नवी दिल्ली, 21 सप्टेंबर 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या म्हणजेच, 22 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजता भारत मंडपम इथे जी-20 चमूशी संवाद साधणार आहेत. यावेळी पंतप्रधान उपस्थितांना मार्गदर्शनही करतील. या संवाद कार्यक्रमानंतर रात्रीच्या भोजनाचे आयोजन केले आहे.
जी 20 शिखर परिषद यशस्वी करण्यासाठी ज्यांनी योगदान दिले आहे, असे सुमारे 3000 लोक या संवाद कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. विशेषत: शिखर परिषद सुरळीत पार पाडण्यासाठी ज्यांनी तळागाळातील स्तरावर काम केले आहे, त्यांचा समावेश असणार आहे. यामध्ये विविध मंत्रालयांमधील क्लीनर, ड्रायव्हर, वेटर आणि इतर कर्मचारी अशा सर्वांचा समावेश असेल. या संवाद कार्यक्रमाला विविध विभागांचे मंत्री आणि अधिकारीही उपस्थित राहणार आहेत.
R.Aghor/S.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai