Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी शांघाय सहकार्य संघटनेच्या राष्ट्र प्रमुखांच्या 21 व्या बैठकीत दूरदृश्य प्रणाली द्वारे  झाले सहभागी

पंतप्रधान नरेंद्र मोदी शांघाय सहकार्य संघटनेच्या राष्ट्र प्रमुखांच्या 21 व्या बैठकीत दूरदृश्य प्रणाली द्वारे  झाले सहभागी


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी शांघाय सहकार्य संघटनेच्या राष्ट्र प्रमुखांच्या 21 व्या बैठकीत दूरदृश्य प्रणाली द्वारे आणि अफगाणीस्तानसंदर्भातल्या एससीओ- सीएसटीओ संयुक्त सत्रात व्हिडीओ संदेशाद्वारे सहभागी झाले.

शांघाय सहकार्य संघटनेच्या राष्ट्र प्रमुखांची 21 वी बैठक  17 सप्टेंबर 2021 ला दुशांबे इथे संमिश्र स्वरुपात घेण्यात आली.

ताजिकिस्तानचे अध्यक्ष इमोमाली रहमोन या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.

पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी व्हिडीओ लिंकच्या माध्यमातून परिषदेला संबोधित केले.

दुशांबे इथे परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले.

शांघाय सहकार्य संघटना व्यापक क्षेत्रात वाढत्या कट्टरपंथामुळे निर्माण झालेल्या समस्यांकडे लक्ष वेधतानाच हे या प्रदेशातल्या उदारवादी आणि प्रगतीशील संस्कृती आणि मुल्ये यांच्या विपरीत असल्याचे पंतप्रधानांनी आपल्या संबोधनात सांगितले.

अफगाणिस्तानमधल्या सध्याच्या घडामोडीमुळे कट्टरतावादाकडे झुकणारा कल अधिक वाढू  शकतो असे त्यांनी सांगितले.

संयम, वैज्ञानिक आणि तर्कसंगत विचारांना प्रोत्साहन देणाऱ्या कार्यक्रमावर शांघाय सहकार्य संघटनेला  काम करता येईल, या क्षेत्रातल्या युवकांसाठी ते समर्पक राहील असे त्यांनी सुचवले.

भारताच्या विकास कार्यक्रमात डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याच्या भारताचे अनुभव त्यांनी सांगितले आणि हे  ओपन सोर्स उपाय शांघाय सहकार्य संघटनेच्या इतर देशांसमवेत सामायिक करण्याची तयारी दर्शवली.

या प्रांतात कनेक्टीव्हिटी उभारण्याच्या महत्वाबाबत बोलताना, परस्पर  विश्वास वाढवण्याच्या दृष्टीने, कनेक्टीव्हिटी प्रकल्प पारदर्शक, सहभाग आणि सल्लामसलत युक्त  असावेत, असे पंतप्रधान म्हणाले.

शिखर परिषदे नंतर शांघाय सहकार्य संघटना आणि   सामुहिक सुरक्षा करार संघटना यांच्यात अफगाणिस्तानसंदर्भात सत्र झाले. व्हिडीओ संदेशा द्वारे पंतप्रधान त्यात सहभागी झाले. 

प्रांतात दहशतवाद कदापि खपवून घेतला जाणार नाही यासंदर्भात शांघाय सहकार्य संघटनेने आचारसंहिता विकसित करावी असे त्यांनी सुचवले. अफगाणिस्तान मधून अमली पदार्थ, शस्त्रास्त्रे आणि मानवी तस्करीचा धोका  अधोरेखित केला. अफगाणिस्तानमध्ये मानवतेच्या दृष्टीकोनातून संकटाचा उल्लेख करत अफगाणिस्तानमधल्या जनतेप्रती भारताच्या दृढ ऐक्याचा त्यांनी पुनरुच्चार केला.

***

S.Tupe/N.Chitale/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com