Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 डिसेंबर रोजी नवी दिल्लीत वीर बाल दिवस कार्यक्रमात होणार सहभागी


नवी दिल्‍ली, 25 डिसेंबर 2024

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे 26 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 12 वाजता वीर बाल दिवस या देशव्यापी उत्सवात सहभागी होणार आहेत. भारताचा भविष्याचा पाया असणाऱ्या लहान मुलांना सन्मानित करण्यासाठी या उत्सवाचे आयोजन केले जाते. पंतप्रधान यावेळी उपस्थितांना संबोधित करणार आहेत.

पंतप्रधान ‘सुपोषित ग्रामपंचायत अभियाना’चाही शुभारंभ आहेत. पोषणासंबंधित सेवांची अंमलबजावणी मजबूत करून आणि समुदायाचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करून पोषण परिणाम सुधारणे आणि कल्याण साधणे हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे.

तरुण मनांना गुंतवून ठेवण्यासाठी, या दिवसाच्या महत्त्वाविषयी जागरुकता वाढवण्यासाठी, तसेच देशाप्रती धैर्य आणि समर्पणाची संस्कृती वाढवण्यासाठी देशभरात विविध उपक्रम राबवले जाणार आहेत.  MyGov आणि MyBharat पोर्टलद्वारे परस्परसंवादी प्रश्नमंजुषेसह ऑनलाइन स्पर्धांची मालिका देखील आयोजित केली जाणार आहे. शाळा, बाल संगोपन संस्था आणि अंगणवाडी केंद्रांमध्ये कथाकथन, सर्जनशील लेखन, भीत्तीचित्र बनवणे यासारखे मनोरंजक उपक्रमही हाती घेतले जाणार आहेत.

या कार्यक्रमाला प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार (PMRBP) विजेते देखील उपस्थित राहणार आहेत. 

 

* * *

M.Pange/S.Mukhedkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai