Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषा गौरव सप्ताहाच्या दिल्या शुभेच्छा


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आसामच्या जनतेला भाषा गौरव सप्ताहाच्या शुभेच्छा दिल्या आणि #BhashaGauravSaptah चे महत्त्व अधोरेखित केले.  X या समाज माध्यमावरील वरील एका पोस्टमध्ये, त्यांनी अलीकडेच या प्रदेशाच्या समृद्ध भाषिक आणि सांस्कृतिक वारशाची एक महत्त्वाची ओळख असणाऱ्या आसामी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याच्या घोषणेबद्दल आनंद व्यक्त केला.

आसामच्या समृद्ध भाषिक वारशाचा आठवडाभर चालणारा ‘भाषा गौरव सप्ताह’ सुरू झाल्याची घोषणा करणाऱ्या आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या संदेशावर प्रतिक्रिया देताना पंतप्रधानांनी आज ट्विट केले:

“#भाषागौरवसप्ताह हा एक उल्लेखनीय प्रयत्न आहे. हा उत्सव आसामी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल लोकांना झालेला आनंद अधोरेखित करतो. सर्वांना माझ्या शुभेच्छा. आठवडाभर चालणाऱ्या या कार्यक्रमात लोक आणि आसामी संस्कृती यांच्यातील संबंध अधिक दृढ होतील. आसामबाहेर राहणाऱ्या आसामी लोकांनाही या सप्ताहात सहभागी व्हावे असे आवाहन करतो.”

***

S.Patil/S.Mukhedkar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com