Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘श्रीलंका मित्र विभूषण’ प्रदान


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज श्रीलंकेचे राष्ट्रपती दिसानायके यांच्या हस्ते श्रीलंका मित्र विभूषणहा सन्मान प्रदान करण्यात आला. आभार मानताना पंतप्रधान म्हणाले की, हा सन्मान भारत आणि श्रीलंका यांच्यातील दृढ मैत्री आणि ऐतिहासिक संबंधांचे प्रतीक आहे.

एक्सवरील विविध पोस्टमध्ये त्यांनी लिहिले:

आज राष्ट्रपती दिसानायके यांच्याकडून मला श्रीलंका मित्र विभूषणप्रदान करण्यात आला  ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. हा सन्मान केवळ माझा नाही – तो भारतातील 1.4 अब्ज जनतेला दिलेला आदर आहे. हा भारत आणि श्रीलंकेतील लोकांमधील दृढ मैत्री आणि ऐतिहासिक संबंधांचे प्रतीक आहे. या सन्मानाबद्दल मी श्रीलंकेचे राष्ट्रपती, सरकार आणि जनतेचे मनःपूर्वक आभार मानतो.”

***

N.Chitale/G.Deoda/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  pibmumbai@gmail.com