नवी दिल्ली , 16 जानेवारी 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10:30 वाजता नवी दिल्लीतील भारत मंडपम् येथे भारतातील सर्वात मोठे मोबिलिटी प्रदर्शन भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 चे उद्घाटन करणार आहेत.
हा प्रदर्शन 17-22 जानेवारी 2025 दरम्यान तीन वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित केले जात आहे : नवी दिल्लीतील भारत मंडपम् आणि यशोभूमी तर ग्रेटर नोएडा येथील इंडिया एक्स्पो सेंटर अँड मार्ट. या प्रदर्शनात एकाच वेळी 9 पेक्षा जास्त होणारे कार्यक्रम, 20 हून अधिक परिषदा आणि दालन कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. याशिवाय, या प्रदर्शनात गतिशीलता क्षेत्रातील धोरणे आणि उपक्रमांचे प्रदर्शन करण्यासाठी राज्य सत्रे देखील असतील. या सत्राद्वारे उद्योग आणि प्रादेशिक स्तरांवरील सहकार्य सक्षम करणे शक्य होईल.
भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 चे उद्दिष्ट संपूर्ण गतिशीलता मूल्य साखळीला एकाच छत्राखाली आणणे हे आहे. या वर्षीच्या प्रदर्शनात जागतिक महत्त्वावर विशेष भर दिला जाईल ज्यामध्ये जगभरातील प्रदर्शक आणि अभ्यागत सहभागी होतील. हा एक, उद्योग-नेतृत्वाखालील आणि सरकार-समर्थित उपक्रम असून विविध उद्योग संस्था आणि भागीदार संघटनांच्या संयुक्त सहकार्याने भारतीय अभियांत्रिकी निर्यात प्रोत्साहन परिषदेद्वारे समन्वयित केला जात आहे.
S.Patil/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai