पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी अकरा वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सरदारधाम भवनचे लोकार्पण व कन्या छत्रालयाच्या फेज II चे भूमीपूजन करतील.
समाजात दुर्बल वर्गाच्या प्रगतीसाठी तसेच शैक्षणिक आणि सामाजिक परिवर्तनासाठी तसेच युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या बाबतीत सरदारधाम सातत्याने काम करत आले आहे. अहमदाबाद येथील सरदारधाम भवनमध्ये विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक सुविधाही उपलब्ध आहेत. कन्याछात्रालय मुलींसाठी हॉस्टेलची सुविधा उपलब्ध करून देत आहे आहे. ही सुविधा कोणत्याही आर्थिक मापदंडाविना उपलब्ध आहे.
गुजरातचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या प्रसंगी हजर असतील.
*****
MC/VG/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com