मानले. तसेच जपानमधल्या भारतीय समुदायाला दिवाळीनिमित्त शुभेच्छाही दिल्या.
भारतीय समुदाय जपानमधील भारताचे राजदूत आहेत असे सांगून भारतात गुंतवणूक करावी तसेच मातृभूमीशी सांस्कृतिक संबंध जोडून ठेवावे, असे आवाहन पंतप्रधानांनी केले.
गेल्या चार वर्षातील सरकारच्या सफलतेला अधोरेखित करतांना पंतप्रधानांनी सांगितले की, भारत नेहमीच भारतीय उपाययोजना आणि जागतिक उपयोग या उद्देशाने कार्य करत आहे. भारताच्या जन-धन, आधार आणि मोबाईल या तीन योजनांच्या आणि डिजिटल व्यवहार प्रणालीचे सर्व जगात कौतुक होत असल्याचे त्यांनी सांगितले.
भारताचा अत्यंत यशस्वी ठरलेला अंतरीक्ष कार्यक्रम आणि भारतात निर्माण होणाऱ्या मजबूत डिजिटल पायाभूत सोई यांचा पंतप्रधानांनी विशेष उल्लेख केला. “मेक इन इंडिया” कार्यक्रमामुळे भारत इलेक्ट्रॉनिक्स आणि वाहन निर्मितीचे केंद्र बनत आहे, असे मोदी यांनी सांगितले.
नव भारताच्या निर्मितीसाठी स्मार्ट पायाभूत सुविधा निर्मितीतील जपानचा सहभाग पंतप्रधानांनी अधोरेखित केला. भारत आणि जपानमधले संबंध सुधारण्यासाठी भारतीय समुदायाने सातत्याने कार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या जपान दौऱ्यावर आहेत.
B.Gokhale/J.Patankar/P.Malandkar
Had a delightful interaction with the Indian community in Japan.
— Narendra Modi (@narendramodi) October 29, 2018
The accomplishments of our diaspora make us very proud.
Talked at length about the rich history, robust present and strong future of India-Japan relations. https://t.co/9jdURuB6Il pic.twitter.com/BLiYLMepPq