Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरुणाचल प्रदेशच्या नागरिकांना त्यांच्या स्थापना दिनाबद्दल दिल्या शुभेच्छा


नवी दिल्ली, 20 फेब्रुवारी 2025

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरुणाचल प्रदेश स्थापना दिनाबद्दल तेथील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.अरुणाचल प्रदेश हा समृद्ध परंपरा आणि निसर्गाशी जवळीक यासाठी ओळखला जातो,असे मोदी यांनी म्हटले आहे भावी काळातही अरुणाचल प्रदेशाची समृद्धी वाढत राहो आणि प्रगती तसेच ऐक्य असेच बहरत राहो’ असेही मोदी यांनी  म्हटले आहे.

पंतप्रधानांनी एक्स या समाज माध्यमावरच्या पोस्टवर म्हटले आहे,

“अरुणाचल प्रदेशच्या नागरिकांना त्यांच्या राज्य स्थापना दिनाच्या शुभेच्छा. हा प्रदेश समृद्ध परंपरा आणि निसर्गाशी जवळीक यासाठी ओळखला जातो.अरुणाचल प्रदेशचे कष्टाळू आणि उत्साही माणसे भारताच्या विकासात मोठे योगदान देत आहेत.याशिवाय त्यांचा चैतन्यदायी आदिवासी वारसा आणि थक्क करून सोडणारी जैवविविधता या राज्याला वैशिष्ट्यपूर्ण बनवते.अरुणाचल प्रदेशची अशीच भरभराट होवो आणि प्रगती तसेच एकात्मतेच्या मार्गावरील त्याचा प्रवास भावी काळातही बहरत जावो.”

S.Kane/V.Sahjrao/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai