ते 17 सप्टेंबर रोजी दुपारी वाराणसीला पोहचतील. तिथून ते थेट नरुर गावाला भेट देतील, जिथे ते प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. ही शाळा ‘रुम टू रीड ‘या स्वयंसेवी संघटनेच्या सहकार्याने चालवण्यात येते. त्यानंतर ते डीएलडब्ल्यू परिसरात काशी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांशी आणि त्यांच्याद्वारे मदत दिली जाणाऱ्या मुलांशी संवाद साधतील.
18 सप्टेंबरला बीएचयू अँफी थिएटर येथे पंतप्रधान एकूण 500 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उदघाटन किंवा पायाभरणी करतील. ज्या प्रकल्पांचे उदघाटन केले जाणार आहे त्यामध्ये जुन्या काशीसाठी एकात्मिक विद्युत विकास योजना (IPDS ) आणि बीएचयूमध्ये एक अटल इन्क्युबेशन सेंटर यांचा समावेश आहे. ज्या प्रकल्पांची पायाभरणी केली जाणार आहे त्यात बीएचयू येथे प्रादेशिक नेत्रविज्ञान केंद्राचा समावेश आहे. पंतप्रधान यावेळी उपस्थितांना संबोधित करणार आहेत.
B.Gokhale/ S.Kane
PM @narendramodi to visit Varanasi on September 17 and 18. https://t.co/O3RJxcNyOy via NaMo App pic.twitter.com/GG4ZEZnBNe
— PMO India (@PMOIndia) September 17, 2018