पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज इस्राएलचे पंतप्रधान म. म . बेंजामिन नेतान्याहू यांच्याकडून दूरध्वनी आला. पश्चिम आशियातील सध्याच्या घडामोडींबद्दल पंतप्रधान नेतान्याहू यांनी पंतप्रधान मोदी यांना माहिती दिली. कोणत्याही रूपात असला तरी दहशतवादाला थारा नाही असे या संभाषणादरम्यान पंतप्रधानांनी म्हटले. तेथील स्थानिक युद्धजन्य परिस्थिती नियंत्रणाखाली ठेवणे आणि ओलीसांची सुरक्षित सुटका करणे यावर पंतप्रधानांनी भर दिला. लवकरात लवकर शांतता व स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी भारताकडून मदतीची तयारी असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. याशिवाय भारत इस्राएल मधील धोरणात्मक भागीदारीला आणखी मजबूत करण्यासंबंधातील द्विपक्षीय मुद्द्यांवर दोन्ही नेत्यांची चर्चा झाली. पंतप्रधानांनी रोश हाशाना प्रित्यर्थ पंतप्रधान नेतान्याहू व जगभरातील ज्यू धर्मियांना शुभेच्छादेखील दिल्या. यापुढेही संपर्कात राहण्यासाठी दोन्ही नेत्यांनी संमती दर्शवली.
***
SonalT/UmaR/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com
/PIBMumbai
/pibmumbai