नवी दिल्ली, 4 डिसेंबर 2024
कुवेतचे परराष्ट्र मंत्री अब्दुल्ला अली अल-याह्या यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
कुवेतचे युवराज महामहिम शेख सबाह खालेद अल-हमद अल-सबाह यांच्याशी सप्टेंबरमध्ये न्यूयॉर्क इथे झालेल्या भेटीचे स्मरण करून पंतप्रधानांनी द्विपक्षीय संबंधांच्या वाढत्या गतीबद्दल समाधान व्यक्त केले.
त्यांनी व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा, तंत्रज्ञान, संस्कृती आणि लोकांमधील मजबूत संबंधांमध्ये सहकार्य वृद्धिंगत करण्याच्या उपायांवर चर्चा केली.
कुवेतमध्ये राहणाऱ्या दहा लाख बळकट भारतीय समुदायाची काळजी घेत असल्याबद्दल पंतप्रधानांनी कुवेतच्या नेतृत्वाचे आभार मानले.
आखाती सहकार्य परिषदेच्या कुवेतच्या विद्यमान अध्यक्षपदाच्या कार्यकाळात भारत आणि आखाती सहकार्य परिषदेमधील घनिष्ठ सहकार्य अधिक मजबूत होईल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. त्यांनी पश्चिम आशियातील परिस्थितीबाबत आपले विचार मांडले आणि या प्रदेशात शांतता, सुरक्षा आणि स्थैर्य लवकर प्रस्थापित व्हावे यासाठी पाठिंबा व्यक्त केला.
कुवेतला लवकरच भेट देण्याचे कुवेत नेतृत्वाचे निमंत्रण पंतप्रधानांनी स्वीकारले.
* * *
N.Chitale/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai