Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीलंकेतील भारताच्या सहकार्याने उभारलेल्या रेल्वे पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेचे राष्ट्रपती महामहिम अनुरा कुमार दिसानायके हे दोन्ही नेते आज अनुराधापुरा इथे भारताच्या सहकार्याने बांधलेल्या दोन रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटन आणि शुभारंभ समारंभात सहभागी झाले होते.

यावेळी दोन्ही नेत्यांनी 91.27 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स खर्चाच्या, आणि भारताच्या सहकार्याने नूतनीकरण केलेल्या 128 किलो मीटर लांबीच्या माहो-ओमंथाई रेल्वे मार्गाचे उद्घाटन केले. त्यानंतर त्यांनी 14.89 अमेरिकन डॉलर खर्चाच्या आणि भारताकडून मिळालेल्या अनुदानाच्या मदतीने बांधल्या जात असलेल्या माहो ते अनुराधापुरा पर्यंतच्या प्रगत सिग्नल यंत्रणेच्या बांधकामाचेही उद्घाटन केले.

हे ऐतिहासिक रेल्वे आधुनिकीकरण प्रकल्प भारत – श्रीलंका विकास भागीदारीअंतर्गत राबवले गेले आहेत. हे प्रकल्प श्रीलंकेच्या उत्तर-दक्षिण भागातली रेल्वे जोडणी मजबूत करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा मैलाचा टप्पा ठरले आहे.  या प्रकल्पांमुळे श्रीलंकेतील प्रवासी तसेच मालवाहतूक जलद आणि कार्यक्षम व्हायला मदत होणार आहे.

***

S.Tupe/T.Pawar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  pibmumbai@gmail.com