Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीलंकेतील तमिळ समुदायाच्या नेत्यांची घेतली भेट


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोलंबो येथे श्रीलंकेतील तमिळ समुदायाच्या नेत्यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान पंतप्रधानांनी आदरणीय तमिळ नेते थिरु आर. संपंथन आणि थिरु मावई सेनाथिराजा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.

एक्स या समाज माध्यमावरच्या एका संदेशात पंतप्रधानांनी लिहिले आहे:

श्रीलंकेतील तमिळ समुदायाच्या नेत्यांची भेट घेणे नेहमीच आनंददायी असते. आदरणीय तमिळ नेते थिरु आर. संपंथन आणि थिरु मावई सेनाथिराजा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. या दोघांशी माझी वैयक्तिकरित्या ओळख होती. संयुक्त श्रीलंकेतील तमिळ समुदायासाठी समानता, सन्मान आणि न्यायाच्या जीवनासाठी अटळ वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. माझ्या भेटीदरम्यान सुरू करण्यात आलेले विविध प्रकल्प आणि उपक्रम त्यांच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक प्रगतीत योगदान देतील.”

***

S.Kane/S.Mukhedkar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  pibmumbai@gmail.com