Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्यूयॉर्कमध्ये भूतान, श्रीलंका, स्वीडन आणि सायप्रसच्या नेत्यांची भेट घेतली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 सप्टेंबरला न्यूयॉर्कमध्ये भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोब्गे यांची भेट घेतली. 2015 नंतरच्या विकासाच्या मसुद्यासंदर्भात संयुक्त राष्ट्रसंघाच्या शिखर परिषदेत बोलतांना पंतप्रधानांनी दूरदृष्टी दर्शवणारे वक्तव्य केल्याबद्दल तोब्गे यांनी पंतप्रधानांचं अभिनंदन केलं. भूतानमधल्या जलविद्युत प्रकल्पाच्या प्रगतीची पंतप्रधानांनी प्रशंसा केली. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी प्रतिनिधीत्व मिळावं यासाठी भूतानचा पाठिंबा असल्याच्या भूमिकेचा तोब्गे यांनी पुनरुच्चार केला.

श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष मैत्रीपाला सिरीसेना यांचीही पंतप्रधानांनी भेट घेतली. श्रीलंकेत यावर्षी घेण्यात आलेल्या दोन निवडणुकांबद्दल श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षांची त्यांनी प्रशंसा केली. श्रीलंकेत लोकशाही किती खोलवर रुजली आहे याचंच हे द्योतक असल्‍याचं पंतप्रधान म्हणाले. श्रीलंकेतल्या विविध प्रकल्पांमधल्या भारताच्या गुंतवणुकीच्या मुद्यावरही यावेळी चर्चा झाली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वीडनचे पंतप्रधान स्टीफन लोफवेन यांची भेट घेतली. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या नुकत्याच झालेल्या स्वीडनच्या फलदायी दौऱ्याबद्दल यावेळी समाधान व्यक्त करण्यात आलं. मेक इन इंडियासह विविध अभियानात स्वीडननं सहभागी व्हावं असं आवाहन भारतानं केलं.

सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस ॲनस्टेसिएडेस यांच्याशीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चर्चा केली. सायप्रसबरोबरच्या भारताच्या दीर्घकालीन संबंधांचा उल्लेख करत दोन्ही देश भौगोलिकदृष्ट्या एकमेकांपासून दूर असले तरी भावनिकदृष्ट्या जवळ असल्याचं पंतप्रधान म्हणाले. भारत हा सायप्रसचा एक मोठा मित्र असल्याचं सायप्रसच्या राष्ट्राध्यक्षांनी यावेळी सांगितलं.

N. Chitale/S.Tupe