Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमो भारत रेल्वे मधील संवाद केला सामायिक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमो भारत रेल्वे मधील संवाद केला सामायिक


 

पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी आज साहिबााबाद आरआरटीएस स्थानक ते न्यू अशोक नगर आरआरटीएस स्थानकापर्यंत नमो भारत रेल्वे द्वारे प्रवास केला. आपल्या या प्रवासादरम्यान त्यांनी युवा  मित्रांशी प्रेमळ संवाद साधला, ज्यांनी पंतप्रधानांना अनेक चित्रे आणि कलाकृती भेट दिल्या.

पंतप्रधान आणि नवीन उदयोन्मुख भारताबद्दल कविता सादर करणाऱ्या मुलीशी संवाद साधताना पंतप्रधानांनी तिचे कौतुक केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना एक चित्र भेट म्हणून देणाऱ्या मुलाशी देखील संवाद साधला. हा मुलगा  सरकारच्या गृहयोजनेतील घराचा लाभार्थी होता. पंतप्रधानांनी या मुलाला नवीन घरात प्रवेश केल्यानंतरच्या त्याच्या प्रगतीबद्दल विचारले आणि त्याला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.  आणखी एका मुलीने पंतप्रधानांवर रचलेली कविता सादर केली, त्याबद्दल पंतप्रधानांनी  तिचे कौतुक केले.

त्यानंतर पंतप्रधानांनी महिला लोको पायलटशी संवाद साधला. या लोको पायलट महिलेने आपल्या नोकरीबद्दल आनंद आणि अभिमान व्यक्त केला. पंतप्रधानांनी त्यांना अत्यंत एकाग्रतेने काम करण्याचे आवाहन केले आणि त्यांच्या नवीन नोकरीसाठी शुभेच्छा दिल्या.

***

S.Kane/S.Mukhedkar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com