Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुवेतच्या युवराजांची घेतली भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुवेतच्या युवराजांची घेतली भेट


नवी दिल्‍ली, 22 सप्‍टेंबर 2024

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्र महासभेच्या 79 व्या अधिवेशनाच्या निमित्ताने कुवेतचे युवराज शेख सबाह खालिद अल-हमद अल-मुबारक अल-सबाह यांची भेट घेतली. पंतप्रधान आणि कुवेतचे युवराज यांच्यातील ही पहिलीच भेट होती.

कुवेतसोबतच्या द्विपक्षीय संबंधांना भारत अत्यंत महत्त्व देतो, असे  पंतप्रधानांनी सांगितले.  दोन्ही नेत्यांनी दोन्ही देशांमधील मजबूत ऐतिहासिक संबंध आणि नागरिकांमधील परस्पर संबंधांचे स्मरण केले.  दोन्ही देश ऊर्जा आणि अन्न सुरक्षेसाठी एकमेकांना मदत करत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. दोन्ही देशांच्या परस्पर हितासाठी द्विपक्षीय संबंध अधिक दृढ आणि वैविध्यपूर्ण करण्यासाठी दोन्ही नेत्यांनी आपली दृढ वचनबद्धता व्यक्त केली. कुवेतमधील सर्वात मोठा परदेशी समूह असलेल्या भारतीय समुदायाचे कल्याण सुनिश्चित केल्याबद्दल पंतप्रधानांनी युवराज यांचे आभार मानले.

दोन्ही देशांच्या शिर्ष नेतृत्वामधील बैठकीमुळे भारत आणि कुवेतमधील द्विपक्षीय संबंधांना नवी गती मिळण्याची अपेक्षा आहे.

 

* * *

N.Chitale/S.Mukhedkar/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai