Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरणीय, परमपूज्य डॉ. श्री श्री श्री शिवकुमार स्वामीगालू यांच्या जयंतीनिमित्त वाहिली आदरांजली


नवी दिल्ली, 1 एप्रिल 2025

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज परमपूज्य डॉ. श्री श्री श्री शिवकुमार स्वामीगलू यांच्या जयंतीच्या विशेष प्रसंगी त्यांना आदरांजली वाहिली आहे. श्री श्री श्री शिवकुमार स्वामीगालू हे करुणा आणि अविरत सेवेचे दीपस्तंभ होते,  आपल्या निःस्वार्थ कृतीतून समाज कसा बदलू शकतो हे त्यांनी दाखवून दिले, असे पंतप्रधानांनी त्यांच्या असामान्य सेवाकार्याबद्दल आदरभावना व्यक्त करताना म्हटले आहे.

एक्स वर लिहिलेल्या पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले :

परमपूज्य डॉ. श्री श्री श्री शिवकुमार स्वामीगलू यांच्या जयंतीच्या विशेष प्रसंगी त्यांना भावपूर्ण आदरांजली. करुणा आणि अविरत सेवेचे दीपस्तंभ म्हणून ते कायम स्मरणात राहतील. आपल्या निःस्वार्थ कृतीतून समाज कसा बदलू शकतो हे त्यांनी दाखवून दिले. विविध क्षेत्रांमधील त्यांची असामान्य कामगिरी येणाऱ्या कित्येक पिढयांना प्रेरणा देत राहील.

 

* * *

S.Tupe/B.Sontakke/D.Rane