Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाओ रामायणाच्या सादरीकरणाला उपस्थिती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाओ रामायणाच्या सादरीकरणाला उपस्थिती


नवी दिल्‍ली, 10 ऑक्‍टोबर 2024

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी लाओस येथे लुआंग प्रबांगच्या प्रतिष्ठित रॉयल थिएटरने सादर केलेल्या लाओ रामायणाच्या सादरीकरणाला उपस्थित राहिले. लाओ रामायणाला फलक फलम किंवा फ्रा लक फ्रा राम असेही म्हणतात. लाओसमध्ये रामायणाचा उत्सव साजरा केला जात असून, हे महाकाव्य दोन्ही देशांमधील सामायिक वारसा आणि प्राचीन सांस्कृतिक संबंध प्रतिबिंबित करते. लाओसमध्ये भारतीय संस्कृती आणि परंपरेचे अनेक पैलू शतकानुशतके आचरणात आणले गेले आहेत, आणि त्याचे जतन करण्यात आले आहे. दोन्ही देश आपापल्या सामायिक वारशाच्या संवर्धनासाठी एकत्र येऊन काम करत आहेत. लाओसमधील वात फू मंदिर आणि संबंधित स्मारके पुनर्संचयित करण्याच्या कामात भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचा सहभाग आहे.

गृहमंत्री, शिक्षण आणि क्रीडा मंत्री यांच्यासह अनेक मान्यवर, बँक ऑफ लाओ पीडीआरचे गव्हर्नर आणि व्हिएन्टिनचे महापौर यावेळी उपस्थित होते. रामायणाच्या सादरीकरणापूर्वी, पंतप्रधानांनी व्हिएन्टिनमधील सी साकेत मंदिराचे मठाधिपती महावेथ मासेनाई यांच्या मार्गदर्शनाखाली सेंट्रल बुद्धीस्ट फेलोशिप ऑर्गनायझेशन ऑफ लाओ पीडीआरच्या ज्येष्ठ बौद्ध भिक्खूंच्या आशीर्वाद समारंभात भाग घेतला. सामायिक बौद्ध वारसा भारत आणि लाओस यांच्यातील दृढ सांस्कृतिक संबंधांचा आणखी एक पैलू प्रतिबिंबित करतो.

 

* * *

S.Kane/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai